Jyotish Abhyas Mandal,Navin NASIK

Jyotish Abhyas Mandal,Navin NASIK

Share

20 वर्षांपासून नासिक सिडको येथे ज्योतिष वर्ग ऑनलाईन व ऑफलाइन घेतले जातात 9391804937/9890003827

08/01/2026

🌟 ज्योतिष अभ्यास मंडळ, नवी नाशिक 🌟
(स्थापना : शके १९२६)
📢 नवीन ज्योतिष वर्गास सुरुवात 📢
परंपरागत व शास्त्रशुद्ध ज्योतिष शिक्षण
अनुभवी व मार्गदर्शक शिक्षकांच्या माध्यमातून
🪔 वर्गाचे वैशिष्ट्ये :
✔️ अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
✔️ ऑनलाईन ज्योतिष वर्ग (Google Meet द्वारे)
✔️ घरबसल्या अभ्यासाची सोय
✔️ शास्त्र, फलित व व्यवहार यांचा समन्वय
👤 स्वतः ज्योतिष धर्माचार्य
मा. श्री अनिल चांदवडकर गुरुजी
यांच्याकडून प्रत्यक्ष वर्ग
💰 वर्ग शुल्क : फक्त ₹५१००/-
📝 परीक्षा : डिसेंबर २०२६
📅 प्रवेशाची अंतिम तारीख : १५ जानेवारी २०२६
📞 संपर्क : ९८९०००३८२७
आपलाच,
भरत होसिंग
अध्यक्ष
ज्योतिष अभ्यास मंडळ, नवीन नाशिक

06/12/2025

🌹 *ज्योतिष शिकायचंय...*
*ऑनलाईन ज्योतिष वर्ग*
🌷 सोमवार दिनांक 15 डिसेंबर पासुन प्रवेश सुरु
🌹रात्री 9 ते 10
गुगलमीट वर...

👉 ज्योतिष वर्गात काय शिकविणार..
👉वर्गाचा कालावधी...
वर्गाची फी...
👉परीक्षा कधी होणार...
👉स्वाध्याय पण द्यावा लागतो का...
👉मला जमेल काय...
👉पात्रता काय...
👉इत्यादी अनेक प्रश्नांची❓ उत्तरे या तासाला मिळतील...

🚩 *ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नाशिक*
हि संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे नोंदणी कृत आहे.
गेल्या 2006 पासुन..किंबहुना त्या अगोदर 2001
पासुन ज्योतिष वर्ग सुरु....
1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्योतिष शास्त्राची ओळख करून देण्यात मंडळ यशस्वी झाले.
*"ज्योतिष शास्त्री"* या महाराष्ट्र राज्य स्थरीय परीक्षेत ज्योतिष गणितात विद्यार्थी प्रथम, तसेच विशेष श्रेणित अनेक विद्यार्थी उत्तीर्ण अश्या परंपरा लाभलेल्या संस्थेत प्रवेश घेऊ या...

🚩 *चला तर या नामांकित संस्थेत प्रवेश घेऊ या...*

*खालील लिंक ला कनेक्ट होऊ या.. ग्रुप मध्ये जॉईन होऊ या...*
*सुस्वागतम...*
🌹🌹🌹🌹🌹🌹

इतर सुचना ग्रुपवर देण्यात येतील
🙏
आपलेच ज्योतिष आचार्य
🕉️अनिल चांदवडकर(ज्योतिष धर्माचार्य)
98900 03827
संस्थापक कार्याध्यक्ष
🕉️ भरत होसिंग
98903 31155
🕉️भिकन अहिरराव
99223 77913
🕉️ रविंद्र बाग
94234 80945
🕉️गोविंद शास्त्री
86053 14062
🕉️प्रशांत चौधरी
98502 81917
🕉️श्रीरामचंद्र जोशी
91750 71963
🕉️ प्रशांत वाघ
92846 46140

chat.whatsapp.com

19/07/2025

*द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षं परिषस्वजाते। तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति।*

