24/12/2025
जागतिक पेसा दिन | २४ डिसेंबर
१९९६ साली याच दिवशी पंचायती (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार) अधिनियम पेसा कायदा संमत झाला.
या कायद्याचा उद्देश अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांना स्वशासन, हक्क आणि निर्णयक्षम अधिकार देणे हा आहे.
आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गारमाळ, देवीचापाडा, विनायक नगर आणि खारवळ या चार गावांमध्ये पेसा ग्रामसभा आणि अभिव्यक्ती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात पेसा मोबिलायझर, ग्रामसभा सदस्य, सरपंच, उपसरपंच, अभिव्यक्तीचे कार्यकर्ते तसेच डॉ.संजय सावळे (विश्वस्त, अभिवक्ती संस्था आणि ग्रामस्थानचा सक्रिय सहभाग होता.
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना —
- पेसा कायद्याचे महत्त्व
- ग्रामसभेची भूमिका व अधिकार
- नैसर्गिक साधनसंपत्तीवर ग्रामसभेचा हक्क
- वनहक्क व सामूहिक वनहक्क दावे
- विकास प्रक्रियेत स्थानिक लोकांचा सहभाग
- स्थानिक रोजगार व स्थलांतर
यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पेसा कायदा आदिवासी भागातील स्वाभिमान, स्वायत्तता आणि लोकशाही मजबूत करणारा कायदा आहे, आणि ग्रामस्थांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मजबूत ग्रामसभा, सशक्त आदिवासी समाज
पेसा म्हणजे हक्क, सहभाग आणि स्वशासन
#जागतिकपेसादिन #ग्रामसभा #आदिवासीहक्क स्वशासन Trimbakeshwar Abhivyakti
12/12/2025
११ डिसेंबर २०२५ रोजी विराचापाडा गावाला पेसा गाव म्हणून घोषित करण्यासाठीची प्रस्तावित फाइल त्र्यंबकेश्वर पंचायत समितीकडे जमा करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समितीची टीम दीड वर्ष कसून पाठपुरावा करत होती.
विराचापाडा हे खडकओहळ ग्रामपंचायतीतील एक अतिदुर्गम गाव आहे. या गावाला पेसा गाव म्हणून घोषित करण्यासाठी अभिव्यक्तीची ग्रामशक्ती टीम ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने काम करत आहे. गावातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्यामुळे ग्रामसभेसाठी सर्व ग्रामस्थांना एकत्र येणे शक्य होत नव्हते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळी ग्रामसभा आयोजित केल्या. तसेच, काही स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या प्रक्रियेत अडथळेदेखील निर्माण केले जात होते.
यापूर्वी, सुमारे तीन वर्षांपूर्वी गावाची पेसा फाईल तयार करण्यात आली होती; परंतु ती हरवली. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वखर्चाने व स्वतःच्या प्रयत्नांनी सर्व आवश्यक कागदपत्रे पुन्हा एकत्र करून ही नवी फाईल तयार केली.
आता स्वायत्त पेसा ग्रामसभा म्हणून कारभार सांभाळण्यास विराचापाडा गाव सज्ज झाले आहे.
26/11/2025
Phase 2 of the Youth Leadership Development Course (YLDC) was held with 22 participants from 8 villages of Trimbakeshwar block on 13th and 14th November 2025 at Leslie Sawhny Centre, Deolali, Nashik.
The participants shared their experiences of presenting and narrating a story using a traditional media form, namely 'flannel story' for an audience with diverse age groups from their own villages.
During the workshop, the participants analyzed their experience of storytelling using group media and mobilization strategies along with challenges they faced and the support they needed in one of the guided group discussion session.
This phase of YLDC was focused on creating spaces for 'dialogue' through storytelling and data analysis in collaboration with the members from the youth collectives - the adolescents and young adults, from respective villages.
Stay tuned for the update on the next phase of the YLDC course.
10/11/2025
हाय, मी चेतन. मी जेव्हा माझ्या गावातल्या वाचनालयामध्ये चाकोरी नावाची गोष्ट सांगायचं ठरवलं तर मला खरंच वाटलं नव्हतं की इतके मुलं येतील असं. आणि हे सर्व श्रेय शुभम आणि श्रुती तुम्हा दोघांना आहे कारण तुम्ही जर मुलांशी नीट communicate केलं नसतं तर ती कोणीच मुलं आली नसती. त्या साठी तुम्हा दोघांचे खूप खूप आभार.
आणि जेव्हा मी गोष्ट सांगाया सुरुवात केली तेव्हा मी खूप घाबरलो होतो. कारण मी पहिल्यांदा लोकांना अशी गोष्ट सांगणार होतो जिच्यामध्ये शिकण्यासारखं खूप काही होतं. पण मला याचीच भीती होती की जर माझी गोष्ट सांगून झाली आणि त्यात मुलांना काहीच समजलं नाही तर मलाच खूप वाईट वाटलं असतं. पण असं काहीही जाणवलं नाही. मुलांनी त्यावर खूप मस्त मस्त प्रश्न विचारले आणि त्यांना काय समजलं गोष्टीतून तेही सांगितलं. अजून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं हे बघून खूप मस्त वाटलं आणि मलाही खूप आत्मविश्वास आला की मी अजूनही अनेक गोष्टी सांगू शकतो.
- चेतन, अंबई
Our Gender Champions from Ambai, Velunje, and Sapgaon participated in the first workshop of the "Youth Leadership Course" Abhivyakti held last month.
