Shashibooks

Shashibooks

Share

After selling , delivering rare books for 30 years,we are starting free reading cources and art appreciation courses.We have more than ten thousand books

20/12/2025
Mobile uploads 14/10/2025
Photos from Shashibooks's post 23/01/2025
Photos from Shashibooks's post 24/09/2024

संपूर्ण आर्ट पेपरवर छापलेल्या लहान मुलांच्या पुस्तकाचे सौंदर्य काही वेगळेच आहे.

23/09/2024

एकेक खोका उघडताना...

23/09/2024

भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. तीन वर्षांपूर्वी आपण ब्रांच पद्धत मिळवले तेव्हा वर्तमानपत्रात त्याच्या फारशा बातम्या आल्या नाहीत पहिल्या पानावर तर नाहीच. पण आता परिस्थिती बदलली आहे. दृष्टी या आता संगत झालेल्या साप्ताहिक भारत बुद्धिबळ महासत्ता होते आहे अशा आशयाचा मी लेख लिहिला होता. तो इथे देतो आहे.--
जुलै 2018 मध्ये आलेख प्रसिद्ध झाला होता.

बुद्धिबळ महासत्तेकडे
प्रज्ञानंद या अवघ्या बारा वर्ष दहा महिने वयाच्या चिमुकल्या खेळाडूने ग्रॅन्ड मास्टर होण्याचा मान मिळवला आणि जगातील तो दुस-या क्रमांकाचा ग्रॅन्ड मास्टरपद मिळवणारा छोटा खेळाडू ठरला. सर्जी कार्जकिन हा पहिला खेळाडू आज मॅग्नस कार्लसनचा आव्हान वीर होता. त्यामुळे प्रज्ञानंदही भविष्यात मोठी कामगिरी करेल असा अनेकांना विश्वास वाटतो आहे. विश्वनाथन आनंदसारख्या मोठ्या खेळाडूने त्याची चेन्नईमध्ये भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. बुद्धिबळप्रेमींना या सा-यामुळे आनंद न झाला तर नवलच!

सध्या भारतात प्रज्ञानंद धरून ४७ ग्रॅन्ड मास्टर आहेत. यात जर इंटरनॅशनल मास्टरची भर घातली तर ही संख्या शंभर होते. खरं तर रशिया ही बुद्दीबळातील महासत्ता! त्यांच्याकडे आज अडीचशे ग्रॅन्ड मास्टर आहेत; पण रशियन बुद्धिबळाला शंभर-एक वर्षांचा इतिहास आहे. एका कॅन्डीडेट स्पर्धेत म्हणजे जागतिक आव्हानवीर स्पर्धेत आठपैंकी सात खेळाडू रशियन येणारे होते. ही अगदी काल-परवाची गोष्ट!! उच्च दर्जाचं बुद्धिबळ खेळायचं असेल तर अगदी रशियन पुस्तकं वाचण्याला पर्याय नाही किंवा रशियन समजून घेण्यालाही!! खरं तर हा खेळ सुरू झाला तो भारतात- दीड हजार वर्षांपूर्वी...अगदी पाचशे वर्षांपूर्वीच्याही खेळांची नोंद आपल्याला आढळते. राय लोपेझ हा ओपनिंगचा प्रकार पाचशे वर्षांपूर्वी सुरू झाला. गेल्या दोन-तीनशे वर्षातील खेळांची नोंद आपल्याला आढळते. बुद्धिबळ या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे एका छोट्याश्या चिटो-यावरही मोठ्या खेळाचं नोटेशन लिहिल्यामुळे आपण त्याचा रिप्ले पाहू शकतो. मैदानी खेळांप्रमाणे इथे रेकॉर्डिंगची गरज नसते.

