29/03/2024
आज दिनांक 28 मार्च 2024 रोजी मनपा शाळा क्रमांक 14 व 15, मखमलाबाद गाव, नाशिक येथे शाळा प्रवेशोत्सव व पट नोंदणी अभियानाचे उद्घाटन मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा. श्री बी. टी. पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी URC प्रमुख तथा केंद्रप्रमुख मा. सुनील खेलुकर सर, केंद्र क्रमांक १ चे केंद्रप्रमुख श्री.दीपक पगार सर, साहेबराव महानुभाव सर, प्रकाश शेवाळे सर, दीपक मानकर सर, छाया माळी मॅडम, श्रुती हिंगे मॅडम तसेच शाळा क्रमांक 14 चे मुख्याध्यापक झाडे सर, शाळा क्रमांक 15 च्या मुख्याध्यापिका नंदिनी ठाकरे मॅडम, सर्व शिक्षक वृंद , पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. मा.बापूसाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते फीत कापून प्रवेशोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या वेळी फुगे आकाशात सोडण्यात आले. तसेच शिक्षणाची ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. मखमलाबाद शाळा ते गाव या परिसरात बैलगाडीवर दाखलपात्र विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, प्रवेश दिंडी, शैक्षणिक गाणे, घोषणा याद्वारे पालकांना मनपा शाळेतच आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा व यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी
मखमलाबाद व म्हसरुळ शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रवेश उत्सव पथनाट्य तसेच मतदान जागृती पथनाट्य सादर केले. पंचवटी विभाग कलापथक व शाळेतील शिक्षक व शिक्षिकांनी मनपा शाळेत प्रवेश का घ्यावा याची जागृती पालकांमध्ये करण्यासाठी दमदार शिक्षण पोवाडाविविध गाणी,दिंडी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दोन्ही पथनाट्य तसेच शिक्षिकांनी सादर केलेल्या पोवाड्यास रोख रकमेचे बक्षीस देवून त्यांचे कौतुक केले. यावेळी केंद्र क्रमांक एक च्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर हैंडल व youtube channel या समाज माध्यमांच्या अकाउंट चे अनावरण ही मा. शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पहिली प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वागत व नोंदणी सुद्धा मा. शिक्षणाधिकारी साहेबांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी वासुदेव, सर्व धर्म समभाव यासारख्या विविध आदर्श व्यक्तिमत्त्वांची वेशभूषा करून दिंडीत सहभाग नोंदवला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग, आनंदवली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. आपला बहुमोल वेळ देवून आमच्या शाळेच्या प्रवेश उत्सवास उपस्थित राहिलेल्या आदरणीय पाटील साहेब व सर्व मान्यवरांचे मनपा शाळा क्रमांक 14 व 15, मखमलाबाद गाव टीम यांच्याकडून मनःपूर्वक धन्यवाद.केंद्र प्रमुख श्री दीपक पगार सर यांनी मनपा १४ व मनपा १५ या दोन्ही शाळांच्या लेझीम पथकाला प्रत्येकी रूपये ५०१/- रुपयांचे रोख पारितोषिक दिले 🙏🙏