22/08/2020
"स्वानंदीच्या लेखणीतून!"
"गणेशोत्सव"
वैद्या सोनाली तन्मय गायकवाड़.
"आदित्य"आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय.
beliveindetox.WordPress.com
Email- [email protected]
"स्वानंदी,बाई माझ्या पायाचा काही उपाय कर,"
कामत काका आत येत म्हणाले;
"तसे तर सर्वच सांधे करकरतात,
पण आता घोटा टाहो फोडून रडतोय,
टाचेने तर काय 'वैर' पत्करले आहे,
जमीनीला पाय टेकू देत नाही.
सुखासुखी काही 'अथर्वशीर्ष' पठण करू देणार नाही, बाप्पापुढे यावेळी.
बाकीच्या कुळधर्माची तर, बोंबच आहे सारी,
तुला ठाऊक असेलच,
ह्यावेळी सुनबाई आणि तिच्या मैत्रिणीनी 'सामूहिक' गणपती बसवायचा, ठरवले आहे म्हणे.
ती क़ाय 'हरीतालिका' आहे का, की 'मंगळागौर' आहे एकत्र पुजायला!
पिढीजात गणपती, असा ओसरीवर आणून ठेवायचा म्हणजे... कलियुग आहे."
कामत काका 'तणतणत' म्हणाले.
"अहो,मग ठीकच आहे ना काका,
टिळकांनी नाही का, सार्वजनिक केला, गणेशोत्सव..
शिवाय, त्या ते पैसे वाचवून दुष्काळी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत,
विधायक कामाला पाठिंबा दिला पाहिजे."
स्वानंदी त्याना शांत करत म्हणाली.
(---वैद्या सोनाली तन्मय गायकवाड़)
"तरी, माझा काडीचाही त्रास नाही हो तिला,
'कुळाचार' म्हणून कधीकधी पुरणा-वरणाचा स्वयंपाक होतो, तेवढ़ाच....
पोरा--बाळांचं घर म्हंटल की, गोड-धोड आलंच;
मांसाहार लागतोच, त्याला साप्ताहिक सुट्टी दोनदा, ते पुर्वीपासून तसेच आहे.
तिची सासू नाही का करायची, त्यामुळेच तर माझी तब्येत एवढी ठणठणीत राहिली,
नखात रोग नाही माझ्या.
हे बघ 'रिपोर्ट्स'... 'डायबिटीस' नाही की 'प्रेशर' नाही.
आता वयोमानाने सांधे दुखतात,
पण मी नियमित कैल्शियमच्या गोळ्या घेतो न चुकता!
काही नाही आजकालच्या मुलींना आळसच भारी."
कामत काकांचा 'त्रागा' स्वानंदीला समजत होता.
"काका, शांत व्हा आणि मला नक्की प्रॉब्लम सांगा, सन्धिवात की गणपती!"
दोघांना खुश करण्याचा उपाय आहे..."
त्यांना हसवण्यासाठी स्वानंदी म्हणाली.
"काका मुळात तुमची लक्षणे आणि रिपोर्ट्स दोघेही सांगतायत, तुम्हाला सन्धिवात(osteo arthritis) नाही.....
त्यांचे 'नाडीपरिक्षण' करत स्वानंदी म्हणाली,
तुमचा व्याधी आहे,
वातरक्त म्हणजेच gouty arthritis.
रक्तात 'यूरिक एसिड'चे प्रमाण वाढल्याने त्याचे खड़े(क्रिस्टल्स) घोटे, अंगठा,टाचा ह्या ठिकाणी जमा होतात, तेथील हाड वाढते,
आणि त्याचा 'दाब जवळच्या नसेवर पडल्याने तीव्र वेदना होतात.
आता ह्या 'यूरिक एसिड'चा उगम
आपल्या आहार म्हणजेच, गोड,मांसाहार,मद्यपान,आणि काही अंशी कैल्शियमच्या अतिसेवनात आहे."
स्वानंदीने एका दमात निदान करून टाकले.
"हे काय नवीन आता?"
चिंतेनेकाकांनी विचारले.
"नवीन नाही काका,
पहा तुमची प्रकृतीच 'पित्ता'ची आहे,
त्यात तुमचा आहार तिखट--तेलकट,
शिवाय दुपारी झोपणे, फिरायला म्हणून निघणे आणि खूप घाम येतो म्हणून, एका जागी बसून घेणे आदि सवयींमुळे पचन अर्धवट होते,
आणि प्रोटीनच्या पचनाचे काम बिघडले;
की हा प्रोब्लेम होतो.
'प्यूरीन' नावाचे प्रोटीन 'अर्धवट' पचल्याने 'यूरिक एसिड' म्हणजे पित्त तयार होऊन, ते रक्तात पसरुन घट्ट झाले की 'खड़े' तयार होतात.
