Atma Malik Preschool

Atma Malik Preschool Atma Malik Pre School. Samarth Nagar Behind Sharad Chandra Pawar Market, Makhamalabad Road, Panchavti, Nashik

31/03/2026

आपल्या मुलासाठी शाळेची निवड करण्यापूर्वी या गोष्टी विचारत घ्या..
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य शाळा निवडणे ही आपली जबाबदारी आहे. चांगले संस्कार व आपली संस्कृती जपणारी शाळा निवडताना, चांगले वातावरण, अनुभवी शिक्षक आणि सर्वांगीण विकास यांचा नक्की विचार करा. आज घेतलेला योग्य निर्णय उद्याचा मजबूत पाया ठरेल!

28/02/2026

सिझन ॲक्टिव्हिटी – अनुभवातून शिक्षण!

ऋतूनुसार घेतलेले उपक्रम मुलांना निसर्गाची ओळख, वैज्ञानिक विचार, जीवनकौशल्ये आणि सर्जनशीलतेची संधी देतात. ऊन-पाऊस-थंडीचे बदल समजतात, योग्य पेहराव व आहाराचे महत्त्व कळते, तर Holi व Diwali सारखे सण एकत्र साजरे करताना सामाजिक मूल्येही रुजतात.

पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे अधिक परिणामकारक ठरते!

*प्रिय माझ्या काळजाचा तुकडा अथर्व (साई)* आज तुझा वाढदिवस आहे…हा दिवस साजरा करताना मन आनंदाने भरलेलं आहे, पण डोळ्यांत नकळ...
06/02/2026

*प्रिय माझ्या काळजाचा तुकडा अथर्व (साई)*

आज तुझा वाढदिवस आहे…
हा दिवस साजरा करताना मन आनंदाने भरलेलं आहे, पण डोळ्यांत नकळत पाणीही येतंय. कारण कालपर्यंत माझी बोट धरून चालणारा लहानसा मुलगा आज १२ वर्षांचा होऊन आयुष्याकडे समजूतदारपणे पाहू लागला आहे.

तू केंद्रीय विद्यालयात ६ वीमध्ये शिकतोयस. अभ्यास, शिस्त आणि शिक्षकांचा सन्मान करतोस, हे पाहून मन अभिमानाने भरून येतं. *शिक्षकांचा आदर करणारा विद्यार्थी आयुष्यात योग्य मार्गावर चालतो*, याची आम्हाला खात्री आहे.

बाळा, आयुष्याचा प्रवास नेहमी सोपा नसतो. अपयश येईल, मन दुखेल, राग येईल… पण लक्षात ठेव.*रागावर नियंत्रण ठेवणं ही खऱ्या ताकदीची ओळख आहे.* थोडा थांब, शांत हो आणि मग पुढे जा.

शिक्षण म्हणजे फक्त मोठं होणं नाही, तर *चांगला माणूस बनणं आहे.* प्रामाणिकपणा, नम्रता, संवेदनशीलता आणि माणुसकी हे गुण कधीही सोडू नकोस. पैसा, पद, यश येईल-जाईल; पण स्वच्छ मन आयुष्यभर साथ देतं.

अथर्व (साई), तुझी आई मुंबईला दूर राहून नोकरी करते. ते फक्त कामासाठी नाही, तर *तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.* तिचे दिवस-रात्र केलेले कष्ट, तिने सोसलेली तुझी ओढ, आणि न बोललेले अश्रू कधीही विसरू नकोस. *तिचे स्वप्न साकार करणं, हेच तुझं खरं यश आहे.*

कदाचित आम्ही प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत नसू, पण आमचे संस्कार, आशीर्वाद आणि आमचा विश्वास तुझ्यासोबत कायम राहील. अडचण आली, डोळ्यात पाणी आलं तरी हार मानू नकोस.

मोठ्यांचं ऐकत जा, आई-वडील आणि गुरुजनांचा आदर कर. कधी कठीण वाटेल, पण त्यामागे फक्त तुझं भलं आहे.

अथर्व (साई), तू फक्त आमचा मुलगा नाहीस…
तू आमचं स्वप्न आहेस,
आमची ताकद आहेस,
आणि आमचा सर्वात मोठा अभिमान आहेस.

