Gavkari Parivartan aani Sanshodhan Pratishthan - Mumbai

Gavkari Parivartan aani Sanshodhan Pratishthan - Mumbai Bhartiya Gavkari Parivartan and Sanshodhan Pratithan is a Societal Design Thinking Organization from

Shreemanyogi Shivchhatrapati Shetkari Vidyalay, Gulwanch Republic Day Celebration....
26/01/2026

Shreemanyogi Shivchhatrapati Shetkari Vidyalay, Gulwanch Republic Day Celebration....

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन 🎊💐👏👏         #शाळा  #निकाल
27/05/2024

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन 🎊💐👏👏
#शाळा #निकाल

06/08/2022

Combining simple exercises with math instruction can help ensure that elementary school students remember these lessons.

06/08/2022
Founder President आणि संस्थाचालक कैलासवासी लक्ष्मणराव तुकाराम सानप पाटिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला ह...
04/08/2021

Founder President आणि संस्थाचालक कैलासवासी लक्ष्मणराव तुकाराम सानप पाटिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला.
संस्थेतर्फे चालवण्यात येणा-या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काळे सर, शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत म्हणजे सत्तावीस वर्ष शाळेची धुरा वाहणा-या काळे मॅडम , देशमुख सर, कांगणे सर आणि सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर वर्ग यांचे आभार.

#मराठीशाळा

 #पिधानयुती   आजचा   #चंद्र_मंगळाच्या पिधानयुतीचा चमत्कार !आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण माहिती आहे. प...
17/04/2021

#पिधानयुती

आजचा #चंद्र_मंगळाच्या पिधानयुतीचा चमत्कार !
आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण माहिती आहे. परंतु पिधानयुती हे पण एक प्रकारचे ग्रहणच असते. जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते तसेच मंगळ आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की मंगळ ग्रहण होते या ग्रहणाला पिधानयुती असे म्हणतात !

चंद्र ज्यावेळी एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो. याला पिधानयुती असे म्हणतात. तसे बघितले तर चंद्र रोज कोणत्या ना कोणत्या ताऱ्यासमोरून जातो, पण क्वचित प्रसंगी तो एखाद्या ग्रहासमोरून जातो आणि आपल्याला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार बघायला मिळतो. ‘पूर्ण पिधानयुती’ व ‘स्पर्शीय पिधानयुती’ असे पिधानयुतीचे दोन प्रकार आहेत. पूर्ण पिधानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जातो आणि ग्रहण सुटते तसे चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर येताना दिसतो. हा काळ जवळजवळ एक तासाचा असतो. स्पर्शीय पिधानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाला अलगद स्पर्श करतो. फक्त स्पर्श करत असल्याने हा काळ खूप छोटा असतो.

आज संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी या पिधानयुतीला म्हणजे मंगळाच्या समोर चंद्र यायला सुरुवात झाली . सूर्य आकाशात असल्याने आपण ते बघू शकणार नव्हतो.

सूर्यास्तानंतर ज्यावेळी चंद्र आपल्याला दिसायला लागला , त्यावेळी चंद्राने मंगळाला पूर्ण झाकलेले होते ! साधारण ७ वाजून २१ मिनिटांनी मंगळ चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर यायला लागला . ७ वाजून २७ मिनिटांनी #मंगळ पूर्णपणे बाहेर आला !
असे आणि हेच ते प्रेक्षणीय दृश्य होते !

( मिलिंद पाटील यांची पोस्ट आहे ही)

*लक्षणे दिसू लागल्यावर किती दिवसांनी rtPCR करावी?*  ४ मोठा गहन प्रश्न आहे हा.. आणि अगदी भले भले म्हणजे अगदी काही डॉक्टर ...
15/04/2021

*लक्षणे दिसू लागल्यावर किती दिवसांनी rtPCR करावी?*


मोठा गहन प्रश्न आहे हा.. आणि अगदी भले भले म्हणजे अगदी काही डॉक्टर देखील वेगवेगळे सल्ले देत आहेत.

चला आज आपणच याचे उत्तर शोधुया , आपल्याला मिळालेली नवी माहिती वापरून.

viral load बद्दल काल सकाळी वाचले असेलच ना ? (नसेल तर फिकर नॉट , हि पोस्ट ची लिंक - https://tinyurl.com/yemwuahf)

त्यानुसार लक्षात आलेच असेल कि संसर्ग झाल्याझाल्या (रुग्णाशी संपर्क आला असल्यास ) शरीरातील विषाणूंची संख्या कमी असते आणि ती सतत वाढत असते . विषाणूंनी ठराविक पातळी गाठली कि नैसर्गिक innate इम्युनिटी पूर्णतः कार्यान्वित होते आणि रुग्णाला लक्षणे दिसणे सुरु होते.

