21/06/2024
#योगदिवस
के.के.वाघ माध्यमिक विद्याभवन पिंपळस रामाचे शाळेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय वाघ होते. आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर जीवनात योग , व्यायाम व सकस आहार यांचा अवलंब करणे ही काळाची गरज असे प्रतिपादन संजय वाघ यांनी केले.
विद्याभवनचे योग मार्गदर्शक व क्रीडाशिक्षक दिपक कुंभार सर यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना सूर्यनमस्कार,वृक्षासन,ताडासन,शवासन,वज्रासन,भूजंगासन,मंडुकासन,अर्धचक्रासन,कंबर,मान,मनगट, व खांद्याचे व्यायाम आदी योगप्रकार शिकवले.
सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी दररोज योग करण्याचा संकल्प केला .
यावेळी योगशिक्षक दिपक कुंभार यांचा मुख्याध्यापक संजय वाघ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या योग कार्यक्रमात 106 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. या योगदिनानिमित्ताने विद्याभवनात स्काऊट व गाईड छात्रांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक दिवाकर शेजवळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती सांगळे,छाया पवार,योगेश सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.