*बाळा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*
देव तुला चांगला माणूस बनवो, तुझं भविष्य उजळवो — हीच मनापासून प्रार्थना.

तुझे प्रेमळ पप्पा

01/02/2026

Ascending – Descending Activity

आत्मा मालिक प्री-स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची Ascending व Descending (चढता-उतरता क्रम) समज वाढवण्यासाठी शैक्षणिक व उपयुक्त अशी ऍक्टिव्हिटी घेण्यात आली.

या उपक्रमातून मुलांनी
➡️ अंकांचा चढता क्रम (Ascending Order)
⬅️ अंकांचा उतरता क्रम (Descending Order)
🎯 एकाग्रता, विचारशक्ती व गणिती संकल्पना
खेळाच्या माध्यमातून सहजपणे शिकल्या.

अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमुळे मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते व शिकण्याची गोडी निर्माण होते.

*🌈 चला, आपल्या चिमुकल्याला देऊ एक उज्वल सुरुवात – Atma Malik Preschool मध्ये!*📚✨ पंचवटीमध्ये तुमच्या चिमुकल्याच्या शिक्ष...
19/05/2025

*🌈 चला, आपल्या चिमुकल्याला देऊ एक उज्वल सुरुवात – Atma Malik Preschool मध्ये!*
📚✨ पंचवटीमध्ये तुमच्या चिमुकल्याच्या शिक्षणाची सर्वोत्तम सुरुवात! ✨📚
*Atma Malik Preschool मध्ये प्रवेश सुरू!*
👶🏻 प्रेमळ शिक्षक | 🏡 सुरक्षित वातावरण | 🎨 ॲक्टिव्हिटी-बेस्ड शिक्षण
🙏 संस्कारांसोबत शिक्षण देणारी गुरुकुल-आधारित शाळा – आता तुमच्या जवळच!

*✨ आमच्याकडे उपलब्ध:*
👧🏻 Play Group, Nursery, Jr. KG, Sr. KG
👩‍🏫 अनुभवी व प्रेमळ शिक्षक
🧽 स्वच्छ, सुरक्षित परिसर
🎵 संगीत, चित्रकला, कथाकथन, योगा व इतर उपक्रम
🎥 24x7 CCTV देखरेख
🚐 सोयीची व्हॅन सुविधा

🎯 तुमच्या मुलाचे भविष्य घडवण्याची सुरुवात इथूनच!
💫 Admissions Open – Today is the Day!

*📍 पत्ता:* प्लॉट नं. 63-64, समर्थ नगर, शरद पवार मागे, मखमलाबाद, पंचवटी, नाशिक - 03
📞 संपर्क: 9270514103 / 8087331211

🧠 शिकणं असावं मजेशीर, मन जिंकणारं आणि जीवन घडवणारं!
🌈 चला, आपल्या चिमुकल्याला देऊ एक सुंदर सुरुवात – Atma Malik Preschool मध्ये!

28/01/2025

विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली🙏🏻

-कारुण्या कापडणीस, playgroup

27/01/2025

Republic Day Celibretion in Atma Malik Preschool

🇮🇳 Republic Day Celebration at Our School 🇮🇳Today, we celebrated the 76th Republic Day with pride and enthusiasm. The ev...
26/01/2025

🇮🇳 Republic Day Celebration at Our School 🇮🇳

Today, we celebrated the 76th Republic Day with pride and enthusiasm. The event began with the hoisting of the Tricolor, followed by the national anthem. Students showcased inspiring speeches, patriotic songs, and colorful cultural performances.

Let’s uphold the values of our Constitution and work together for a brighter India!

Jai Hind! ✨🇮🇳


Atma Malik Preschool
विशाल पाटिल

16/01/2025

Lungi Dance
#

Address

Atma Malik Preschool Samarth Nagar Behind Sharad Chandra Pawar Market
Nashik
PANCHAVATI

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 3pm

Telephone

+919270514103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atma Malik Preschool posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Atma Malik Preschool:

Shortcuts

Share

Category