28/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथील विद्यार्थी कु.प्रसाद शरद ढाकणे याने उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई तसेच नाशिक ग्रामीण या दोन्ही ठिकाणी येथे यशस्वी निवड मिळविली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी ढाकणे याचा सत्कार करत त्याच्या परिश्रम, चिकाटी व जिद्दीचे विशेष कौतुक केले तसेच त्यास भावी सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
14/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य शाखेचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. विनीत रकिबे उपस्थित होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. आपल्या मनोगतात त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम तसेच स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा अभ्यासपूर्ण आढावा उपस्थितांसमोर मांडला. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संतोष बोडके यांनी केले.
14/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथील माजी विद्यार्थी धनंजय मधुकर चौधरी याने उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्र पोलीस दलाच्या कारागृह विभागात, पुणे येथे यशस्वी निवड मिळविली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी धनंजय चौधरी याचे अभिनंदन करत त्याच्या कठोर मेहनत, जिद्द व चिकाटीचे कौतुक केले. तसेच भावी सेवाकार्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही धनंजयवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
13/05/2026
ऐतिहासिक कामगिरी!
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी कु. अभिजीत भालेराव यांनी १ मे ते १२ मे या कालावधीत भारत ते नेपाळ असे एकूण १६५५ किलोमीटर अंतर धावत पूर्ण करून Guinness book of world record च्या माध्यमातून जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्षा डॉ. स्मिता हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरिष आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे व डॉ. अद्वय हिरे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. योगिता हिरे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सूचिता सोनवणे, क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ दिनेश कराड व श्री किशोर राजगुरू,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
07/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथील मानसशास्त्र विभागातील प्रथम वर्ष पदवीचा विद्यार्थी कु.धीरज धनंजय भोये याने उल्लेखनीय यश संपादन करीत पुणे येथे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदासाठी यशस्वी निवड मिळविली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी धीरज यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले तसेच त्यास भावी सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. के. कन्नोर उपस्थित होते, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
06/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथील इतिहास विभागातील विद्यार्थी संतोष लहारे याने उल्लेखनीय यश संपादन करीत मिरा भाईंदर येथे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी यशस्वी निवड मिळविली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी संतोष लहारे याचे अभिनंदन करून त्याच्या परिश्रम, चिकाटी व जिद्दीचे विशेष कौतुक केले तसेच त्यास भावी सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
06/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथील कला विभागातील पदवीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी कैलास बाळू बहिराम याने उल्लेखनीय यश संपादन करीत कोल्हापूर येथे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी यशस्वी निवड मिळविली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी कैलास बहिराम याचे अभिनंदन करून त्याच्या परिश्रम, चिकाटी व जिद्दीचे विशेष कौतुक केले तसेच त्यास भावी सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
05/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथील माजी विद्यार्थी कु. रोशन दत्तू कापसे याने उल्लेखनीय यश संपादन करत मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र पोलीस दलात यशस्वी निवड मिळवली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी कु. कापसे यांचे अभिनंदन करत त्यांच्या परिश्रम, चिकाटी व जिद्दीचे कौतुक केले तसेच पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला.
#अभिनंदन #यशोगाथा #महाराष्ट्रपोलीस #निवड #विद्यार्थीयश
05/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील कनिष्ठ क्रीडा विभागातील विद्यार्थिनी कु. भूमिका संजय नेहते हिने कर्नाटक राज्यातील तुमकुर येथे दि. २४ ते २६ एप्रिल दरम्यान आयोजित २४ वी राष्ट्रीय ज्युनियर (U-20) अॅथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तसेच ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.आतापर्यंत कु. नेहते हिने २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत विविध पदकांची कमाई केली आहे. तिच्या या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय यशाच्या जोरावर हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे.
कु. नेहते हिच्या या यशाबद्दल जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्षा डॉ. स्मिता हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरिष आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे व डॉ. अद्वय हिरे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. योगिता हिरे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सूचिता सोनवणे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#क्रीडायश #अभिनंदन #राष्ट्रीयस्पर्धा #अॅथलेटिक्स #सुवर्णपदक #रौप्यपदक #विद्यार्थीयश #एमजीव्ही #नाशिक #पंचवटी #प्रेरणा #गौरवक्षण
04/05/2026
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता बारावी (एच. एस. सी.) चा निकाल ९२.४६ % इतका लागला आहे.
शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे – कला शाखा ८३.९४ %, वाणिज्य शाखा ९३.७२% आणि विज्ञान शाखा ९९.१२ %. या निकालात सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्षा डॉ. स्मिता हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, डॉ. अद्वय हिरे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. योगिता हिरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व उपप्राचार्या डॉ. सुचिता सोनवणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#बारावी_निकाल #एचएससीनिकाल #निकाल2026