इंटरनेटच्या उदयानंतर तर बुद्धिबळाला खूप मोठी उर्जितावस्था लाभली. एक तर खूप प्रकारची सर्च इंजिन्स आली. डीप ब्लू आणि गॅरी कॅस्परोव्ह यांच्या स्पर्धेत जरी कॅस्परोव्हचा पराभव झाला तरी त्यामुळे यंत्र आणि माणूस यांच्या बुद्धीचं कौशल्य आणि फरक यावरच्या संशोधनाला बरीच चालना मिळाली. आज मेंदू विषयक संशोधन करणा-या आणि आरोग्यविषयक अशा वेबसाईटवर बुद्धिबळाचे फायदे आढळतात. त्यात महत्त्वाचं म्हणजे स्मरणशक्तीला चालना मिळणे, तर्कशक्ती विकसित होणे, पॅटर्न्स ओळखणे; यामुळे बुद्धिबळपटू अभ्यासात आणि काहीवेळा आपल्या इतर कामातही प्रगती करतात असे आढळून आले आहे. बिल गेट्सपासून ते आपल्या अमीर खानपर्यंत अनेक क्षेत्रातील दिग्गज रिक्रीएशनसाठी बुद्धिबळ खेळतात. खरंतर बुद्धिबळाचा भारतात इतका जोर असूनही मिडीयाचं त्याकडे फारसं लक्ष नसतं. उदाहरणार्थ, दीडशे देशातील खेळाडू ज्यात उतरतात त्या बुद्धिबळ ऑलंपियाडची बातमीही भारतीय मिडीयामध्ये नसते. अनेक वर्षे जागतिक मिडीयाही हीच स्थिती होती; पण २०१६ साली झालेल्या जागतिक मुकुटासाठी झालेल्या बुद्धिबळाचा खेळ एकशेवीस कोटी लोकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं. यावरून बुद्धिबळ किती लोकप्रिय आहे हे कळतं. चेसबेससारख्या आणि इतर वेबसाईटवर चालू खेळ अनेकदा विश्लेषणासह पाहता येतात. विशेषतः जागतिक मुकुटासाठीच्या खेळांची रनिंग कॉमेंट्री विलक्षण लोकप्रिय आहे.

बुद्धिबळाला इतर खेळांपेक्षा एक वेगळं वरदान लाभलं आहे आणि ते म्हणजे पुस्तकं आणि नेट यांच्या सहाय्याने आपला आपल्यालाच सराव करता येतो किंवा नोटेशनच्या द्वारे तो खेळ आपल्याला पहाता येतो. यामुळेच बुद्धिबळात माणूस एकटाही रमू शकतो. प्रज्ञानंदच्या विजयाची बातमी आली त्याच सुमारस चेसबेसने आणखी एक बातमी प्रसिद्ध केली. ती म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘रॉयल गेम’ या जगप्रसिद्ध कथेची!! स्टीफन झ्वाईग याची ही कथा जागतिक दर्जाच्या निवडक मान्यवर कथांमध्ये अढळ स्थान मिळवून आहे. तुरुंगात असल्यामुळे पुस्तकाच्या सहाय्याने एकट्यानेच प्रचंड सराव केलेला एक अमॅच्युअर बुद्धिबळपटू बोटीवरच्या प्रवासात जगतजेत्याला आव्हान देतो आणि जेरीला आणतो अशी ती कथा आहे. अर्थात विजय जगतजेत्याचाच होतो. पण कथा आपल्याला खिळवून टाकते.

19/09/2024

न्यू अँड सेकंड हॅन्डमध्ये पुस्तक विकत घ्यावीत आणि क्यानी रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त चहा बंद मस्का यांच्यासोबत वाचत बसावी. ते जुने दिवस आठवले. कारण आज सुंदरबाई हॉलमधील प्रदर्शनातून जवळपास 50 एक पुस्तक विकत घेतली. त्यातील एक क्लासिक गाईड टू क्लासिकल म्युझिक. आणि ted hughesचे चरित्र. बाकी पुस्तके पॅकिंगमध्ये बंद आहेत. त्यात लाईफ विथ पिकासोची लेदर बाउंड आवृत्ती आहे आणि मेकॉलेने लिहिलेले इंग्लंडच्या इतिहासाचे पुस्तक आहे शिवाय चार खंडाची जी.एम.ट्रॅव्हलियनने लिहिलेली इंग्लिश सोशल हिस्टरी आहे.

12/09/2024

माजगावकरांची पत्रे



एखादा ग्रंथ हातात पडल्यावर अधाशीपणे वाचावा अशी स्थिती मराठी ग्रंथांच्या बाबत क्वचितच होते. शेवटचं उदाहरण आहे ते अरुण खोपकर यांच्या पुस्तकाचं. ते माझ्या हातात दुपारी पडलं. मी रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे दोन-तीन तास वाचलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाचलं आणि दुपारी अभिजीत ताम्हाणेला तपशीलवार इमेल केलं. हाच माझा इमेल लोकसत्ता परीक्षण म्हणून छापून आला. दिलीप माजगावकर त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त राजहंस प्रकाशनातील सहकाऱ्यांनी दोन खंड प्रसिद्ध केले. पत्रलेखनाचे आणि भाषणांचे.

