02/06/2026
Shreeram Vidyalaya,Panchavati,Nashik
Shree Ram Vidyalaya was established on 13th June 1960. Now we have our Junior College. This is group of the students from one of the best school in the nashik
02/06/2026
95-96 Batch Get together.
21 वर्षांनी शाळेची घंटा पुन्हा वाजली श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी नाशिक या शाळेमध्ये शिकणारे 2005 सालच्या (10 वी अ) बॅचने सुमारे 21 वर्षानंतर गेट-टुगेदर चा कार्यक्रमचे आयोजन केले होते,या कार्यक्रमांमध्ये 21 वर्षा पूर्वी असलेले सर्वे प्राध्यापकांना बोलण्यात आले होते तसेच तरुण ऐक्य मंडळ संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मुखेडकर,सेक्रेटरी कारभारी मुखेडकर तसेच मुख्याध्यापक सुधीर नवसारे उपमुख्याध्यापक उमेश आठवणे पर्यवेक्षक काशिनाथ जोपळे व या सह सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते, सर्व कार्यक्रम छान रित्या पार पडला व सर्व विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन सर्व विद्यार्थ्यांनी केलेले होते कार्यक्रम चांगल्या रित्या पार पाडण्याचे विशेष सहकार्य विशाल भोसले तेजस हिंगमिरे सुमित मुंडे नकुल मत्स|गर किरण पानकर अमोल बैरागी नीलिमा पवार कीर्ती जगताप गौरी पगारे कांचन पाटील पुष्पा पाटील अश्विनी सूर्यवंशी आदींनी हा कार्यक्रम चांगल्या रित्या संपन्न केला या कार्यक्रमांमध्ये विशेष सहभाग लाभले
23/03/2026
23/02/2026
19/02/2026
23/02/2026
२२/०२/२०२६ रोजी श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यां मधून कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.
*अध्यक्ष*:-
*डॉ.राजेंद्र कुलकर्णी*
*उपाध्यक्ष:-*
*डॉ. प्रशांत मुठाळ*
*माधुरी साबळे*
*सचिव:-*
*सुधीर नवसारे*
प्राचार्य, श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी
*खजिनदार*:-
*किशोर राजगुरू*
याची सर्वानुमते निवड तरुण ऐक्य मंडळाचे
*अध्यक्ष बाबुराव मुखेडकर* यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रसंगी मुखेडकर सर यांनी शाळेचा व संस्थेचा इतिहास व कार्य याची माहिती दिली. व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य सुधीर नवसारे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व शाळेतील गतिविधींबाबत सर्वांना सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी हे या संघाचे संस्थापकीय सदस्य असणार आहेत. यासंघाची कायदेशीर नोंदणी करून शाळेच्या कामात व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काम करणार असल्याचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सार्व उपस्थितांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
उमेश आटवणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
18/11/2025
नशा मुक्त भारत अभियान निमित्त शपथ घेताना विद्यार्थी व शिक्षक श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी नाशिक ४२२००३