05/06/2026
*विद्याभवनच्या त्रिशाची नवोदय विद्यालयात चमकदार निवड*.
💐💐🏆🏆💐💐🏆🏆💫
पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन माध्यमिक इंग्रजी शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. त्रिशा राजनिष चतुर्वेदी हिची जवाहर नवोदय विद्यालय, पालघर येथे निवड झाली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, शिष्यवृत्ती परीक्षेत १९४ गुण मिळवणाऱ्या त्रिशाने आपल्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्रिशाच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळा, शिक्षकवृंद व पालकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्रिशाचे खूप खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
💐💐🏆💐💐🏆💫🍫
03/06/2026
*एसएससीच्या १००% निकालाची विद्याभवनची २३ वर्षांची परंपरा*
नेरूळ: दि. ०८ पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा १००% निकाल लागला असून सतत शंभर टक्के निकाल लागण्याचे हे तेवीसावे वर्ष आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर करण्यात आला. विद्याभवनच्या रौप्य महोत्सवी वर्षात १००% निकालाची ही गौरवशाली परंपरा यशस्वीपणे कायम राखली गेली आहे.
सर्वेश अर्जुन पाटील याने ९५.४० टक्के मिळवून इंग्रजी माध्यमातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. सुहानी प्रसन्नकुमार कांबळे आणि शिवकृष्ण किशोरकुमार पुचा यांनी अनुक्रमे ९४.४०% व ९३.००% मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
सेमी इंग्रजी माध्यमातून रुद्र किरण जाधव याने ९१.८०%गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आयुष लक्ष्मण आनेकर आणि मधुरा प्रशांत तरकसबंद या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ९१% व ८९.८०% गुण मिळवत द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले. पुणे विद्यार्थी गृह कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, अमोल जोशी, कार्यवाह संजय गुंजाळ, कोषाध्यक्ष कृष्णाजी कुलकर्णी कुलसचिव दिनेश मिसाळ, सर्व संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शाळेचे सर्व मुख्याध्यापक, समन्वयक , पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
03/06/2026
*विद्याभवनच्या दहा विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड*
नेरुळ दि. 27: पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या माध्यमिक मराठी विभागातील दहा विद्यार्थ्यांनी नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून ठाणे जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे आयोजित
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देता येते.
डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेच्या निकालामध्ये सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता निवड यादीत स्थान मिळवले.
या शिष्यवृत्ती प्राप्त प्रत्येक विद्यार्थ्याला शासनातर्फे इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे एकूण रुपये 48 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विभूती दत्तात्रय गुंजाळ, वेदश्री विश्वनाथ राक्षे, तन्वी संजय मस्कर, अथर्व अनिल गायकवाड, अथर्व विनेश पवार, अनुष्का आशिष गोळे, अनुष्का अरुण तिकोणे, धनंजय किरण जाधव, भूमिका त्रिंबक जाधव, सार्थक विनोद पवार या विद्यार्थ्यांची परीक्षेतील गुणांनुसार ठाणे जिल्ह्यातून शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.
पुणे विद्यार्थी गृह कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, कुलसचिव दिनेश मिसाळ, माजी कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
03/06/2026
*विद्याभवनचा दर्जेदार निकाल*
*विद्याभवन कॉलेजचे घवघवीत यश*
दि. 2 नेरुळ :
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील महाविद्यालयाने मार्च 2026 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत सायन्स शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के व वाणिज्य शाखेचा निकाल ८८.२३ % असे घवघवीत यश प्राप्त केले आहे. विद्याभवनच्या रौप्य महोत्सवी वर्षात निकालाची गौरवशाली यशस्वी परंपरा राखली.
प्रणय अमोल पाटील याने 88.33% मिळवून विज्ञान द्विलक्षी सायन्स शाखेतून प्रथम स्थान मिळवले. श्रेया संजीव महाले आणि समृद्धी रवींद्र तवर या विद्यार्थ्यांनी 87.67 व 86.50% गुण मिळवून या शाखेतून द्वितीय आणि तृतीय स्थान पटकवले.
वेदांत नामदेव मोरे या विद्यार्थ्याने 86.67% गुण मिळवून वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा बहूमान मिळवला. रेन जैनाब प्रवीण मो. सौद आणि राजपुरोहित जिनल जलमसिंग या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 83.33 व 82.17 % गुण मिळवून वाणिज्य शाखेतून द्वितीय व तृतीय स्थान मिळवले.
गौरव दिनेश मिसाळ याने 78.17% गुण मिळवून जनरल विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. वैष्णव सुनील वायकर आणि दुर्वा मिलिंद कदम यांनी अनुक्रमे 76.17 % आणि 74% मिळवून
द्वितीय आणि तृतीय स्थान पटकवले.
पुणे विद्यार्थी गृह कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, अमोल जोशी कार्यवाह संजय गुंजाळ कोषाध्यक्ष कृष्णाजी कुलकर्णी कुलसचिव दिनेश मिसाळ, सर्व संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
09/05/2026
*विद्याभवन माध्यमिक इंग्रजी विभाग*
२०२५-२६ मध्ये झालेल्या ssc परीक्षेचा निकाल दर वर्षीप्रमाणे या वर्षी ही १०० % लागला. सलग २३ एसएससी बॅचेस चा निकाल शंभर टक्के लागत आहे. Congratulations 🙏🏻💐💐🎉🎉💐
08/05/2026
NMMS Competitive exams
Scholarship Rank Holders
(Semi English Medium )
08/05/2026
विद्याभवन माध्यमिक मराठी
2025-26 या शैक्षणिक वर्षातील फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला. 100% निकालाचे हे सलग 23 वे वर्ष आहे.