पेठे विद्यालय नाशिक

पेठे विद्यालय नाशिक Best School in Nashik

29/12/2025
पेठे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका डॉ सुहासिनी पटेल मॅडम ह्यांचे निधन झाले आहे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
26/12/2025

पेठे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका डॉ सुहासिनी पटेल मॅडम ह्यांचे निधन झाले आहे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

पेठे विद्यालयातील सर्व गुरुवर्य शिक्षकांना, शिक्षक दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
05/09/2025

पेठे विद्यालयातील सर्व गुरुवर्य शिक्षकांना, शिक्षक दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏

अभिनंदनीय.. पेठे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री सुधाकर अचवल ब्रिटनमध्ये vinchester शहराचे महापौर झाले आहेत ...🙏🙏
27/05/2025

अभिनंदनीय..
पेठे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री सुधाकर अचवल ब्रिटनमध्ये vinchester शहराचे महापौर झाले आहेत ...🙏🙏

आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक चं.भा. वाड सरांचे अल्पशा आजाराने आज दुपारी (६ फेब्रुवारी) निधन झालं,अंत्ययात्रा स...
06/02/2025

आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक चं.भा. वाड सरांचे अल्पशा आजाराने आज दुपारी (६ फेब्रुवारी) निधन झालं,अंत्ययात्रा संध्याकाळी ५.००वाजता त्यांच्या निवासस्थानापासून निघेल,अंतिम विधी द्वारका बाजूच्या अमरधाम येथे होतील.
🙏🏻त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏻
🌼🌼🌼🌼🌹🌼🌼🌼🌼

उत्तर भारत सहल 1997 मधील सर्व गुरुवर्यांचा फोटो 🙏
06/02/2025

उत्तर भारत सहल 1997 मधील सर्व गुरुवर्यांचा फोटो 🙏

लेख क्रमांक: १४🌹🌹     कै.भालचंद्र शंकर जोशी  नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नावलौकिकात अनेक नामवंत शिक्षकांनी भर घातली. सेव...
12/12/2024

लेख क्रमांक: १४
🌹🌹

कै.भालचंद्र शंकर जोशी

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नावलौकिकात अनेक नामवंत शिक्षकांनी भर घातली. सेवानिवृत्तीनंतर देखील ज्यांनी संस्थेच्या कामात हातभार लावला अशा नामवंत शिक्षकांपैकी एक म्हणजे भालचंद्र शंकर जोशी सर.
श्री.भा. शं. जोशी यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील भडगाव- पाचोरा. इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांच्या मातोश्रींनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये मुलांचे संगोपन करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले.
सरांचे मोठे बंधू श्री.भास्कर शंकर जोशी नाशिकला आले. प्रारंभी ते पेठे विद्यालयात हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करता करता त्यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी पेठे हायस्कूलची नोकरी सोडून एच.पी.टी. महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली.नंतर १९७६ मध्ये श्री.भालचंद्र शंकर जोशी संस्थेच्या नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. ग्रामीण भागातील मुलांना आणि पालकांना समजून घेऊन मार्गदर्शन करणाऱ्या अनेक शिक्षकांपैकी जोशी सर होते. त्यांचा प्रेमळ आणि विनोदी स्वभाव यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सर प्रिय होते. पुढे संस्थेच्या मुख्य शाखेत म्हणजे पेठे विद्यालयात त्यांची बदली होऊन तेथेच सर सेवानिवृत्त झाले. श्री.भा. शं. जोशी हिंदी विषयाचे उत्तम अध्यापक म्हणून सर्वांना परिचित झाले. हिंदी विषयातील व्याकरण अत्यंत प्रभावीपणे आणि सोपे करून शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. हिंदी बरोबरच इतिहास हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. इतिहास विषय बोलका आणि जिवंत करून अत्यंत प्रभावीपणे सर शिकवित. राष्ट्रभाषा हिंदी सर्वांना अवगत व्हावी, यासाठी अनेक उपक्रम सर राबवित. हिंदी राष्ट्रभाषा सभेच्या विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून उत्तम मार्गदर्शन ते करीत.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या अनेक उपक्रमांपैकी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली कै.
गो.ह.देशपांडे वक्तृत्व स्पर्धा समितीवर जोशी सरांनी अनेक वर्षे विविध भूमिकांमधून काम केले. शाळा आणि संस्थेचा नावलौकिक वाढविण्यात ते सतत अग्रेसर असत.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांच्या क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व काम, त्यांनी एक हाती अनेक वर्षे सांभाळले.
अत्यंत साधी राहणी, मिश्किल विनोदी स्वभाव, डोक्यावर गांधी टोपी, जिभेवर साखर आणि सतत कार्यमग्न ही जोशी सरांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. तरुण शिक्षकांशी सुसंवाद साधून शाळा आणि संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी सतत मार्गदर्शन ते करीत असत. एखादा प्रसंग विनोदी शैलीतून सांगून जमलेल्यांचे मनोरंजन करण्याची कला सरांना अवगत होती.
त्यांचे बालपण आणि तरुणपण अत्यंत प्रतिकूल आणि बिकट आर्थिक परिस्थितीत गेल्यामुळे आयुष्यभर काटकसर आणि बचत करण्याची सवय त्यांना लागली होती. आपल्यासारखे कठीण आणि संकटाचे प्रसंग इतरांवर येऊ नयेत म्हणून ते इतरांना मदत करण्याकरिता सदैव पुढे राहत. योग्य ठिकाणी आवश्यक तेवढा खर्च करून बचतीकडे त्यांचा कल असे. बचतीची सवय विद्यार्थ्यांनी देखील अंगीकारावी, असा त्यांचा नेहमी अट्टहास असे.
प्रामाणिकपणे कर्म करीत राहणे आणि चेहऱ्यावर सदैव हास्य असणे ही आनंदी जीवनाची लक्षणे आहेत,असे ते मानत.
एक अभ्यासू, विद्यार्थी प्रिय, शांत, संयमी, मृदुभाषी, व्यवसायाशी प्रामाणिक, निष्ठावंत असे जोशी सर कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील.
नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या लौकिकात भर घालणाऱ्या कै.भालचंद्र शंकर जोशी सरांना विनम्र अभिवादन !

लेखन
शैलेश पाटोळे
पेठे विद्यालय,नाशिक

02/12/2024

विद्यार्थीप्रिय शिक्षक: कै.श्री.बा. कृ.आगाशे
_________________________________

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पायाभरणीत अनेक नामवंत शिक्षकांचा सहभाग आहे. त्यांतील एक नाव.. कै. बालाजी कृष्णाजी आगाशे सर. कै.आगाशे सर पेठे विद्यालय ,असे शाळेचे नामकरण होण्यापूर्वीच्या सेंट जॉर्जेस हायस्कूलमध्ये इंग्रजी आणि संस्कृत विषयाचे उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत होते.
सरांचा जन्म १९०७ सालचा. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए. बी.टी.पर्यंत शिक्षण घेऊन ते सेंट जॉर्जेस हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.
तो ब्रिटिशांच्या आमदानीचा काळ होता. इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन शासनाकडून मिळत असे. परंतु सेंट चार्जेस हायस्कूल मधील धोरणी शिक्षकांनी संस्कृत शिक्षणावर अधिक भर दिला. श्री.आगाशे सर उत्तम संस्कृत शिकवायचे. विद्यार्थ्यांचे सखोल अध्ययन व्हावे,याकडे त्यांचा कटाक्ष असे.विद्यार्थ्यांना समजून घेऊन शिकविण्याची कला त्यांच्याकडे होती. अत्यंत मनापासून व प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य सर करीत.म्हणूनच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सर स्वतः उत्तम वाचक होते. इंग्रजी आणि संस्कृत भाषांमधील ग्रंथांचे सखोल वाचन ते करीत. मुलांना वाचनासाठी प्रेरित करत.अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर कायम प्रयत्नशील असत. श्री.आगाशे सर स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते. अनेक मुलांना सरांनी या खेळाची गोडी लावली. पुढे पेठे हायस्कूलचा क्रिकेट संघ जिल्हाभरात नावारूपास आला होता.
भाषा विषय विद्यार्थ्यांना ते मनोरंजक पद्धतीने शिकवत. शब्द,त्यांचे अर्थ,तसेच एकच शब्द वेगवेगळ्या प्रसंगी कसा वापरावा.. याचे ज्ञान ते विद्यार्थ्यांना देत. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुरेख होते. त्यांचे शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधने असायचे.
श्री.आगाशे सर ज्या काळात शिक्षक म्हणून सेंट जॉर्जेस किंवा पेठे हायस्कूल मध्ये कार्यरत होते, त्याकाळी शाळेची तसेच संस्थेची आर्थिक स्थिती तशी नाजूक होती.अनेकदा शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेसा निधी नसे.तरीदेखील श्री.आगाशे सर,श्री. ठकार सर,श्री. वैद्य सर यासारख्या शिक्षकांनी शाळा सोडली नाही. ज्ञानदानाचे कार्य त्यांनी अविरतपणे चालू ठेवले.
पुढे सेंट जॉर्जेस हायस्कूलचे नामकरण पेठे हायस्कूल असे झाले. शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शाळेचा लौकिक वाढला. लवकरच शहरातील एक नामांकित शाळा म्हणून पेठे हायस्कूल गणले जाऊ लागले.श्री. आगाशे सर १९६७ मध्ये सेवानिवृत्त झाले.सरांचे संस्कार लाभलेले अनेक विद्यार्थी संस्थेत तसेच विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवत आहेत.
नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कै.श्री. बालाजी कृष्णाजी आगाशे सर यांच्या स्मृतींना उजाळा देताना निश्चितच आनंद होत आहे. सरांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा !

शब्दांकन: शैलेश पाटोळे
पेठे हायस्कूल,नाशिक
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पेठे विद्यालयाचे व्यायाम शिक्षक, सगळ्यांचे आवडते केशव उगले सर हे नुकतेच सेवा निवृत्त झाले आहे...सरांना भावी आयुष्यासाठी ...
02/10/2024

पेठे विद्यालयाचे व्यायाम शिक्षक, सगळ्यांचे आवडते केशव उगले सर हे नुकतेच सेवा निवृत्त झाले आहे...
सरांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐

ही कविता म्हणजे शाळेची जुनी आठवण!
30/09/2024

ही कविता म्हणजे शाळेची जुनी आठवण!

Address

Ravivar Karanja
Nashik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पेठे विद्यालय नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category