या पुस्तकाची प्रस्तावना सदानंद मोरे यांनी लिहिली आहे. त्यात त्यांनी ब्रिटिश आल्यापासून छपाईची रेनेसान्सपासून लेखन परंपरा कशी झाली पाहिजे. त्यात ते लिहितात, प्रामुख्याने बायबल आणि धर्मग्रंथांचा प्रसार करण्यासाठी युरोपात आणि आपल्याकडेही इंग्रजांनी मराठी वगैरे फॉन्ट तयार केले. पण याचा फायदा घेणारी मंडळी खूप शिक्षित नसली तरी त्यांनी चांगल्या छपाईचे तंत्र शिकून घेतले. इतकं की टिळकांचा खटला संपल्या संपल्या यंदे नावाच्या गृहस्थांनी त्याचं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर स्वतः. सदानंद मोरे राजहंसच्या कारकिर्दीचा आढावा घेत आणि आपला लोकमान्य ते महात्मा बृहद्ग्रंथ छापताना काय घडलं हे सगळं आपल्याला एका मोठ्या गडाची किल्ली उघडून देतं. या किल्लीत साठ-सत्तर वर्षाचा इतिहास तर आहे पण अगदी ल.न.कडूसारखा साधा माणूस असेल ज्याचं नावही महाराष्ट्राने ऐकलं नसेल. तिथपासून ते विजय तेंडुलकर, विश्वास पाटील, विनया खडपेकर, शेखर ढवळीकर अशा वेगवेगळ्या सेन्सीबिलिटीच्या, प्रवृत्तीच्या माणसांना त्यांनी लिहिलेली पत्रे यात आहेत.

सरिता आवाड यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात. चाळीस वर्षांपूर्वी माझा मुलगा आजारी होता. आजच्या सारख्या इतरत्र काही सोयी नव्हत्या. तेव्हा मी एका मित्राच्या मुलाने काढलेल्या दवाखान्यात गेलो. तिथे रात्री मला सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिले टॉलस्टॉयवरचं स्क्रिप्ट मिळालं. मी सकाळपर्यंत वाचून काढलं. अनेक नंबर शोधले आणि त्यांचा फोन शोधला आणि त्यांना म्हटलं की हे तुम्ही लिहा. आज तुमचं हस्तलिखत वाचल्यावर मला तीच भावना झाली की हिस्टरी रिपीट्स.

अंबरीश मिश्र आपल्या लेखात म्हणतात, गुजराती व्यावसायिक कसा वागतो? तुम्ही किती घेतलं तरी बीजू? म्हणजे अजून काय हवं विचारतो, तसे माजगावकर आहेत. एका दोन अक्षरात त्यांनी माजगावकरांना पकडलं आहे. हे त्यांचं मोठं सामर्थ्य आहे पण अंबरीशसारख्या कलंदर लेखकाकडून लिहून घेणं किंवा अधिक नवीन लेखक कादंबरीकार शोधणे आणि त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे. एके ठिकाणी माजगावकर लिहितात की ‘कवितेची मला प्रचंड आवड आहे पण मी फार कवितासंग्रह काढलेले नाहीत यावरून तुम्हाला माझा व्यावसायिक दृष्टिकोन कळेल’. एकदा स्पष्टपणे तुमच्यावर दबाव येतो का असे विचारल्यावर ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांचं चरित्र माझ्याकडे आलं होतं. पण मी छापलं नाही.

कृष्णमेघ कुंटेसारखा एक विशीचा तरुण येतो. त्याचं हस्तलिखित ठेवून जातो. माजगावकर त्याला म्हणतात की दोन वर्ष लागतील. परत जेव्हा तो येतो तेव्हा तो म्हणतो, मला फुलपाखराच्या अभ्यासासाठी ४-५ महिने परत जायचं आहे. असंच एक इंग्रजी पुस्तक दाखवतो. तसचं दुसरं पुस्तक दाखवून म्हणतो की याला नोबेल पारितोषिक विजेत्याची प्रस्तावना आहे. तेव्हा माजगावकर अलर्ट होतात जसं मुंगूसासमोर साप यावा तसं आणि ते चार-पाच महिन्यात कृष्णमेघ परदेशी जाण्याच्या आत पुस्तक काढतात ते मराठीतले एक ग्रेट पुस्तक आहे. चांगला अभिनेता दुसऱ्याच्या कायेत प्रवेश करतो. चांगला संपादक समोरच्याचं शरीर, मन बघत असताना त्याच्या आतलं पुस्तक शोधत असतो. माजगावकर एके ठिकाणी लिहितात, एका नाटकात असं वाक्य आहे की हत्तीच्या शेपटीचा केस जरी माझ्या ताब्यात मिळाला, माझ्या हातात आला तरी मी त्याला पकडू शकतो. तसचं मी आहे. एखादा जरी चांगला परिच्छेद माझ्या वाचनात आला तरी मी त्या लेखकाला पकडेन. हा जो आत्मविश्वास आणि ग्रेटनेस आहे.