प्रवेशित विषाणू (Bolus of infection) संख्या जास्त असेल तर १४ पेक्षा कमी दिवसांमध्ये लक्षणे दिसून आपण आजारी पडणार. आणि जर प्रवेशित विषाणू संख्या बरीच कमी असेल तर तर ते लक्षणांसाठी आवश्यक असलेली ठराविक पातळी गाठणार नाहीत आणि त्यामुळे आपण लक्षणविहीन रुग्ण बनतो.

*आता rtPCR या तपासणी मध्ये काय करतात हे पाहू.*

हि तपासणी विषाणूमधील जैविक घटक म्हणजे RNA शरीरामध्ये आहे कि नाही हे तपासते.

rtPCR ही इतर तपासण्याहून खास आहे.

(या तपासणीच्या तंत्रज्ञानामुळे एच आय व्ही आजाराबाबत खूप सोय झाली होती . शरीरातील एच आय व्ही व्हायरस कितीही कमी असला तरीही या तपासणी मुळे समजते. त्यामुळे लवकर व खात्रीशीर निदान करणे शक्य झाले.)

इतर प्रकारच्या तपासण्या पॉझीटीव्ह येण्यासाठी sample मध्ये जंतूंची संख्या ठराविक पातळीहून (threshold) अधिक असणे आवश्यक असते , नसेल तर टेस्ट मध्ये जंतू पकडले जात नाहीत .

मात्र sample मधील RNA ची संख्या कमी असली तरी देखील rtPCR तंत्रज्ञानाने ती संख्या वाढवली जाते. प्रत्येक सायकल मध्ये संख्या वाढत वाढत threshold पर्यंत पोचते आणि मग टेस्ट पॉझीटीव्ह येते. अर्थात त्यासाठी sample मध्ये RNA असायला मात्र हवा.

sample मध्ये जर RNA कमी असेल तर तर संख्या पुरेशी होण्यासाठी जास्त cycles लागतात . पण टेस्ट कमी RNA मध्येही पॉझीटीव्ह येते . म्हणून तर rtPCR तपासणीमध्ये लक्षणविहीन रुग्ण देखील सापडतात. जे विषाणू अजून रुग्णाच्या इम्युनिटीला सापडलेले नसतात ते विषाणू देखील rtPCR तंत्रज्ञान आपल्याला सापडवून देत. आणि संसर्गाची शृंखला मोडण्यास आपल्याला मदत करते.

जेव्हा रुग्णाला लक्षणे सुरु होतात त्यावेळी विषाणूंची संख्या / viral load जास्त असतो आणि लक्षणे सुरु होताच जर rtPCR केली तर आपण लगेच निदान व उपचार करू शकतो . रुग्णाला आयसोलेट करून प्रसार थांबवू शकतो.

*कोविडची लक्षणे सुरु झाली म्हणजे viral load वाढलेला आहे, त्यामुळे rtPCR लगेच करता येते , अजून ३-४ दिवस वाट बघायची गरज नाही*

वेळेवर तपासणी करुया आणि संसर्ग साखळी तोडूया !



- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M. D. साथरोगतज्ञ , मिरज.

13/04/2021

डॉ. प्रिया प्रभू देशपांडे लिहितात

*Happy Hypoxia आणि ६ मिनिट वॉक टेस्ट (6MWT)*
4

रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ न देणे आणि झालाच तर लगेच ओळखून रुग्णाला ऑक्सिजन देणे हा कोविड मृत्यू टाळायचा मुख्य मार्ग आहे.

बऱ्याचवेळा रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल होताना अगदी नॉर्मल वाटतो पण अगदी काही तासामध्ये रुग्णाचे sPO2 कमी होऊन रुग्ण गंभीर होतो.

कोविडमधील Happy Hypoxia हा अतिशय चिंताजनक प्रकार आहे. नॉर्मल व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजन जरा जरी कमी झाला कि लगेच त्रास जाणवू लागतो. मात्र कोविड मध्ये रक्तातील ऑक्सिजन ९४ च्या खाली गेला तरीही रुग्ण अतिशय फ्रेश असू शकतो.
तसेच विश्रांती घेत असलेल्या रुग्णाचे sPO2 तपासले तर नॉर्मल दिसते, मात्र रुग्णाने थोडी हालचाल केली / बाथरूम ला जाणे किंवा अंघोळ करणे अशी काही कामे केली कि धाप लागते .

असा लपलेला hypoxia म्हणजे लपलेली ऑक्सिजनची कमतरता स्वतःहून शोधण्यासाठी होम आयसोलेशन मधील रुग्णाने ६ मिनिट वॉक टेस्ट दररोज एक ते दोन वेळा करणे आवश्यक आहे. यामुळे रुग्ण नकळत गंभीर होणार नाही व मृत्यू टळेल.

