KBH Arts, Science & Commerce College, Nimgaon

KBH Arts, Science & Commerce College, Nimgaon KBH Arts, Science & Commerce College, Nimgaon

निमगाव:येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती ...
24/07/2026

निमगाव:
येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती अत्यंत श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. जी. शेवाळे यांनी अध्यक्षस्थान भूषवून लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी टिळकांच्या 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' या घोषणेचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी लोकमान्य टिळकांच्या समाजोपयोगी कार्याचा आणि विचारांचा सविस्तर आढावा घेतला:
* 'गणेशोत्सव' आणि 'शिवजयंती' उत्सवांच्या माध्यमातून जनतेमध्ये राष्ट्रीय एकात्मता व जागृती घडवून आणण्याचे त्यांचे कार्य.
* 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी केलेले प्रखर वैचारिक लेखन.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#लोकमान्यटिळक

कर्मवीर भाऊसाहेब हिरे निमगाव महाविद्यालयात अजित दादा पवार यांची पहिली जयंती श्रद्धापूर्वक साजरी कर्मवीर भाऊसाहेब हिरे नि...
22/07/2026

कर्मवीर भाऊसाहेब हिरे निमगाव महाविद्यालयात अजित दादा पवार यांची पहिली जयंती श्रद्धापूर्वक साजरी कर्मवीर भाऊसाहेब हिरे निमगाव कॉलेजमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पहिली जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ ए. व्ही. पाटील यांनी अजित दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मनोगत व्यक्त केले व अभिवादन केले. या प्रसंगी डॉ यू. के. कुडासे यांनी अजित दादांच्या जलसंपदा विभागातील महत्त्वपूर्ण कार्याची माहिती दिली. त्यांनी दादांनी १९९९ ते २००९ या काळात जलसंपदा मंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी सिंचनाचे जाळे कसे वाढवले, हे देखील त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षणेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

14/07/2026

आज दिनांक १४ जुलै २०२६ रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव ता . मालेगाव जि.नाशिक येथे मह...
14/07/2026

आज दिनांक १४ जुलै २०२६ रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव ता . मालेगाव जि.नाशिक येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.सौ.स्मिताताई प्रशांत हिरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त टी. के. आर. एच विद्यालय निमगाव व के.बी.एच महाविद्यालय निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींची ३ कि.मी पिंक रन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या *स्पर्धेत कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक सिद्धी पारखे,द्वितीय क्रमांक तपस्या हिरे व तृतीय क्रमांक साक्षी कौर यांनी पटकावले.तर वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक निशा संदीप बच्छाव,द्वितीय क्रमांक गायत्री चित्ते व तृतीय क्रमांक प्रांजली बापू खैरनार यांनी पटकावले.*
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगाव येथील शाखा अधिकारी मा. श्री. कुंदन पुरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील तसेच टी.के.आर.एच विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस.सावंत सर उपस्थित होते.
मा.श्री.कुंदन पुरी यांनी आपल्या भाषणात विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत महिलांचे असणारे योगदान सांगताना वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे सांगितले.कला, विज्ञान, आर्थिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रात स्त्रियांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नावलौकिक आणि आपल्या कामगिरीला उजाळा दिल्याचे सांगितले त्याचबरोबर निमगाव महाविद्यालयाने मुलींसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकतांना कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे ,समाजश्री प्रशांत दादा हिरे, डॉ. स्मिताताई हिरे डॉ.अपूर्वभाऊ हिरे व अद्वयआबा हिरे डॉ.संपदादिदि हिरे यांच्या कार्याचा उल्लेख केला. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विविध शाखांकडे मुलींसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करताना महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या निर्भय कन्या योजना,निरामय आरोग्य केंद्र व विशाखा समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा उल्लेख केला. यावेळी डॉ.अरूण पाटील यांनी डॉ.सौ.स्मिताताई हिरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन क्रीडा संचालक डॉ.मनिष देवरेग यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजाराम शेवाळे यांनी केले तसेच या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मुली व प्राध्यापक ,प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

#ᴡᴏᴍᴇɴᴇᴍᴘᴏᴡᴇʀᴍᴇɴᴛ

कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य निमगाव महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांची ४६ वी पुण्यतिथी दिनांक 3 ...
06/07/2026

कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य निमगाव महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांची ४६ वी पुण्यतिथी दिनांक 3 जुलै2026 रोजी अत्यंत आदराने साजरी करण्यात आली. या स्मृती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. जी. शेवाळे आणि अकॅडमिक सुपरवायझर यु. के. कुडासे सर यांनी लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस आणि सामाजिक कार्याला विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी अकॅडमिक सुपरवायझर यु. के. कुडासे यांनी उपस्थितांना संबोधित करताना लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर आपले विचार व्यक्त केले. "व्यंकटराव हिरे यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे," असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
यानंतर महाविद्यालय प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. बदलत्या हवामानाच्या काळात निसर्गाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे, केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे उत्तम संगोपन करण्याची जबाबदारीही सर्वांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन डॉ राजाराम यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी या वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून महाविद्यालय परिसर हरित करण्याचा संकल्प केला.
#लोकनेते_व्यंकटराव_हिरे
#४६वी_पुण्यतिथी
#कर्मवीर_भाऊसाहेब_हिरे_महाविद्यालय
#निमगाव_महाविद्यालय
#वृक्षारोपण

आज दिनांक ०१ जुलै २०२६ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निम...
01/07/2026

आज दिनांक ०१ जुलै २०२६ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव येथे,डॉक्टर दिवस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने निमगाव परिसरातील सर्व डॉक्टरांचे महाविद्यालयाचे व संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच डॉक्टरांच्या सामाजिक कार्याचा प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील यांनी गौरव केला. त्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, निमगाव येथील विद्यार्थिनी वृषाली प्रदीप अहिरे हिची नुकतीच 'इंड...
23/06/2026

कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, निमगाव येथील विद्यार्थिनी वृषाली प्रदीप अहिरे हिची नुकतीच 'इंडियन पोस्ट सर्व्हिस'मध्ये 'ब्रांच पोस्ट मास्टर' (BPM) या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वृषालीचा गौरव करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, "वृषालीने आपल्या चिकाटीच्या आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य दिशा आणि सातत्य ठेवल्यास ते निश्चितपणे उच्च पदे मिळवू शकतात. तिचे हे यश महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल."
वृषालीच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २१जून २०२६'आंतरराष्ट्रीय यो...
22/06/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २१जून २०२६'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योगासनांची अत्यंत गरज आहे.योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे.आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या युगात स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी योग हाच एकमेव उत्तम मार्ग आहे. योग केवळ व्यायाम नसून ती एक जीवनपद्धती आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंतर्भाव केल्यास त्यांची एकाग्रता वाढेल आणि शैक्षणिक प्रगती अधिक वेगाने होईल.
असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
क्रीडा मार्गदर्शकांच्या/योग शिक्षकांच्या सूचनेनुसार सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान याचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक केले.यामध्ये प्रामुख्याने सूर्यनमस्कार, ताडासन, त्रिकोणासन, प्राणायाम आणि कपालभाती यांसारख्या आसनांचा समावेश होता. उपस्थित सर्वांनी दररोज किमान ३०ते ४५ मिनिटे योग करण्याचा आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा सामूहिक संकल्प केला. कार्यक्रमाला प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक डॉ.मनिष देवरे यानी केले.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जन्मभूमी असलेल्या आणि ग्रामीण भागातील शिक्षण प्रसारणात अग्रेसर असलेल्या येथील महात्मा गांधी ...
22/06/2026

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जन्मभूमी असलेल्या आणि ग्रामीण भागातील शिक्षण प्रसारणात अग्रेसर असलेल्या येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या महाविद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशाने केवळ विद्यार्थ्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला नाही, तर महाविद्यालय व संस्थेच्या लौकिकातही मोठी भर घातली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, महाविद्यालयात आयोजित विशेष सत्कार सोहळ्यात त्यांचे कौतुक करण्यात आले. या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे सी.डी.सी. (CDC) चेअरमन मा. डॉ. अपूर्वभाऊ हिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ याला जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रोत्साहनाचे वातावरण मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, "विद्यार्थ्यांची जिद्द आणि त्यांना मिळालेले योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही संपादन केलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे."
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Address

Karmveer Bhausaheb Hiray Arts, Science & Commerce College, Malegaon, Dist. Nashik
Nimgaon
423212

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when KBH Arts, Science & Commerce College, Nimgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category