30/09/2021
भारत सरकार युवा व खेल मंत्रालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या निर्देशानुसार दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019 हा महिना पोषण महा अभियान म्हणून साजरा करण्यात आला पोषण अभियानाअंतर्गत इंदिरा गांधी हॉस्पिटल पंचवटी नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित परिचर्या शिक्षण संस्था आडगाव नाशिक येथील तृतीय वर्ष बेसिक बीएससी नर्सिंग राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गरोदरपणातील घ्यावयाची काळजी, स्तनपानाचे फायदे,नवजात बालकाची घ्यावयाची काळजी या विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.यामध्ये गर्भवती महिलेसाठी उपयुक्त असलेले लोहयुक्त व कॅल्शियम युक्त आहार गरोदरपणात करावयाचे व्यायाम नवजात बालकासाठी स्तनपानाचे फायदे इत्यादी विषयांवर आरोग्य शिक्षण देण्यात आले.
सदर कार्यक्रमास एकूण ५४गरोदर महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाची सुरुवात गरोदर मातांचे औक्षण प्राचार्य अरुंधती गुरव व उपप्राचार्य पूर्णिमा नाईक यांनी केले व कार्यक्रमादरम्यान गरोदर मातांना लोहयुक्त आहार गूळ व शेंगदाण्याची चिक्की वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य अरुंधती गुरव उपप्राचार्य पौर्णिमा नाईक राष्ट्रीय स्वयंसेवक युनिटचे प्रमुख हेमंत डांगे सामाजिक आरोग्य परिचर्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक भूषण ठोंबरे ,मीनल चौधरी व बाल आरोग्य परिचर्या विभागाच्या विभाग प्रमुख सारा टॉमी व तृतीय वर्ष बेसिक बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
सदर कार्यक्रमास इंदिरा गांधी हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय देवकर यांनी गरोदर मातांना मार्गदर्शन केले व श्री भोये यांनी आभार प्रदर्शन केले.
**सदर कार्यक्रमादरम्यान केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या covid-19 या नियमांचे पालन करण्यात आले