Deva Institute for Administrative Careers

Deva Institute for Administrative Careers

Share

A coaching institute for MPSC / UPSC

06/12/2019

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!

01/12/2019
31/10/2019

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल स्मृती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन

30/08/2019

*NCERT नवीन बॅच 5 सप्टेंबर, 2019 सुरू*

(UPSC, MPSC, SSC, RRB इत्यादी परीक्षा देणार्‍या उमेदवारांसाठी उपयुक्त)

कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पाया पक्का असावा लागतो आणि असा हा पाया शालेय अभ्यासक्रमात पूर्ण होत असतो, आणि त्या गोष्टींची उजळणी करण्यासाठी आणि परिपूर्ण तयारी करण्यासाठी NCERT ची पुस्तके उपयुक्त ठरतात.

*NCERT कोर्स कोण करू शकते?*

1) ज्या विद्यार्थ्यांना भावी जीवनात कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा द्यावयाची आहे, असे सर्व विद्यार्थी जे इयत्ता 8 वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण (मराठी तसेच इंग्रजी माध्यामातून घेतले आहे) घेत आहेत किंवा घेतले आहे.

2) पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले स्पर्धक जे आगामी काळात स्पर्धा परीक्षा देणार आहेत.

*NCERT कोर्स का करावा?*
सामान्यतः सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये NCERT पुस्तकांमधील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी ही बॅच अतिशय उपयुक्त.

*कालावधी*
2 महिने

(दररोज 2 विषयांच्या तासिका)

दररोज 30 मिनिटांची सराव परीक्षा.

NCERT वर आधारित भरपूर प्रश्नांचा सराव.

*विषय*
इतिहास (History)
भूगोल (Geography)
अर्थशास्त्र (Economics)
राज्यशास्त्र (Polity)
समाजशास्त्र (Sociology)
सामान्य विज्ञान (General Science)

*बॅच सुरू*
5 सप्टेंबर, 2019

*महत्त्वाचे*
NCERT कोर्स करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना *NCERT ची सर्व आवश्यक पुस्तके मोफत.*

*अधिक माहिती साठी संपर्क*
इंजि. देवानंद किशोर पाटील
9067788799
8956788799

*पत्ता*
देवा इन्स्टिटय़ूट फॉर अॅडमिनीस्ट्रेटीव्ह करिअर्स,
प्लॉट नंबर 7, यशस्वी क्लासेस बिल्डिंग, दुर्गा नगर, त्रिमूर्ती चौक, नाशिक - 422 008.

26/08/2019

DIAC Way to Success Series

कास पठार:

महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.

कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

याबरोबरच महाराष्ट्रातील आपली 7 आश्‍चर्ये

1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
2) कास पठार
3) ग्लोबल विपश्यना पॅगोडा
4) लोणार सरोवर
5) रायगड किल्ला
6) देवगिरी किल्ला
7) अजिंठा लेणी
Deva Institute for Administrative Careers, Nashik.
9067788799

29/07/2019

*भारतात 2967 वाघ*

*जागतिक वाघ दिवस* - *29 जुलै*
2010 मधील *सेंट पीटर्सबर्ग समीट* येथे 29 जुलै हा जागतिक वाघ दिवस ठरवण्यात आला त्यानुसार तो साजरा केला जातो. त्या परिषदेत 2022 पर्यंत जगातील वाघ दुप्पट करण्याचे ध्येय ठरवण्यात आले.

*भारतीय व्याघ्र गणना - 2018*

रिपोर्ट चे नाव - *(Status of Tiger in India - 2018)*
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 जुलै, 2019 रोजी व्याघ्र दिनाचे औचित्य साधून या अहवालाचे प्रकाशन केले त्यावेळी ते बोलत होते की 5 वर्षांमध्ये व्याघ्र संरक्षित क्षेत्रांची संख्या 692 वरुन 860 वर जाऊन पोचली आहे.

*भारतातील वाघांची संख्या -*
वर्ष 2008 - 1411 वाघ
वर्ष 2010 - 1706 वाघ
वर्ष 2014 - 2226 वाघ
वर्ष 2018 - 2967 वाघ

*Deva Institute for Administrative Careers,* Nashik.
9067788799

Deva Institute for Administrative Careers A coaching institute for MPSC / UPSC

11/07/2019

Way To Success Series...

*Ministry of Jal Shakti* *(जलशक्ती मंत्रालय)*

*(पूर्वीचे पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मंत्रालय)*

The Ministry of Drinking Water and Sanitation was a ministry of the Government of India formed in 2011. *From May 2019, the ministry has been merged with the Ministry of Jal Shakti.*
In 1999, the Department of Drinking Water Supply (DDWS) was formed under Ministry of Rural Development, for focused attention on drinking water and sanitation. Later it was renamed as Department of Drinking Water and Sanitation in 2010. In 2011, it was conferred the Ministry status, keeping in view the extreme importance given to the sector by the United Progressive Alliance government. The Ministry of Drinking Water and Sanitation was the nodal department for the overall policy, planning, funding and coordination of programmes of drinking water and sanitation in the country.

*Responsibilities-*

The ministry was responsible for the implementation of Swachh Bharat Abhiyan in *rural India*. It got 8 million toilets constructed surpassing the target of 6 million toilets for the year 2015-16.

*Important about Swachh Bharat Abhiyan*

Implementation of Swachh Bharat Abhiyan in *Rural India* is the responsibility of *Ministry of Jal Shakti*.

Implementation of Swachh Bharat Abhiyan in *Urban India* is the responsibility of *Ministry of Housing and Urban Affairs*.

*Deva Institute for Administrative Careers,* Nashik.
9067788799
https://www.facebook.com/SSSFDIAC/?ti=as

Deva Institute for Administrative Careers A coaching institute for MPSC / UPSC

Photos 17/04/2019

⬆️

Photos 11/04/2019
29/03/2019

Diac Nashik Way to Success Series

अभिजात भाषा (Classical Language)-

एखादया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेच्या अभ्यासासाठी आणि जतनासाठी सर्वोत्तम केंद्र स्थापन करण्याचा मार्ग खुला होतो आणि आर्थिक साहाय्य मिळून त्या भाषेतील सर्वोत्कृष्ठ २ विद्वानांना बक्षिसे मिळण्याची तरतूद केली जाऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केंद्रीय विद्यापीठांमध्ये त्या भाषेचे व्यावसायिक पदे निर्माण करण्यासाठी विनंती करता येऊ शकते.

एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी १५००-२००० वर्षांपूर्वीचे लिखित पुरावे असणे आवश्यक आहे. तसेच साहित्यिक परंपरा या मूळ असाव्यात.

२००४ साली भारत सरकारने या प्रकारचा दर्जा देण्यास सुरुवात केली.

२९ मार्च, २०१९ अखेर ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे.

भाषा (दर्जा मिळाल्याचे वर्ष)
१) तामिळ (२००४)
२) संस्कृत (२००५)
३) तेलगू (२००८)
४) कन्नड (२००८)
५) मल्याळम (२०१३)
६) उडिया (२०१४)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.

२००० वर्षांपूर्वीचा सप्तशती हा मराठीतील पहिला ग्रंथ अलीकडेच सापडला आहे.

लेखन आणि संकलन - टीम देवा इन्स्टिटयूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅरिअर्स, नाशिक

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


DIAC, 2nd Floor, Yashaswi Classes Building, Durga Nagar, Trimurti Chowk, CIDCO, Nashik/08
Nashik
422008

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm