Deoram narayan Patil High School & Jr college, Gangapur

  • Home
  • India
  • Nashik
  • Deoram narayan Patil High School & Jr college, Gangapur

Deoram narayan Patil High School & Jr college, Gangapur the School is setup by Dnyansadhna shikshan prasark sanstha .

देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर मुलींचा टेनिक्काईट संघ राज्यस्तरावर खेळणार .....नाशिक (गं...
20/10/2024

देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर मुलींचा टेनिक्काईट संघ राज्यस्तरावर खेळणार .....

नाशिक (गंगापूर गाव) :-नाशिक विभागीय क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार टेनिक्वाईट यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या विभागीय स्तरावर शालेय टेनिक्काईट स्पर्धा, नंदुरबार या ठिकाणी संपन्न झाल्या.नाशिक , नंदुरबार, जळगाव,धुळे, मालेगाव,या पाच विभागीय स्पर्धेत देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय जुनिअर कॉलेज गंगापूर येथील १४ वर्ष मुली -कुमारी रिया रामकृष्ण पालवे, भुमी भरत कटारे,आरोही जाधव,श्रुती पारधी, दर्शना बागुल खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळवला या सर्व गुणवंत खेळाडू ची पुढील राज्यस्तरीय स्पर्धा गडचिरोली येथे निवड झाली आहे,या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक हिरामण शिंदे व सौ मनिषा जाधव यांचे अभिनंदन ज्ञान साधना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा पाटील उपाध्यक्ष संतू दादा पाटील, सेक्रेटरी श्री हिरामण शिरसाट व संचालक ॲड सुदर्शनभाऊ पाटील, प्राचार्य विठोबा लभडेसर, शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी तसेच गंगापूर पंचक्रोशीतील सर्व पालकांनी अभिनंदन केले.

*देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर डॉजबॉल खेळात चौरंगी मुकूट प्राप्त करून जिल्हास्तरावर प्र...
27/09/2023

*देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर डॉजबॉल खेळात चौरंगी मुकूट प्राप्त करून जिल्हास्तरावर प्रथम विजेता होवून विभागस्तरावर निवड ......🏀🏀🌹🌹*

*नाशिक:-नाशिक क्रीडा कार्यालयाने व नाशिक डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेला प्रारंभ गुरु गोविंद पब्लिक स्कूल या ठिकाणी सतरा वर्ष मुली/ मुली ३० संघ व १९ वर्षे मुले /मुली १७ संघ शाळांनी आपला सहभाग नोंदवला त्या स्पर्धेत देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय जुनिअर कॉलेज गंगापूर १७ वर्ष मुले /मुली व १९ वर्षे मुले/मुली यामध्ये चारही संघांनी घवघवीत यश प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला व विभागीय पातळीवर चारही संघाची निवड झाली या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक (क्रीडाशिक्षक)हिरामण शिंदे यांचे अभिनंदन ज्ञान साधना शिक्षण प्रसार संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा पाटील उपाध्यक्ष संतू दादा पाटील, व संचालक ॲड सुदर्शन पाटील प्राचार्य विठोबा लभडे, शिक्षक व शिक्षकेतर,तसेच गंगापूर पंचक्रोशीतील सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे🌹🌹🌹🌹*

23/02/2023
देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर येथील विद्यार्थी १७, वर्ष अतिल मुलींचा संघ व १९ वर्ष अतिल...
22/11/2022

देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर येथील विद्यार्थी १७, वर्ष अतिल मुलींचा संघ व १९ वर्ष अतिल मुलींचा व मुलांचा संघ विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतांना ज्ञान साधना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.मुरलीधर आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष मा.संतू दादा पाटील, प्राचार्य बी.व्ही, खैरनार,संघ मार्गदर्शक क्रीडाशिक्षक हिरामण शिंदे.व खेळाडू.

ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेचे आदरणीय अध्यक्ष मा. मुरलीधर अण्णासाहेब पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष संतू दादा पाटील संस्...
15/06/2022

ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेचे आदरणीय अध्यक्ष मा. मुरलीधर अण्णासाहेब पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष संतू दादा पाटील संस्थेचे संचालक ॲड सुदर्शन पाटील प्राचार्य बापूराव खैरनार व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज इयत्ता बारावी 1 ते 5 विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला तसेच शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे शालेय पाठ्यपुस्तक देऊन हार्दिक स्वागत अभिनंदन करण्यात आले.

📚 📖 ✒ *देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यू.कॉलेज, गंगापूर , नाशिक* 📚🙏नमस्कार, सर्व सन्माननिय पालक🙏कसे आहात सर्व...
22/05/2021

📚 📖 ✒ *देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यू.कॉलेज, गंगापूर , नाशिक* 📚
🙏नमस्कार, सर्व सन्माननिय पालक🙏
कसे आहात सर्व ? घरीच थांबा आणि सुरक्षित रहा ! आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
*शाळा बंद....पण नवीन प्रवेश आपल्या विद्यालयात ऑनलाईन सुरू झाले आहेत.*
कोरोना (covid-19) च्या साथीमुळे शाळा जरी बंद असली तरी आजच आपल्या पाल्याचा नवीन प्रवेश ऑनलाईन निश्चित करा.
त्यासाठी खालील लिंकला टच/क्लिक करा व संपूर्ण माहिती फॉर्म भरा म्हणजे तुमचा प्रवेश निश्चित होईल
https://forms.gle/ttZu38K7gNzN983o8
👆 उपरोक्त लिंक आपल्या परिसरातील प्रवेश घेवून इच्छिणा-या इतर पालकांना सांगा व आम्हाला सहकार्य करा.
📚📚 *आमच्या गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील शाळेत आपल्या पाल्याचा इयत्ता 5वी ते 10वी साठी आजच प्रवेश निश्चित करा.*

🙏🙏📚📚⚽🏏🥅🤼‍♀️🏆
*सर्व भौतिक सुविधा*
*शालेय पोषण आहार योजना शुद्ध पेयजलासह*
*विविध शिष्यवृत्ती योजना*
*विविध शालेयउपक्रम*
*भव्य क्रीडांगण*
*कला ,क्रीडा शिक्षण सुविधा*

*श्री.खैरनार बापूराव वामनराव*
मुख्याध्यापक ,
दे .ना. पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर, गंगापूर नाशिक
मो.नं - 8805810923
*श्री. बैरागी टिकमदास*(पर्यवेक्षक) 7841810677 .

शाळा प्रवेश हा नवीन प्रवेशासाठी फक्त 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.सदर प्रवेश हे मराठी किंवा सेमी इंग्रज...

74  वा स्वातंत्र्य दिवस आज विद्यालयात कोरोना चे पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व सर्व काळजी घेऊन  साजरा करण्यात आला याप्रसंग...
15/08/2020

74 वा स्वातंत्र्य दिवस आज विद्यालयात कोरोना चे पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व सर्व काळजी घेऊन साजरा करण्यात आला याप्रसंगी ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष मा.मुरलीधर अण्णा पाटील यांचे हस्ते संपन्न झाला . कोरोना प्रादुर्भाव मूळे शाळा बंद असल्याने तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू आहे परंतु गरजू मुलाचे शालेय पुस्तकांची अडचण लक्षात घेऊन सीनर्जी राऊंड टेबल 245 ,नाशिक या सामाजिक संस्थेने शाळेतील सुमारे 20 गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके उपलब्ध करून दिले त्याचे त्यानिमित्ताने प्रतिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास मा.अध्यक्ष अण्णासाहेब पाटील,उपाध्यक्ष श्री संतू दादा पाटील, संचालक श्री सुदर्शन पाटील, श्री हेमंत पाटील, राउंड टेबल चे अध्यक्ष श्री.प्रशांत दुधेडिया, श्री अविनाश आव्हाड, श्री प्रतीक भारद्वाज, श्री अमोल मिश्रा, श्री चांदवानी, नगरसेवक श्री विलासजी शिंदे,श्री पिके जाधव, श्री ज्ञानेश्वर पाटील,श्री दत्तात्रय डंबळे,श्री हरिभाऊ गभाले, श्री अशोक कस्तुरे, श्री अरुण पाटील , प्राचार्य श्री बी व्ही खैरनार, श्री बैरागी सर, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