They did a flannel story presentation that they learned in the workshop in their own villages.
They keep inspiring us and everyone participating in the course.
10/11/2025
हाय, मी चेतन. मी जेव्हा माझ्या गावातल्या वाचनालयामध्ये चाकोरी नावाची गोष्ट सांगायचं ठरवलं तर मला खरंच वाटलं नव्हतं की इतके मुलं येतील असं. आणि हे सर्व श्रेय शुभम आणि श्रुती तुम्हा दोघांना आहे कारण तुम्ही जर मुलांशी नीट communicate केलं नसतं तर ती कोणीच मुलं आली नसती. त्या साठी तुम्हा दोघांचे खूप खूप आभार.
आणि जेव्हा मी गोष्ट सांगाया सुरुवात केली तेव्हा मी खूप घाबरलो होतो. कारण मी पहिल्यांदा लोकांना अशी गोष्ट सांगणार होतो जिच्यामध्ये शिकण्यासारखं खूप काही होत. पण मला याचीच भीती होती की जर माझी गोष्ट सांगून झाली आणि त्यात मुलांना काहीच समजलं नाही तर मलाच खूप वाईट वाटलं असतं. पण असं काहीही जाणवलं नाही. मुलांनी त्यावर खूप मस्त मस्त प्रश्न विचारले आणि त्यांना काय समजलं गोष्टीतून तेही सांगितलं. अजून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं हे बघून खूप मस्त वाटलं आणि मलाही खूप आत्मविश्वास आला की मी अजूनही अनेक गोष्टी सांगू शकतो.
- चेतन
Our Gender Champions from Velunje, Sapgaon, and Ambai participated in the first workshop of the "Youth Leadership Course" Abhivyakti held last month.
They did a flannel story presentation that they learned in the workshop in their own villages.
They keep inspiring us and everyone participating in the course.
29/10/2025
A first combined workshop for the strengthening of peer leadership among youth was held on 15 and 16 October 2025. 25 members of 2 projects of Abhivyakti- Peer Leaders and Gender Champions - participated in this workshop.
It was an introductory workshop in a series of total 5 workshops for strengthening peer leadership in the youth of villages around Trambakeshwar.
It included activities such as poster making, flannel story, group discussions, film screening, and collectively singing together.
Leadership | Strengthening Leadership | Peer Leadership | Strengthening Peer Leadership | Empowerment | Voice | Voices | Critical Thinking | Gender | Community | Film Screening | Group Discussion | Workshop | Youth | Youth Strengthening | Fun | Learnings | Unlearnings | Community Building | Community | Community Libraries | Think | Action | Change
28/10/2025
Hii सर्वांना,
मी सीमा, आज मी माझ्या गावात चाकोरीची गोष्ट घेतली. आता दिवाळी मुळे मुली घरी नव्हत्या, मामाकडे गेल्या आहेत. पण जितक्या मुली आम्हाला भेटल्या तितक्या मुलींशी आम्ही संवाद साधला. त्यांच्या घरच्यांशी बोलून आपल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. आणि चाकोरी गोष्ट घ्यायची आहे असं सांगितलं. मग आम्ही जिथे आम्हाला वाचनालयासाठी रूम मिळाली आहे तिथे सर्व मुलींना एकत्र आणलं आणि लगेच गोष्टीला सुरुवात नाही केली, पहिले त्यांची ओळख करून घेतली आमची ओळख करून दिली. नंतर मग आम्ही एक आवाज पुस्तकातलं गाण घेतलं. त्यानंतर त्यांना मज्जा यायला लागली. मग आम्ही गोष्टीला सुरुवात केली. त्यांच्यासाठी ही गोष्ट घेण्याची पद्धत नवीन होती. म्हणून त्या खूप शांत आणि मन लाऊन ऐकत होत्या. गोष्ट पूर्ण झाल्यानंतर त्यांना मी खूप सारे प्रश्न विचारले. गोष्टीबद्दल विचारलं. साधारण तीन तास ही activity सुरू होती. नंतर आम्ही काही खेळ घेतले त्यात लहान मुली पण होत्या. आम्ही खेळ वाचनालयाच्या रूम मध्ये घेतले आणि खेळ खेळून झाल्या नंतर त्यांना हेही सांगितलं की ही रूम आपल्याला वाचनालयासाठी मिळाली आहे लवकरच इथे वाचनालय सुरू होईल तुम्ही सगळ्या इथे रोज येऊ शकतात.
- सीमा, सापगाव
(from the new project Peer Leaders aka सहयात्री)
Field Experience | Field Diary | Field Learnings | Sapgaon | Story Telling | Story | Flannel Story | Shodhini | Peer Leader | Peer Leaders | Student | Facilitation | Games | Community | Community Building | Community Resource Center | CLC | Community Library | Community Libraries | Books | Songs | Change | Consent | Informed Consent | Building Connection | New Connection | New Project | New Beginning
27/10/2025
Exciting times at the Basic Leadership Development Course (BLDC) 2025 in Negambo, Sri Lanka!
Organized by ASPBAE, the course brings together 28 participants from 17 different countries to explore the theme "Transformative Youth and Adult Learning and Education for a Peaceful Planet."
From October 25th to November 1st, Mahesh from Abhivyakti Media For Development has joined this transformative experience, where diverse leaders shared insights and strategies for fostering peace through education.