Sachin Usha Vilas Joshi -Education Activist

Sachin Usha Vilas Joshi -Education Activist Educationalist, Founder and Director of Espalier School and Education On Wheels NGO

26/11/2025
14/11/2025

आज ऑफिस मधून लवकर या. का ?
तर हे वाचा..

*मुलांची छोटीशी लिस्ट…*
*पण मोठा संदेश!*
Children’s Day विशेष..
बालमन समजून घेणारा लेख..

काल इयत्ता पहिली - दुसरीतील वर्गावर गेलो. साधारण 60 विद्यार्थ्यांना मी एक साधा प्रश्न विचारला. “घराबाहेरून आई बाबांनी तुम्हाला काय गिफ्ट आणावे असं वाटतं?” अंदाज होता की उत्तरं साधी असतील.
पण पुढच्याच क्षणी त्यांच्या छोट्या हातांनी मला दिलेली wish-list पाहून मन वेगळाच विचार करू लागले.

कुणी म्हणालं –
“मला पियानो पाहिजे.”
कुणी – “सायकल द्या.”
कुणी तर थेट म्हणालं – “मला बाबा बरोबर डान्स करायचाय.”
आणि कुणी स्वप्न बघत होतं की माझे बाबा मला– “मी विराट कोहलीला भेटवणार!”
ही wish-list पहिली ते दुसरीच्या मुलांची. आणि ती पाहताना जाणवलं की मुलं वस्तू मागत असली तरी
प्रत्येक मागणीच्या मागे एक भावना, एक गरज, एक छोटं स्वप्न दडलंय.

*खेळणी म्हणजे फक्त वस्तू नाहीत… ती मुलांची भाषा आहे.*

*पियानो, किचन सेट, डॉल सेट, हॉट-व्हील्स:*
ही खेळणी जणू त्यांची शब्दं आहेत.
मुलं बोलून व्यक्त होण्याआधी, ते खेळून जग समजून घेतात. किचन सेट मागणारी मुलं आईची काळजी आपल्या पद्धतीने imitate करतात.
डॉल सेट मागणारे मुलं मित्र मैत्रिणी सारखी ममता शोधतात. पियानो मागणारा विद्यार्थी कदाचित अंतर्मनातले संगीत शोधतोय.

*सायकल, फुटबॉल, पकडापकडी… मुलांना हवाय ‘मोकळा श्वास’:*
आजच्या स्क्रीनच्या काळात मुलं खेळायला बाहेर येण्याची मागणी करत आहेत, हेच आश्चर्य! सायकल चालवणं, लापाझपी, धावणं — यात मुलं फक्त खेळत नाहीत..
ते जगायला शिकत असतात. पडलं तर उठायचं, हरलं तर पुन्हा प्रयत्न करायचा. हे धडे कुठलीही ऑनलाइन क्लास शिकवू शकत नाही.

*फॅमिली टाइम — मुलांची सर्वात मोठी इच्छा:*
wish-list मधील सर्वात सुंदर मागण्या होत्या—
• “आईस्क्रीम पार्टी”
• “लाँग फॅमिली ट्रिप”
• “डॅडीसोबत डान्स”
• “फॅमिली मूव्ही नाईट”
आजच्या धावपळीत कामात वेढलेले मोठे लोक हे विसरतात की
*मुलांना सर्वात जास्त हवे आहे MOMENTS, वस्तू नव्हे.*

एका छोट्या आईस्क्रीममुळे त्यांना आपुलकी मिळते. एक फॅमिली ट्रिप म्हणजे त्यांच्यासाठी वर्षभराचं सुख. बाबांनी हात धरून नाचलं तर मुलांच्या आत्मविश्वासाला पंख फुटतात.

*विराट कोहलीला भेटण्याची इच्छा:*
मुलांना आजही आदर्श खरे खुरे माणसं आहेत. ना की कार्टून मधले कॅरेक्टर हवेत. त्यांच्या नजरेत विराट म्हणजे मेहनत, शिस्त आणि स्वप्नांच्या मागे लागणं.
मुलांच्या wish-list मधला हा एक मोठा psychological संकेत — ते कोणाला तरी ‘फॉलो’ करतात याचा अर्थ ते स्वतःही काहीतरी बनण्याची इच्छा बाळगतात.

*PS5, iPad, ड्रोन — हे चिंताजनक.*
या wish-list मध्ये हे स्पष्ट होतं की
टेक्नॉलॉजी आणि स्क्रीन मुलांच्या जगाचा एक भाग आहे. स्क्रीन च्या आधारित खेळाची मागणी होती पण तुलनेने ती कमी होती. मला वाटलं की विद्यार्थी कदाचित मला घाबरून मोबाईल स्क्रीनची मागणी करत नसेल पण मी त्यांना मोकळ्या वातावरणात गप्पा मारत असल्याने त्यांना स्क्रीन पेक्षा प्रत्यक्ष अनुभव याची मागणी जास्त होती. मला लक्षात आलं स्क्रीनवर त्यांना बंदी नव्हे, तर मार्गदर्शन हवं.
संतुलन राखलं तर तंत्रज्ञान त्यांच्यातील बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि कौशल्य वाढवेल.
विद्यार्थ्यांना स्क्रीन किती आणि कसा वापरावा त्याचं टाईम लिमिट त्यांनी पाळला तर वंडेर्स घडू शकतात पण हेच लिमिट तुटलं तर प्रचंड नुकसान. म्हणून त्यांना यावर मार्गदर्शन हवं आहे.

*पालकांना लक्षात ठेवा:*
*मुलं खेळणी मागतात, पण खरंतर ते “आपल्याला” मागत असतात.* या wish-list मधले शब्द लहान असले तरी संदेश मोठा आहे. मुलं आपल्याला सांगत आहेत— “आई - बाबांनो, आमच्यासोबत वेळ घाला, हसा, खेळा, आणि आमच्या छोट्या स्वप्नांवर विश्वास ठेवा.”

*अवास्तव खेळनी, अवास्तव मागणी ही चुकीची आहे.* त्या ठिकाणी लाड आणि हवं ते मिळतं हे जात असतात. पण छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा मागणी येते तेव्हा तो चिमुकल्यांच्या आयुष्यातील खेळाचा एक भाग असतो.

आजच्या Children’s Day ला *मुलांसाठी मोठी गिफ्ट म्हणजे*
*महागड्या वस्तू नव्हे*… *आपला वेळ, आपली नजर, आपली मिठी, आणि आपली उपस्थिती.*

आणि हो - *मुलांच्या wish-list मध्ये एकही गोष्ट दिसली नाही— राग, ओरड, दबाव, गृहपाठाचा ताण.*

जग बदलणारे उद्याचे नागरिक आज आपल्याकडून फक्त थोडं हसू, थोडं लक्ष आणि थोडा खेळ मागत आहेत. *त्या साठी LOVE चे स्पेलिंग बदलून ते TIME करा.* *समजलं आज का लवकर घरी यायचं आहे. मुलांना वेळ द्यायला.*

बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

*सचिन उषा विलास जोशी*
शिक्षण अभ्यासक

25/07/2025

Dancing to an AI-created song at our Mud Party! 🎶🤖 But remember — AI can make music, not memories. Real fun happens in real mud! 🧒💃

📢 शेवटची संधी!उद्या संध्याकाळी होणाऱ्या AI for Study Success या विशेष वर्कशॉपसाठी ही अंतिम रजिस्ट्रेशन संधी आहे!हा वर्कश...
11/07/2025

📢 शेवटची संधी!

उद्या संध्याकाळी होणाऱ्या AI for Study Success या विशेष वर्कशॉपसाठी ही अंतिम रजिस्ट्रेशन संधी आहे!
हा वर्कशॉप यावर्षी पुन्हा होणार नाही याची नोंद घ्यावी.

या वर्कशॉपमध्ये कॉलेजपर्यंतचे विद्यार्थी आणि पालक दोघेही एकत्र सहभागी होऊ शकतात, आणि ते शिकतील—

AI वापरून अभ्यासात यशस्वी होण्याचे तंत्र

अभ्यास Interactive, सोपा आणि मजेशीर बनवण्याचे मार्ग

🎯 तुम्ही अजूनही विचारात असाल, तर हीच योग्य वेळ आहे निर्णय घेण्याची.

💻 रजिस्टर करण्यासाठी लिंक वर क्लिक करा –
👉

It appears that the page you are tring to open, does not exist on this website. Please try to find the page in above given links.

🚨 फक्त काही सीट शिल्लक!शिकण्याची पद्धत बदला – AI for Study Successपालक, शालेय विद्यार्थी, कॉलेज तरुणांसाठी शेवटची संधी!आ...
09/07/2025

🚨 फक्त काही सीट शिल्लक!
शिकण्याची पद्धत बदला – AI for Study Success
पालक, शालेय विद्यार्थी, कॉलेज तरुणांसाठी शेवटची संधी!
आत्ताच रजिस्ट्रेशन करा! Link:
https://www.sachinjoshi.co.in/ai-workshop/

02/07/2025

हे तुम्हाला माहिती आहे का?
Where do you stand in the AI journey? Let’s discover how AI can become your child’s personal study assistant and transform learning into a smarter, easier experience!
Link
https://www.sachinjoshi.co.in/ai-workshop/

🎯 Preparing for IIT or NEET?❓ Worried whether you'll pass or not?Then don't miss this game-changing workshop:💡 How to St...
01/07/2025

🎯 Preparing for IIT or NEET?
❓ Worried whether you'll pass or not?

Then don't miss this game-changing workshop:
💡 How to Study with AI
click the link and register for the workshop!
https://www.sachinjoshi.co.in/ai-workshop/
Limited seats – don’t miss out!

Address

Espalier Experimental School
Nashik
422008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Usha Vilas Joshi -Education Activist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sachin Usha Vilas Joshi -Education Activist:

Shortcuts

Share

Category