14/04/2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि दलित बौद्ध चळवळीचे प्रणेते होते अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि कामगार कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. २०२६ मध्ये त्यांची १३५ वी जयंती साजरी होत असून, या दिवशी त्यांचे समता, बंधुता आणि ज्ञानाचे विचार स्मरणात ठेवून या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"
24/09/2025
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! त्रिवार अभिवादन!
आमच्या विद्यार्थ्यांची आणखी एका यशाला गवसणी!
15/08/2025
*श्रीकृष्ण जन्माष्टमी *
गोकुळात रंग खेळतो हरी
कान्हाची लिला न्यारी
माखन चोर, खोडकर बाळ
पण भक्तांचा तो वाली
वेड लावी राधा पाणी
जन्माष्टमीच्या ह्याच क्षणी
भेटे हरी वाटे समाधान ....
दह्यात साखर साखरेत भात
उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ
फोडून हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करू गोकुळाष्टमीचा सण.....
श्रावण महिन्याचा कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा नगरी मध्ये माता देवकी व पिता वासुदेव यांच्या पोटी झाला होता. श्रीकृष्णाला विष्णूचा अवतारही समजतात कारण विष्णू देवाने कंस मामाचा वध करण्यासाठी कृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला होता. भगवान श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात गेले माता यशोदा व पिता नंदन हे श्रीकृष्णाचे पालन करता होते. गोकुळात श्रीकृष्णाने लहान वयात खूप कृष्णलीला दाखवल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाला विविध नावांनी ओळखले जाते जसे की कन्हैया, शाम, गोपाल, केशव, बालगोपाल, नंदलाल,कान्हा, द्वारकेश ,द्वारकाधीश, वासुदेव.
दहीहंडी उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित आहे लहानपणी कृष्णाला दही लोणी आणि दुग्धजन्य पदार्थांची खूप आवड होती. ते आपल्या मित्रांसोबत मिळून दही लोणी चोरत असत. ग्रामस्थ त्यांना पकडायचा प्रयत्न करत पण ते आपल्या मित्रांच्या मदतीने मटकी फोडून त्यातील दही लोणी खाऊन टाकत असे. या गोष्टीचे स्मरण म्हणून दहीहंडी हा उत्सव मोठ्या जोरात साजरा केला जातो.
भारतात विविध प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. काही ठिकाणी जत्रा भरली जाते. तर काही ठिकाणी रासलीलाचे सादरीकरण केले जाते. या दिवशी सर्वांच्या घरी रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. कथा, पुराण ,नृत्य, गीत इत्यादी कार्यक्रम करून जागरण केले जाते. उत्साहासाठी प्रसाद म्हणून गोपाल काला तयार केला जातो. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात गोविंदा आला रे आला म्हणून दहीहंडी फोडली जाते बऱ्याच ठिकाणी दहीहंडीच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात.
"तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दहीहंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंदकिशोर नंद गोपाल "
माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात गोकुळाष्टमीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बरेच विद्यार्थी श्रीकृष्ण बनले आणि तसेच विद्यार्थिनी राधाची वेशभूषा करून आल्या होत्या. कृष्ण कन्हैयाचे अनेक वेगवेगळे रूप आणि राधाच्या अनेक वेगवेगळ्या छबी विद्यार्थिनींनी आपल्या वेशभूषातून सादर केल्या. त्यामुळे विद्यालय कृष्णमय बनले होते व त्याला साथ दिली ती गाण्याने व छोट्या गोविंद पथकाने. मुलांबरोबर मुलींनीही दहीहंडी फोडण्यात सहभाग घेतला आणि आनंद द्विगुणीत करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
(तनुश्री भरत गुंडू).
15/08/2025
अस्सल स्वातंत्र्याचा सुवास ,
दरवळतो या देशात ,
तिरंगाच्या सावलीत ,
अभिमानाने उभा प्रत्येक हात .