असे पहा, हे सगळे कुळधर्माचे सोपस्कार तुम्ही पोटासाठी करता,
पण पोट त्यानेच जेरीस आले तर....
म्हणजे, आरास, मख़र, लाइटिंग, प्रसाद हे सारे बाप्पासाठी करायचे आणि
त्यात होणारी उधळपट्टी आणि विसर्जनात होणारे प्रदूषण ह्याने बाप्पाच चिडला तर...!
त्यापेक्षा सर्वांची ऊर्जा एकत्र करून, एकाच बाप्पाची मनोभावे पूजा केली तर, ते जास्त श्रेयस्कर नाही का?
स्वानंदी समजावत म्हणाली.
(---वैद्या सोनाली तन्मय गायकवाड़)
"बरं बाई, मग काय करायचे, हे 'यूरिक एसिड' कमी करायला?"
काकांचा स्वर बराच खाली आला होता.
"श्री गणेशाला 'नतमस्तक' व्हायचे.....
1.तो 'बुद्धी'ची देवता आहे ना,
मग 'बुद्धी' वापरून सर्व कुळाचार 'मनाने' सांभाळायचे व 'पुरणा-वरणा'वर 'नियंत्रण' ठेवायचे.
2.त्याच्या हातात, कुऱ्हाड़ असते, तुम्ही पाहिली असेल ना, तिने राग आदि 'षड्रिपु'चे खंडन करायचे,
दोरीच्या सहाय्याने खऱ्या 'विज्ञाना'कडे जायचे.
'कमळा'प्रमाणे ,'रूढी'च्या चिखलाचे शिंतोड़े उडू द्यायचे नाहीत.
मोदकांप्रमाणे आयुष्यावर टीका न करता त्याचा आस्वाद घ्यायचा.
3.मोठ्या कानांनी इतरांचे म्हणणे ऐकून घ्यायचे, लहान डोळ्यांनी अपराध दुर्लक्ष करून, मोठ्या पोटात सामाऊन घ्यायचे.
4.कितीही सुबत्ता आली तरी, एक पाय जमिनीवर ठेवायचा.
5. मूषकरूपी आपल्या, सर्व इच्छांवर आपण लगाम लावायचा, त्यांना आपल्यावर आरूढ़ होऊ द्यायचे नाही.
6.बाकी दूर्वा, जास्वंद हे पित्तशमन करणारे आहेतच.
थोडक्यात, आपल्या आहार विहारावर ताबा ठेऊन पित्त नियंत्रणात ठेवायचे."
हसत हसत स्वानंदी म्हणाली.
"बरं गं बाई, गणेश पुराण समजले,
पण ह्या दुखण्याचा काय उपाय?"
काका जरा शांतपणे बोलू लागले.
"उपाय आयुर्वेदात आहे.
1.विरेचन--
पोटातील प्रकोपित पित्ताला बाहेर काढून टकायचे.
2.सर्वांग स्नेहन, स्वेदन--
सांध्यांना बल देण्यासाठी स्नेहन,
toxins घामावाटे काढून टाकण्यासाठी स्वेदन.
3.रक्तमोक्षण--
वेदना कमी करण्यासाठी दूषित रक्त काढून टाकणे म्हणजेच रक्तमोक्षण.
4.अग्निकर्म--
वेदना कमी करण्यासाठी, ठराविक पॉइंटवर चटका देऊन वर तूप लावणे म्हणजेच अग्निकर्म.
5.प्रलेप--
तीव्र वेदना आणि आग कमी करण्यासाठी औषधाचा लेप लावायचा.
6.शिरोधारा--
राग कमी होऊन डोक्यातील पित्त शांत होण्यासाठी.
पण सर्वात महत्त्वाचे,
शारिरीक आणि मानसिक पित्तावर,बुद्धिचा योग्य वापर करून विजय मिळवणे!"
माहिती देऊन स्वानंदी थांबली.
"बरं मग, कधी करायचा 'श्रीगणेशा' पंचकर्माचा.
ह्यावेळचे अथर्वशीर्ष सामूहिक गणपतीसमोर आणि हो, माझी देखील दोन महिन्यांची पेंशन दुष्काळमदत निधित जमा....!"
मनमोकळे हसत काका म्हणाले.
"गणपती बाप्पा मोरया!!!"
दोघे उत्साहाने म्हणाले.
वैद्या सोनाली तन्मय गायकवाड़
"आदित्य"आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
beliveindetox.WordPress.com
Email- [email protected]
drSonaliGaikwad August 2, 2020August 2, 2020 ।। लॉकडाऊन, लग्न आणि नारायण ।। Continue reading →
27/08/2016
18/08/2016
15/08/2016
28/07/2016
17/07/2016