मुंडकोपनिषद् ३.१

मुंडक उपनिषद हे अंगिरस ऋषींचे शिष्य शौनक यानी लिहिले आहे, यात संन्यासधर्म तसेच आत्मा याविषयी चर्चा आहे.
एका वृक्षाच्या आश्रयाने दोन पक्षी राहतात, त्यापैकी एक गोड फळ खातो तर दुसरा फळ न खाता केवळ साक्षी भावाने पाहतो, वेदान्तातील हे प्रसिध्द रूपक आहे, आपले शरीर हाच एक वृक्ष, या वृक्षावर राहणारे दोन पक्षी म्हणजे एक जीव व दुसरा नित्य-शुध्द-बुध्द-मुक्त सर्वव्यापी आत्मा! सुखदु:खाचे अनुभव ही शरीरवृक्षावरील फळे होत ती कर्मामुळे उत्पन्न होतात, जीव ती फळे खातो पण शुध्द आत्मा या अनुभवांचा केवळ साक्षी असतो, येथे पक्ष्यांच्या रूपकाद्वारे उपनिषदकारानी आत्मचिंतनाची दिशा दाखविली आहे. हेच परमात्म्याचे निर्लेप, सुखदुःखातीत ज्ञानस्वरूप होय.

भालचंद्र जोशी

26/06/2025

*विवाह ६*
नवग्रहांची फळे
वि श्री देशिंगकर यापुस्तकातून
१) सप्तमात रवि असता स्त्री सुख २४ व्या वर्षी देतो.
२) स्त्री कुंडलीत जर रवि दशम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत व चतुर्थ स्थानापासून लग्नापर्यंत असता विवाह लवकर होतो.
३)स्त्री कुंडलीत सप्तमात रवि-शनी, रवि-गुरू युती असता नवरा बिजवर किंवा ८ ते १० वर्षांनी मोठा मिळतो.
४) लग्नकुंडलीत सप्तमात रवि-शुक्र, रवि-केतू,रवि-शनी युती असता विवा
ह लवकर होत नाही,झाल्यास सौख्य मिळत नाही.
५)सप्तम स्थानी वृषभ, कर्क, कन्या, मीन या राशीत चंद्र-गुरू युती असेल तर विवाह झालेला दृष्टीस पडत नाही.
अर्थात स्त्री सौख्य न मिळणे.
६)सप्तमात चंद्र-शनी, चंद्र-राहु, चंद्र-केतू उशिरा विवाह, पर जातीतील, वयाने मोठी, पुनर्विवाहित योग निर्माण करतात. ठरलेले विवाह मोडतात.चंद्र-शनी युती परधर्माची, मोठ्या वयाची मिळते.
७)सप्तमात चंद्र-मंगळ युती विवाह लवकर होत नाही, निदान१९व्या वर्षी करू नये.या युती वरून शनीचे गोचर भ्रमण पुरे झाल्यावर करावा.
८)सप्तमात बुध १७व्या किंवा २२ व्या वर्षी विवाह योग येतो, अस्तंगत असता थोडा उशिरा विवाह होतो.
९)सप्तमात गुरु-शनी अती उशिरा विवाह योग किंवा अजिबात विवाह न होणे, किंवा विवाह झाला तर दोघात मोठे अंतर असते किंवा पुनर्विवाहित जोडीदार असतात.
१०)प्रथम स्थानी अशुभ ग्रह सप्तमात गुरू असता विवाह उशिरा विजोड जोडपे असते.