१५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे आणि स्वराज्य स्थापनेचे प्रतीक आहे. या दिवशी देशातील लोक , स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहतात . आपण सर्व हा दिवस का साजरा करतो तर आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या महत्त्वाची जाणीव व्हावी , स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागरिकांमध्ये एकता,बंधुता आणि देश प्रेमाची भावना वाढवण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो . त्याचप्रकारे १५ ऑगस्ट हा दिवस विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. म्हणजेच देशभर तिरंगा फडकवणे , शाळा, कार्यालये आणि समाजामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करणे , देशभक्तीवर गाणी , भाषणे आणि परेड त्याचप्रकारे लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भाषण अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात येतो .
स्वातंत्र्याच्या वाटेवरती ,
वाहीला रक्ताचा सागर ,
त्याग , बलिदान , एकतेने
घडला स्वातंत्र्याचा प्रहर .
माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात १५ ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात आला . तसेच विद्यालयातील मुलांनी सामूहिक कवायतीमध्ये सहभाग घेऊन विविध प्रकारच्या कवायती करून दाखविल्या . विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत, नृत्य तसेच भाषण देऊन आपले मनोगत व्यक्त केले . त्याचप्रकारे चेअरमन शंकर शेठ म्हात्रे साहेब यांनी देशभक्तीवर आपले मनोगत व्यक्त केले . आणि सदस्य ज्ञानदेव म्हात्रे व इतर सदस्य उपस्थित होते. व मुख्याध्यापक अनिल भगत सर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते . अशाप्रकारे अतिशय उत्साहात आणि आनंदात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
12/08/2025
https://youtu.be/Jy3PH5zWLOc
कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयातील मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयातील मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..श्रावण सरीत पारंप....
09/08/2025
*पोस्टमन आमचे बांधव, राखी एक अतूट बंधन*
*सण आजचा वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा!*
*नेत्रांच्या निरांजनाने ,भावास ओवाळण्याचा!*
*कृष्ण जसा द्रौपदीस,तसा लाभला तू मला!*
*ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला!*
*असा आनंद सोहळा, तुजवीण सुना!*
*धागा नाही हा नुसता, विश्वास हा तुझ्या माझ्यातला!*
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.
या सणाची एक आख्ययिका आहे की, इंद्र - शची देवी: भविष्य पुराणानुसार, देवांचा राजा इंद्र याला वृत्र असुराच्या हातून पराभव पत्करावा लागला तेव्हा देवगुरु बृहस्पती यांनी शत्रूंपासून (राक्षसांपासून) संरक्षण म्हणून राखी घालण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सची देवी (इंद्राची पत्नी) हिने इंद्राला राखी बांधली.
एका पौराणिक कथेनुसार, राखी ही समुद्रदेवता वरुणाची पूजा करण्यासाठी होती. म्हणूनच, या उत्सवासोबत वरुणला नारळ अर्पण, औपचारिक स्नान आणि जलाशयांवर मेळे भरवले जातात. सहसा मच्छीमार समुद्रदेवता वरुणला नारळ आणि राखी अर्पण करतात - या सणाला नारळी पौर्णिमा म्हणतात.
दिनांक - ८/०८/२०२५ वार - शुक्रवार या दिवशी माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने समाजात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व कार्यक्षम अशा पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन यांना राखी बांधून आपला अनोखा रक्षाबंधना साजरा केला. त्यांच्या कार्याची कृतज्ञता या सणातून विद्यार्थिनींनी व्यक्त केली.तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि सणाचे महत्त्व रुजवण्यासाठी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.विद्यार्थिनींनी राख्या विद्यार्थ्यांना बांधून हा सण साजरा केला. बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून त्याच्या प्रगती आणि दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते व भाऊ आयुष्यभर बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन देतो.
सण हा मांगल्याचा, सण हा प्रेमाचा
सण हा बहीण भावाच्या अतूट नात्याचा
सण हा रक्षबंधनाचा!