अंबरिश मिश्र यांनी माजगावकरांना असं डीफाइन केलंय की ते मुंबईत येतात, वावरतात पण ते पुणेकर आहेत. मी असं म्हणेन की माजगावकर पुणेकर ही नाही आणि मुंबईकरही नाही. ते ग्लोबल संपादक आहेत. मॅक्सवेल परकिन्स, विलियम मॅकवेल, रॉजर अँजेलो आणि विलियम शॉन या पंगतीत ते बसू शकतात. त्यांच्या इतके वैविध्यपूर्ण लेखन त्यांना लाभले नसतील किंवा चॅलेंजेस् लाभली नसतील. पण त्या सगळ्यांकडे असलेला सकारात्मक भाव आणि लेखकाचा केवळ प्रकाशित नाही तर काउन्सिलर, सायकॅट्रिस्ट आणि प्रसंगी त्याचा मोठा आणि लहान भाऊ होण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. कालपासून हे पुस्तक वाचतोय. राजहंस आणि दिलीप माजगावकर माहीत नसलेल्या माझ्या मैत्रिणीला मी यातला एकच वाक्य वाचून दाखवलं. ते वाक्य विनोबांचं असं होतं की ‘आई तू मला जिवंत असताना खूप काही दिलंस पण तू मेल्यावर जे काही दिले आहेस ते त्याच्या कित्येक पटीने आहे’. आत्म्याचा अविनाशपणा बघण्यासाठी किंवा असं काहीतरी वाक्य आहे तो बघण्यासाठी मला दुसऱ्या पुराव्याची गरज नाही. अनेक वर्षांची माझी मैत्रीण हे ऐकून थक्क झाली. वारंवार या पुस्तकातून या गोष्टी समोर येतात की राजहंसची एक टीम आहे. सदानंद बोरसेंपासून विनया खडपेकरपर्यंत अनेक संपादक आहेत. ही सगळी मंडळी प्रचंड कष्टाने वाचून, विचार करुन स्क्रिप्ट तपासत असतात आणि त्याच्यावर सूचना करत असतात. पण वारंवार ही पत्र वाचताना जाणवतं की माजगावकरांना आवडलेलं, त्यांच्या आतल्या आवाजाने स्विकारलेली पुस्तकं यांचा समावेश राजहंसच्या पुस्तकातून मोठ्या प्रमाणावर होतं.

शेखर ढवळीकरसारख्या उत्तम नाटककाराला लिहिलेलं पत्र असेल, वैशाली करमरकरसारख्या लेखिकेला जिने ‘संस्कृतीरंग’ तर लिहिलाच पण जर्मन भाषेतलं एक अस्सल पुस्तक अनुवादित केलं. त्यावेळी ते जे लिहितात ते महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की तुम्ही या पुस्तकाने झपाटून गेलात. नेमके शब्द मला आठवत नाही पण त्याचबरोबर हे जाणवतं की पूर्ण पत्रात त्या पुस्तकाचं पूर्ण नाव नाही किंवा लेखकांचं. संपादनावर इतकी मेहनत करणाऱ्या मंडळींकडून ही गोष्ट चुकली कशी? माजगावकरांची मुलाखत ही या अंकाचा एक कळसाध्याय आहे. त्यांच्या वैचारिक धारणेपासून ते संपादनापर्यंत अनेक प्रश्न त्यांना विचारले होते. त्यांनी मोकळेपणी उत्तरं दिलेली आहेत. त्यात ते वाचत असलेल्या लेखकांमध्ये शिल्पा कांबळे आणि पंकज भोसले यांच्याही उल्लेख आहे. एकीकडे पूर्णत: दुसऱ्यातलं चांगलं समजून घेणे, ते व्यक्त करायला उद्युक्त करणे त्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून देणे ही विसाव्या शतकातील मोठी प्रकाशनं करत असतात. मौजलाही ते जमलं नाही जे माजगावकरांनी केलेलं आहे.