📚 📖 ✒ *देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यू.कॉलेज, गंगापूर , नाशिक* 📚🙏नमस्कार, सर्व सन्माननिय पालक🙏कसे आहात सर्व...
26/04/2020

📚 📖 ✒ *देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यू.कॉलेज, गंगापूर , नाशिक* 📚
🙏नमस्कार, सर्व सन्माननिय पालक🙏
कसे आहात सर्व ? घरीच थांबा आणि सुरक्षित रहा ! आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
*शाळा बंद....पण नवीन प्रवेश आपल्या विद्यालयात ऑनलाईन सुरू झाले आहेत.*
कोरोना (covid-19) च्या साथीमुळे शाळा जरी बंद असली तरी आजच आपल्या पाल्याचा नवीन प्रवेश ऑनलाईन निश्चित करा.
त्यासाठी खालील लिंकला टच/क्लिक करा व संपूर्ण माहिती फॉर्म भरा म्हणजे तुमचा प्रवेश निश्चित होईल

https://forms.gle/oj2CykUZastbCWJ39

👆 उपरोक्त लिंक आपल्या परिसरातील प्रवेश घेवून इच्छिणा-या इतर पालकांना सांगा व आम्हाला सहकार्य करा.
📚📚 *आमच्या गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील शाळेत आपल्या पाल्याचा इयत्ता 5वी ते 10वी साठी आजच प्रवेश निश्चित करा.*

🙏🙏📚📚⚽🏏🥅🤼‍♀️🏆
*सर्व भौतिक सुविधा*
*शालेय पोषण आहार योजना शुद्ध पेयजलासह*
*विविध शिष्यवृत्ती योजना*
*विविध शालेयउपक्रम*
*भव्य क्रीडांगण*
*कला ,क्रीडा शिक्षण सुविधा*

*श्री.खैरनार बापूराव वामनराव*
मुख्याध्यापक ,
दे .ना. पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर, गंगापूर नाशिक
मो.नं - 8805810923
*श्री. बैरागी टिकमदास*(पर्यवेक्षक) 7841810677

शाळा प्रवेश हा नवीन प्रवेशासाठी फक्त 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.सदर प्रवेश हे मराठी किंवा सेमी इंग्रज...

देवराम नारायण पाटील हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे क्रिडाशिक्षक मा.श्री.हिरामणजी शिंदे सर यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय...
09/02/2020

देवराम नारायण पाटील हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे क्रिडाशिक्षक मा.श्री.हिरामणजी शिंदे सर यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!

देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर या शाळेतील कु भास्कर बेंडकोळी  ६०किलो वजनगटातील कुस्तीमध्...
30/08/2019

देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गंगापूर या शाळेतील कु भास्कर बेंडकोळी ६०किलो वजनगटातील कुस्तीमध्ये नाशिक जिल्ह्यात प्रथम निवड झाली व विभागस्तरावर निवड झाल्याबद्दल ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा मुरलीधर आण्णा पाटील,संतू दादा पाटील हिरामण शिरसाट ,अँड सुदर्शन पाटील,यांनी खेळाडू भास्कर बेंडकोंळी व त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,सर्व शिक्षक व क्रीडाशिक्षक हिरामण शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

Address

At & Post Gangapur
Nashik
422222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deoram narayan Patil High School & Jr college, Gangapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category