११)स्त्री पत्रिकेत सप्तमात गुरू विवाह विलंबाने पती बिजवर किंवा प्रथम वर मिळाल्यास अंतर बरेच असते.
१२)सप्तमात शुक्र-शनी पुनर्विवाहित पत्नी/परजातीय पत्नी/वयाने मोठ्या किंवा प्रौढ मुलीशी विवाह
१३)शुक्र-केतू, शुक्र-राहू विवाह उशिरा किंवा अविवाहित राहण्याचा योग.दोन विवाह, परजातीच्या स्त्रीशी विवाह, वयात बरेच अंतर, उंच बायको देतो.
१४)शुक्राच्या सप्तमात मंगळ विवाह उशिरा.शुक्राच्या सप्तमात राहू अथवा शनी असल्यास वयात जास्त अंतर
१५)लग्नाच्या सप्तमात किंवा शुक्राच्या सप्तमात शनी राशीत(१०,११) राहू /गुरू/शनी असल्यास जोडीदाराच्या वयात अंतर व उशिराने विवाह.
१६)शुक्र-शनी युती किंवा शुक्र शनीच्या दृष्टीत असल्यास स्त्री वयाने मोठी किंवा दोघात जास्त अंतर असते.
१७)शुक्र राहु प्रतियोग लवकर विवाह.
१८)चंद्र, शुक्र दोन्ही जल राशीत(४,८,१२) असता लवकर विवाह.
१९)शुक्र कन्या राशीत सप्तमात विवाह उशिराने.
२०)लग्नी शुक्र विवाह लवकर.
२१)सप्तमात शुक्र २०-२२मध्ये विवाह.
२२)शुक्र कन्येत चित्रा नक्षत्री विवाह २८-३०नंतर होतो.
२३) धनु राशीत शुक्र - २ विवाह किंवा ३६ व्या वर्षी विवाह किंवा अविवाहित राहण्याकडे कल असतो.
कन्या राशीत शुक्र स्रियांचा विचार मनात सहसा कमी, अविवाहित राहण्याकडे कल.
२४)सप्तमात शुक्र पुरुष २४व्या वर्षी स्त्री १९व्या वर्षी विवाह होईल.अन्यथा २८ ते ३२ व्या वर्षापर्यंत होत नाही.
२५)सप्तमात वृषभ, तुळ, मीन राशीचा शुक्र विवाह लवकर होईल.
२६)सप्तमातील शुक्रवार हर्षल/नेपच्यून/शनी/मंगळ यांचे अशुभ दृष्टी योग विवाह लवकर होणार नाही.
२७) तुला, वृषभ, कर्क सिंह लग्न लग्नात शुक्र विजातीय विवाह, प्रेम विवाहाचे परिणाम जादा होतात.
२८)सप्तमात शनी पुरुषाचे पत्रिकेत ३० वर्षापर्यंत विवाह होत नाही.
मुलीच्या बाबतीत विवाहात अडथळे,पती बिजवर अथवा१० ते १५ वर्षांनी मोठा मिळतो. पुरुषाच्या बाबतीत बरोबरच्या मुलीशी विवाह होतो.५,९,१०,११ राशीचा शनी असेल तर वृद्ध कुमारिकेशी विवाह होतो.
२९)१,५,९ अग्नी राशीचा शनी सप्तमात विवाह होणार नाही.
३०)सप्तमात शनी-राहू, शनि- केतू,शनी - बुध असता ब्रह्मचारी राहण्याचा योग येतो.
३१)सप्तमात राहू विवाह होईल तितक्या उशिरा होतो, द्विभार्या योग देतो.सती शाप असतो.
३२)सप्तमात हर्षल उशिराने विवाह.
३३)सप्तमात नेपच्यून लवकर लग्न करण्याचा योग येतो.