पण या पुस्तकात सगळ्यात ग्रेट गोष्ट अशी की आनंद अवधानी सारख्यांनीही ज्यांचं लेखन मला कधी भावलं नाही. त्यांनीही नेहरु डायरीचं सगळं प्रकरण अप्रतिम लिहिलंय की अंबरिश इतकाच तोही लेख उत्कृष्ट झालेला आहे. असो कशातले तरी दोष दाखवणं, सिलीपणे त्याच्यावर कॉमेंट करणं ही सोपी गोष्ट आहे. ५०-६०वर्षे एकदा विषय लावून धरुन त्यावर काम करणं ही कठीण गोष्ट आहे. आणि यापुढे कुठल्याही पिढीतून ती होणार नाही. माजगावकर वारंवार सगळ्यांनाच याबद्दल सावधानतेचा इशारा देतात. अगदी भटकळही त्यातून सुटत नाही. ते त्यांना म्हणतात की तुमच्या लेखन पूर्ण करा. रवींद्र पिंगे यांना म्हणतात की मोठ्या माणसांवर लिहू नका. त्यामुळे ती अधिक मोठी होतात.

माजगावकरांमध्ये संपादक, लेखक, चांगला पिता वगैरे अनेक गोष्टींबरोबर जे.कृष्णमूर्ती म्हणतात, सजगता ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर दिसते. त्यामुळेच मी काही वेळा भेटलो पण माजगावकरांना अनेक वेळा भेटलेली माणसे ते वारंवार नमूद करतात की समजा त्यांच्या चेहऱ्यावरची रेषा हालत नाही. या पुस्तकातला आणखी एक गुण म्हणजे मिश्किलपणा. रेखा इनामदार-साने यांना पत्र लिहिताना ते म्हणतात, तुमचे पती राजीव साने यांच्या काही झिरमिऱ्या हलल्या की नाही? किंवा एका ठिकाणी ते म्हणतात साठीला आता इतकं महत्त्व उरले नाही. ७०-७५ ने त्याची जागा घेतलेली आहे. असा एक तिरकस पुणेरी नर्मविनोदेश्वर त्यांच्यासमोर बसणाऱ्यांना कधी आढळला नसेल. पण तो लेखनात पुरेपूर आढळतो. त्यामुळे हे पुस्तक खूप वाचनीय झालेलं आहे. तेंडुलकर असतील तर तो प्रसाद दाभोळकर असतील ते सगळ्यांबद्दल केवळ लेखक म्हणून आदर नाही तर कृतज्ञतेची भावना त्यांच्या पुस्तकात आहे. या पुस्तकात त्यांना आलेली दोन-तीनच पत्र छापलेली आहे. त्यात श्री.पु.भागवत यांचं पत्र आहे. श्रीपुंनी खूप कौतुक केले लोकमान्य टिळक ते महात्माचं. प्रकाशनेही कौतुक केले पण त्याचबरोबर ते पूर्ण पुस्तक इतकं महत्त्वाचं कार्य असलेले हे पुस्तक त्यांनी उघडूनही चाळलेलंदेखील नाही. ही गोष्ट मला खूप खटकते आणि श्रीपुंबद्दल बरंच काही सांगून जाते. मग ते मराठीतले ऋषीतुल्य प्रकाशक आहेत यात शंकाच नाही.

पुस्तकातली अनेक पत्रं पुनःपुन्हा वाचावीत अशी आहेत. माजगावकर जसं लेखकांवर प्रेम आणि कौतुक करतात तसं टीका करतात. याचं उदाहरण म्हणजे रविंद्र पिंगे यांना लिहिलेलं वाचण्यासारखं आहे. पुढे पुढे रविंद्र पिंगे यांच्या लेखनाचा कसदारपणा कसा कमी होत गेला हे त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. पण याच लेखात पिंगे यांच्या लेखासाठी रातोरात मुंबईला जाऊन बाळ ठाकूर यांच्याकडून वेगळं मुखपृष्ट बनवून ते अंकासाठी कसं वापरलं याचाही उल्लेख आहे. प्रकाशन हा बुद्धीजीवी उद्योग असला तरी त्यात मराठी प्रकाशक, संपादक यांना किती शारीरिक मेहनत करावी लागते हे वाचकांना त्यातून कळू शकेल.

पुस्तकाची छपाई, कागद, मुखपृष्ट, आणि मांडणी चांगली झालेली आहे. किंबहुना त्याला चांगलं म्हणणं म्हणजे पी.जी.वूडहाऊसच्या भाषेत ताजमहालला ‘एक बऱ्यापैकी बांधलेली इमारत’ म्हणण्यासारखं आहे.

Want your school to be the top-listed School/college in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Next Vashi Highway. Saibaba Mandir
Navi Mumbai
400703