*6MWT कशी करावी?*

१. शक्यतो रुग्ण ही तपासणी करत असताना काळजी वाहकाने (care taker) हजर असावे.
२. रुग्णाने कापडी किंवा सर्जिकल (३ply) मास्क लावावा .
३. टेस्ट सुरु करण्यापूर्वी pulsoxmeter ने ऑक्सिजनची पातळी मोजून नोंद करावी. (पहिली नोंद ९४ पेक्षा कमी असेल तर हि तपासणी करू नये.)
४. त्यानंतर ६ मिनिटे आपण नेहमी चालतो तश्या गतीने खोलीमध्ये चालावे.
५. *६ मिनिटे झाल्यानंतर pulsoxmeter ने पुन्हा ऑक्सिजनची पातळी मोजावी. जर ती ९४ पेक्षा खाली गेली असेल किंवा पहिल्या नोंदीपेक्षा ३ हून अधिक ने कमी झाली असेल तर रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे हे जाणा .*
६. टेस्ट सुरु असताना मध्येच रुग्णाला धाप लागली अथवा इतर काही त्रास जाणवला तर टेस्ट थांबवा व pulsoxmeter ने पुन्हा ऑक्सिजनची पातळी मोजा. वरीलप्रमाणे बदल आढळल्यास रुग्णाला ऑक्सिजनसाठी रुग्णालयामध्ये दाखल करा .
७. वयस्क रुग्णांसाठी हि टेस्ट ३ मिनिटांसाठी करता येते आणि जर सहन होत असेल तरच ६ मिनिटांसाठी करावी .

दिवसातून ३ ते ४ वेळा sPO2 मोजणे व कमीत कमी एक वेळा 6MWT करणे यामुळे रुग्ण घरी असताना गंभीर होणार नाही.
लपलेली ऑक्सिजनची कमतरता देखील आपण वेळीच ओळखू शकू आणि रुग्णाला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी वेळ मिळेल .
6MWT मध्ये बदल आढळल्यास पुन्हा पुन्हा करून पाहू नका.
रुग्णाने पूर्ण विश्रांती घ्यावी, पोटावर झोपावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयामध्ये दाखल करावे .

बसल्या जागी धाप लागणे / छातीमध्ये दाब वाटणे / गोंधळण्याची स्थिती / बोलताना त्रास होणे / शरीराचा भाग निळसर दिसणे अशी गंभीर लक्षणे निर्माण होण्याची वाट न बघता happy hypoxia ला 6MWT ने बेनकाब (unmask) करून रुग्णाला वेळेवर रुग्णालयामध्ये दाखल करुया ! कोविड मृत्यू टाळूया!

होम आयसोलेशन मध्ये 6MWT करायला विसरू नका!

- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. साथरोगतज्ञ , मिरज

#कोविडकाळजी

   choluteca पूल - लॉकडाऊन आणि आपण सारे....Built to Last ही जगन्मान्य उक्ती येणाऱ्या काळात आपल्याला बदलावी लागणार आहे का...
13/04/2021





choluteca पूल - लॉकडाऊन आणि आपण सारे....

Built to Last ही जगन्मान्य उक्ती येणाऱ्या काळात आपल्याला बदलावी लागणार आहे का? नक्की काय म्हणतोय नविन काळे हे वाचा.

लॉकडाऊनच्या काळात 'Business World' मध्ये प्रकाश अय्यर यांचा एक सुंदर लेख वाचनात आला होता. मध्य अमेरिकेत चोलुटेका (choluteca) नदीवर असलेल्या एका ब्रिजची ही गोष्ट. हा ब्रिज ज्या ठिकाणी बांधण्यात आला त्या परिसरात नेहमीच भयानक वादळे होत असतात. त्यामुळे त्या वादळांचा सामना करूनही त्या ब्रिजने पुढील अनेक वर्षे भक्कमपणे उभं राहणे अपेक्षित होते. दोन वर्षांनी त्या ब्रिजचे लोकार्पण करण्यात आले. त्या परिसरातील एक सुंदर व अभिमानास्पद वास्तू म्हणून त्या ब्रिजची ख्याती सर्वदूर पोहोचली. दुर्दैवाने त्या परिसराला त्याच वर्षी एका भल्या मोठ्या वादळाचा तडाखा बसला. सुमारे सात हजार लोकांनी आपला जीव गमावला. त्या परिसरातील सर्व पूल वादळामुळे कोलमडून पडले, अपवाद एकाच ब्रिजचा. त्या वादळातही चोलुटेका ब्रिज भक्कमपणे उभा होता ! पण आता एक वेगळीच गोची झाली होती. त्या ब्रिजकडे जाणारे दोन्ही बाजूंचे रस्ते वादळात वाहून गेले होते. इतकंच नाही तर वादळाचा जोर इतका मोठा होता की त्या ब्रिजखालून वाहणाऱ्या चोलुटेका नदीने आपला प्रवाह बदलला होता आणि आता ती ब्रिजच्या खालून नाही तर त्याच्या बाजूने वाहत होती. चोलुटेका ब्रिज मात्र भक्कमपणे होता - कुणालाही न जोडणारा !
'A bridge over nothing. A bridge to nowhere.'