संग्राहक;-
अनिल चांदवडकर
ज्योतिष अभ्यास मंडळ,नविन नासिक
9890003827

25/06/2025

*विवाह:-५*

फलदीपिका अध्याय 10 श्लोक 12

*कामस्थ कामाधिप भार्गवाना मृक्षं दिशं शंसति तस्य पत्न्याः।*
*शुक्रो स्तपो वा तनुनाथभांश-त्रिकोणमायाति तदा विवाहः।।*

पुरुषाचा कुंडलित है पहा की
१)७ व्या घरात कोणता ग्रह आहे.
२)सप्तमेश आणि शुक्र कोणत्या राशीत आहे. या राशीच्या दिशेला जातकाचे लग्न होईल म्हणजेच त्या दिशेकडे राहणाऱ्या मुलीशी लग्न होईल. लग्नेश ज्या राशी किंवा नवमांशात असेल त्यापासून त्रिकोण राशीत (५,९)जेव्हा गोचारीचा शुक्र किंवा सप्तमेश येतो तेंव्हा लग्न होते.

संग्राहक:-
अनिल चांदवडकर
ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नासिक
९८९०००३८२७

25/06/2025

*विवाह-४*

फलदीपिका
अध्याय १०

*लग्नास्तनाथ स्थितभांशकोणे नीचोच्चभे स्त्रीजननं च पत्यु: |*
*चंद्राष्टवर्गे धिक बिंदुराशौ कलत्रजन्मेति तथा धवस्य ||*

पुरुष कुंडलीत
१)लग्नेशाची रास
२)सप्तमेशाची रास
३)लग्नेश सप्तमेश यांच्या नवमंशाच्या त्रिकोण रास
४)लग्नेश किंवा सप्तमेशाच्या उच्च राशी किंवा नीच राशी
५)चंद्राष्टक वर्गात ज्या राशीत सर्वात जास्त बिंदु असतील ती रास
स्त्रीची जन्मरास असते.

संग्राहक:-
अनिल चांदवडकर
ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नासिक
९८९०००३८२७

25/06/2025

*विवाह-३*
जातक-दीप
# सप्तम स्थानी गुरू विवाह विलंबाने होतो
#स्त्री कुंडलीत सप्तमात गुरू
पती बीजवर मिळेल किंवा प्रथम वर मिळाल्यास दोघांच्या वयामध्ये आठ वर्षा पेक्षा जास्त अंतर असेल.
#सप्तमात गुरू शनी असेल
पुरुष कुंडलीत विवाह उशिराने किंवा होत नाही.
स्त्री कुंडलीत बीजवर किंवा दुप्पट वयाचा असतो.
संग्राहक:-
अनिल चांदवडकर
ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नासिक
९८९०००३८२७

25/06/2025

*विवाह-2*
जातक तत्वम-सप्तम विवेक
*दार पसंनिहिते उडग्ःपे बाल्ये विवाह |* (१२५)
अर्थ:- सप्तमेश व लग्नेश हे जर जवळच्या स्थानामध्ये असतील तर कमी वयात विवाह होतो.
(येथे बालविवाह-याचा अर्थ लवकर विवाह असा घ्यावा)
संग्राहक-
अनिल चांदवडकर
ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नासिक
९८९०००३८२७

25/06/2025

*विवाह-1*
सर्वार्थ चिंतामणि

*लग्ने कुटुंबे यदि दारभावे शुभान्विते शोभनवर्ग युक्ते |* *तदीश्वरे शोभनदृष्ट युक्ते बाल्ये विवाह दिकमाहूरार्या: ||*
अर्थ:- लग्न,द्वितीय, सप्तम भाव शुभयुक्त असून, त्यांचे स्वामी ( लग्नेश, द्वितीयेश, सप्तमेश)शुभ ग्रह युक्त अथवा दृष्ट असता बाल वयात विवाह होतो.
संग्राहक:-
अनिल चांदवडकर
ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नासिक
९८९०००३८२७

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


2 Swati Heights, . Kamathwade
Nashik
422008

Opening Hours

Monday 11am - 2pm
Tuesday 11am - 2pm
Wednesday 11am - 2pm
Thursday 11am - 2pm
Friday 11am - 2pm
Saturday 11am - 2pm
Sunday 11am - 2pm