27/05/2026
प्रवेश सुरू..आजच संपर्क करा..
…
…
…
.
ADITYA HEALTH AND EDUCATION SOCIETY, NAVI MUMBAI (AHES) doing social work in Nursing Education, The founder member and the President of AHES DR.PRATIK P.
ADITYA HEALTH AND EDUCATION SOCIETY, NAVI MUMBAI (AHES) is doing social work in education, health, cultural, sports, spiritual, etc fields since many years in Navi Mumbai and in Maharashtra. TAMBE is well known practitioner and social worker in Navi Mumbai since many years. The other members of the society are well known personalities in various social fields. OUR FACULTY :
Qualified & efficient f
27/05/2026
प्रवेश सुरू..आजच संपर्क करा..
…
…
…
.
21/05/2026
प्रवेश सुरू..आजच संपर्क करा..
…
…
…
.
*प्रतिभा स्कुल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थीनीचे कौतुकास्पद कार्य !!*
नवी मुंबई येथील प्रतिभा स्कुल ऑफ नर्सिंग येथे ए.एन.एम. नर्सिंगचे शिक्षण घेत असलेली कु. पूजा खर्गे हिने रेल्वे प्रवासादरम्यान दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे व नवजात बालकाचे प्राण सुरक्षित राहण्यास मोठी मदत झाली.
रेल्वेने प्रवास करत असताना एका प्रवासी महिलेला अचानक प्रसूतीपूर्व तीव्र त्रास सुरू झाला. वेदनेमुळे ती महिला मोठ्याने ओरडत होती. त्या वेळी उपस्थित प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत कु. पूजा खर्गे हिने अत्यंत शांतपणे व धाडसाने पुढाकार घेतला. नर्सिंग शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा योग्य वापर करून तिने त्या महिलेला आवश्यक मदत केली. परिस्थिती गंभीर असल्याने रेल्वेमध्येच त्या महिलेची प्रसूती झाली.
कु. पूजा हिने अतिशय दक्षतेने आणि जबाबदारीने संपूर्ण प्रसूती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली. तिच्या या तत्परतेमुळे आई व बाळ दोघेही सुरक्षित राहिले. तिच्या धाडसी व मानवतावादी कार्याबद्दल रेल्वे कर्मचारी तसेच उपस्थित प्रवाशांनी तिचे मनापासून कौतुक केले व आभार मानले.
कु. पूजा खर्गे हिचे हे कार्य केवळ तिच्या नर्सिंग शिक्षणाचे नव्हे, तर समाजसेवेच्या भावनेचेही उत्तम उदाहरण आहे. तिच्या या कौतुकास्पद कार्यामुळे प्रतिभा स्कुल ऑफ नर्सिंग, नवी मुंबई संस्थेचा गौरव वाढला असून इतर विद्यार्थ्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरली आहे.
12/05/2026
परिचारिका दिनानिमित्त प्रतिभा स्कूल ऑफ नर्सिंग, नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे मराठी चित्रपट “राजा शिवाजी” चा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख अधिक जवळून अनुभवता आली.
12/05/2026
जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा..
दि. १२ मे रोजी महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आधुनिक परिचारिका सेवेच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Florence Nightingale यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व Florence Nightingale यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रतिभा स्कुल ॲाफ नर्सिंग च्या सचिव/ संचालिका डॅा. सौ विजया प्रतिक तांबे मॅडम व संस्थेच्या प्राचार्या व आदि मान्यवरांनी परिचारिका व्यवसायाचे महत्त्व, रुग्णसेवेमधील त्यांचे योगदान तसेच आरोग्य क्षेत्रातील त्यांची जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
#जागतिक_परिचारिका_दिन
12/05/2026
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने सर्व परिचारिकांना शुभेच्छा. रुग्णसेवेत अहोरात्र तत्पर राहून संवेदनशीलता, करुणा आणि समर्पणाचा आदर्श उभा करणाऱ्या परिचारिकांचे कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. सेवा आणि समर्पणाच्या या कार्याला सलाम.
29/04/2026
शैक्षणिक भेट - जलशुद्धीकरण केंद्र भांडुप मुंबई
26/04/2026
आदित्य हेल्थ अॅण्ड एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग,नवी मुंबई चे संस्थापक/अध्यक्ष व हिम्पाम नवी मुंबईचे अध्यक्ष आणि आमचे आधारस्तंभ, कुटुंबप्रमुख मा.डॉ.प्रतिक प्रभाकर तांबे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..🎂💐🥰
13/04/2026
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, कायदेपंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३५ जयंती निम्मित विनम्र अभिवादन !!!
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |