29/09/2016
साद प्रकाशनाकडून
लवकरच प्रकाशित होत असलेल्या चालू घडामोडी २०१७ या पुस्तकातून साभार:-
------------------------
* भारतात कर्नाटक राज्यात पहिले आरोग्य न्यायालय जुलै 2016 मध्ये स्थापन करण्यात आले. आरोग्य न्यायालयांची सर्व प्रथम स्थापना न्यूझीलँड येथ मांडली गेली
* जळगावची केळी,मराठवाड्यातील केसर आंबा,भिवापूर (नंदुरबार) मिरची,डहाणू घोलवड चा (पालघर) चिकूआणि आंबेमोर (पुणे) तांदूळ या पाच शेतमालाना भौगोलीक निर्देशक चिन्ह मिळाले.यापूर्वी महाराष्ट्रातील १८ शेतमालास जीआय मिळाले असून एकून २३ जीआय मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले
* मार्च २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची सुरुवात केली . या योजनेनुसार सन २०२२ पर्यंत देशात ५० कोटी कुशल मनष्यबळ तयार करण्याचे लक्ष निश्चित केले
* अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील ‘कस्र-ए-स्तोर’ या नूतनीकृत राजवाडय़ाचे मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी संयुक्तरीत्या उद्घाटन केले.
* महाराणा प्रताप यांच्या ४७५ व्या जन्मदिनी महाराणा इंडिया रिझर्व बटालियन अशी नवी फलटण स्थापन करण्यात आली
* भारतातील इंटरनेटच्या वापराने अमेरिकेला मागे टाकले असून दुसर्या स्थानावर झेप घेतली. सध्या भारतात 35 कोटी लोक इंटरनेट वापरतात. चीननंतर भारताचा इंटरनेट वापरात दुसरा क्रमांक लागतो भारत ही इंटरनेटची जगातील सर्वात जलदीने वाढणारी बाजारपेठ आहे
* एखादी व्यक्ती ,कुटुंब,वर सामाजिक बहिष्कार टाकणे किवांवाळीत टाकणे या प्रकारांनारोखण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेत महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे सरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले.अशा प्रकारचा कायदा आणून सामाजिक बहिष्कार हा प्रकार गुन्हा ठरविणारे महाराष्ट्र हे देशांतील पहिले राज्य ठरले .या कायद्यातील तरतुदीनुसार संबधीत गुन्हेगारांना ३ वर्ष तुरुंवास आणि १ लाख रु.दंड अशी तरतूद
* देशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिल्या दहा राज्यांत महाराष्ट्राचा नववा क्रमांक लागतो. परंतु परदेशी पर्यटकांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन्ही श्रेणीत तमिळनाडू प्रथम क्रमांकावर
* स्वच्छ भारत अभियानां‘तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर राज्यात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्त होण्याचा प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला
* डेंगी या आजारावीरोधातील जगातील पहिली सार्वजनिक लसीकरण मोहीम फीलीपाईन्समध्ये सुरु करण्यात आली
* डीसीबी बँकेने आधार सक्षम एटीएम बंगळूर येथे सुरु केले.हे एटीएम मशीन आधारकार्डवर कार्यान्वीत होईल.या एटीएम मधून रोख रक्कम काढण्यासाटी एटीएम कार्डची आवश्कता असणार नाही
* जगातील पहिले ई टॉयलेट तिरुअनंतपुरममधील पुल्लूविला या गावात उभारण्यात आले
* 105 वर्षांच्या कुंवरबाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’च्या अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. कुंवरबाई यांनी आपल्या घरात शौचालय बांधण्यासाठी आपल्या बकरी विकल्या होत्या.
* स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केल्यापासून निर्माण झालेली पश्चिम बंगा या राज्याचे अधिकृत नाव "बंगाल‘ असे करण्यात आले. मंजूर झालेल्या ठरावानुसार, "पश्चिम बंगाल‘चे नाव आता बंगाली भाषेत "बांगला‘, इंग्रजीमध्ये "बेंगाल‘ आणि हिंदीमध्ये "बंगाल‘ असे असणार आहे.
* ओडीशातील राष्ट्रीय भात संशोधन संस्था , कटक येथे सीआर तांदूळ ३१० ही भाताची नवीन जात विकसित केली .या प्रजातीमध्ये ११% प्रधीने आहेत
* पर्यटन प्रोत्साहनासाठी 2014-15 चा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला