08/03/2022
ब्लूम हिल प्रीस्कूल चे नाविन्यपूर्ण 'एज्युकेशनल पॅकेज':
पालकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे -आपल्या मुलाला /मुलीला प्रीस्कूल ऍडमिशन कुठे, का आणि कुठल्या मापदंडावर करावे?
नाशिक चा शैक्षणिक दर्जा जरी चांगला असला तरी पालकांना योग्य प्रीस्कूल निवडणे अवघड जाते. याला कारण म्हणजे वेगवेगळी फी, त्यांना आकर्षित करणारे फॅन्सी वॉल पेन्टिंग्ज,अमेरिकन किंवा इंग्लिश स्कूल पॅटर्न आणि काही मोजके ब्रँडेड नावं.मग बऱ्याच वेळा पालक ह्या कल्पनारम्य अश्या अमेरिकन/इंग्लिश पॅटर्न ला बळी जातात आणि जास्त फी देऊनही फसतात.
प्लेग्रुप,नर्सरी वा केजी मध्ये ऍडमिशन घेताना पालक करिक्युलम कडे आणि तिथे घेतल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल जास्त चौकशी करत नाही.तिथल्या स्टुडन्ट किट (स्कूल बॅग,लंच बॉक्स आणि काही स्टेशनरी साहित्य इत्यादी) वा कार्टून्स ने केलेल्या रंगरंगोटी कडे आकर्षित होऊन बऱ्याच वेळा चुकीचा निर्णय घेतला जातो.बऱ्याचश्या नामवंत प्रीस्कूल आपला एक वेगळा पॅटर्न बनवून तो कॉपीराईट करून घेतात आणि एखाद्या ISO एजन्सी कडून सर्टिफाइड करून आपला 'यूएसपी' अर्थात 'unique selling proposition' बनवून घेतात.
परंतु मुलांना २ ते ६ वर्षापर्यंत मिळणाऱ्या शिक्षणाचे काय? बऱ्याच प्रीस्कूल दोन अडीच तासांच्या दरम्यान मुलांना खेळणी,क्ले,सॅण्ड पिट वा स्प्लॅश पूल ह्या मध्ये जास्त वेळ घालवून इतर महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज कडे दुर्लक्ष करतात.३ वर्ष मुलाचा मेंदू हा प्रौढांपेक्षा अडीच पटीने सक्रिय असतो आणि तो दुप्पट कार्यक्षमतेने एखादे टास्क करू शकतो.अशा वेळेस त्यांना फॅन्सी वर्ल्ड पेक्षा 'प्रॅक्टिकल लाईफ' शिकवणाऱ्या ऍक्टिव्हिटीज दिल्या तर त्यांचा मानसिक विकास झपाट्याने होतो. ब्लूम हिल प्रीस्कूल ने २ ते ६ वयोगटातील मुलांची वर्तवणूक आणि आकलन क्षमतेच्या आधारे आपला 'एज्युकेशनल पॅकेज' बनवला आहे ज्यात मुलांना रूटीन ऍक्टिव्हिटीज शिवाय 'प्रॅक्टिकल लाईफ' शिकवणाऱ्या ऍक्टिव्हिटीज हाताळायला दिल्या जातात. तसेच बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी मनोरंजक परंतु अद्वितीय आणि मेंदूला व्यायाम मिळेल अश्या एक्सरसाईझ दिल्या जातात.
ब्लूम हिल प्रीस्कूल अशी अद्वितीय 'एज्युकेशनल पॅकेज' देणारी भारतातील पहिली प्रीस्कूल ठरली आहे. एवढच नाही तर 'बेबी झुंबा' सुद्धा ह्या प्रीस्कूल चे एक वेगळे आकर्षण आहे.पहिल्या वर्षातच ब्लूम हिल ने दिलेल्या रिझल्ट मुळे पालकांनी भरभरून कौतुक केले आहे.
ब्लूम हिल प्रीस्कूल चे हे नावीन्य अधिक जाणून घेण्यासाठी पालकांनी एकदा तरी ब्लूम हिल च्या कल्पतरू नगर ,अशोका मार्ग स्कूल कॅम्पस ला भेट द्यावी.
मोबाईल: 9987696151