या घटनेचा संदर्भ देत लेखक आपल्यासमोर एक अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित करतात. अनेक वर्षांचा अभ्यास व अनुभव यांच्या जोरावर उभी राहिलेली आपली 'भक्कम' प्रोफेशन्स, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी कालसुसंगत (relevant) आहेत का? या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेल तर, आपली अवस्था त्या ब्रिजसारखीच झालीय का ?

या लेखाने मला अंतर्मुख केलं. माझ्या आजूबाजूला मी वादळानंतरचे 'चोलुटेका ब्रिज' पाहतोय. त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्या कामात ते अत्यंत कुशल आहेत. पण त्या सगळ्याचा आज काही relevance नाहीये.

काहींना तो बदल झेपला, काहींनी तो मनाविरुद्ध स्वीकारला. लॉकडाऊनमध्ये त्यांनी अशा काही गोष्टी केल्या किंवा त्यांना कराव्या लागल्या ज्याचा त्यांच्या शिक्षणाशी, मूळ व्यवसायाशी, वर्षानुवर्षे सवयीने करत असलेल्या गोष्टींशी काहीही संबंध नव्हता. उच्चपदस्थ लोकांनी भाज्या विकल्या...खडू फळ्याशी सलगी असलेल्यांनी ऑनलाईन वर्ग घेतले. मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यावर ते कदाचित पुन्हा एकदा आपल्या मूळ व्यवसायात / अनुभवात परत जातील. आताच्या परिस्थितीकडे केवळ एक नॉस्टॅल्जिया म्हणून पाहतील.

पण प्रकाश अय्यर यांनी उपस्थित केलेला मुद्दा अधिक मूलभूत आहे. 'कोरोना'कडे केवळ एक तात्कालिक समस्या म्हणून बघायचं नाहीये. आज घडलंय हे उद्याही घडू शकणार आहे. उद्या येणाऱ्या समस्यांसोबत लढायची तयारी आजपासून करावी लागेल आणि या लढाईसाठी 'लवचिकता' (Flexibility) हे सर्वात प्रभावी शस्त्र असणार आहे. आपल्या करियर्सच्या 'ब्रिज'ची दिशा नदीच्या प्रवाहावर अवलंबून असणार आहे. सतत नवीन काही आजमावत राहणं- शिकत राहणं हा नव्या जगाचा मंत्र असणार आहे. डॉक्टर्सना स्वयंपाक शिकावा लागेल, आजीला 'गुगल-पे' शिकावं लागेल, एखाद्या CEO ने रस्त्यावर उभं राहून भाजी विकून पाहावी, माझ्यासारख्या लेखकांनी तांत्रिक उपकरणे दुरुस्त करणे शिकून घ्यावे ! काही निवडक अपवाद वगळता, इंटरनेटमुळे आज हव्या त्या गोष्टी घरबसल्या शिकणे कधी नव्हे इतकं शक्य आहे. आज मी इंजिनियर आहे, पुढची पाच वर्षे मी स्कुबा डायव्हिंग करणार आहे आणि त्यापुढची पाच वर्षे मी फक्त शेफ म्हणून काम करणार आहे... आपल्या करियरच्या बाबतीत अशा ‘बेधुंद' विचारांची कुजबुज मनात होत असतानाच 'कोव्हीड'नेच पुन्हा एकदा त्याकडे आपलं लक्ष वेधलंय.

'Survival of the fittest' मधील 'fittest' शब्दाचा अर्थ डार्विनला 'बलवान' नसून 'अधिक लवचिक' असाच अपेक्षित होता. त्याच न्यायाने, आपला 'Core' भक्कम ठेवून काळाप्रमाणे जो बदलत राहील तोच पुढील जगात यशस्वीपणे टिकेल.
Built to Adapt - not Built to Last - is going to be the new normal !

नविन काळे

मध्य अमेरिकेतील choluteca पूल...

श्रीपाद सबनीस यांच्या वाॅलवरून साभार.

#मराठीशाळा #मराठी

Address

Navi Mumbai (New Mumbai)
400705

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gavkari Parivartan aani Sanshodhan Pratishthan - Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gavkari Parivartan aani Sanshodhan Pratishthan - Mumbai:

Shortcuts

Share