23/05/2023
Best Future of Your Child
We make Ideal Human Ideal Bharat Under guidance of Manavdhan Samajik Shaikshanik Vikas Sanstha Nashi
THIS SCHOOL RUN UNDER GUIDANCE OF MANAVDHAN SOCIAL EDUCATIONAL INSTITUTE NASHIK
23/05/2023
Best Future of Your Child
30/05/2022
शेतमजुराचा मुलगा बनला आदर्श मानवधन शिक्षण संस्थेचा संस्थापक l Prakash Kolhe Sucess Story शेतमजुराचा मुलगा बनला आदर्श मानवधन शिक्षण संस्थेचा संस्थापक l Prakash Kolhe Sucess Story समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या अशा व...
18/01/2022
✍🏻 *आता अवघी दुनिया शिकेल मराठी*📜
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित ग्लोबल लँग्वेज स्कूल च्या अंतर्गत online पद्धतीने मराठी भाषा शिकविल्या जाते. या *पहिल्या मराठी वैश्विक शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष* फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे, या online लँग्वेज स्कूलच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचे भाषा विषयक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतो. तसेच अभ्यासक्रमावर आधारित पाठ्य - पुस्तके, worksheets व इतर शैक्षणिक साहित्य देखील पुरवले जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांला वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते, विद्यार्थ्याला वाचता व लिहिता यावे, व मराठी भाषेवर त्याचे प्रभुत्व निर्माण व्हावे यासाठी या स्कूलच्या माध्यमातून विविध विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविले जातात.
तर वाट कसली बघत आहात? 💁🏻♀️आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. रजिस्ट्रेशन साठी सोबत दिलेली लिंक भरून पाठवा.👉🏻
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSezWCFGQGPRjNU-CEkykqWA_Xy14iRm-AKvKCxP1396ALDLvg/viewform?usp=sf_link
अधिक माहिती साठी 📞7770001241
या नंबर वर संपर्क साधावा.
MANAVDHAN A Great way to learn Marathi *Two class a week *Level wise books *Printable worksheets *Small Batch *Affordable fee *Online Assessment *Certificate after completion Admission begins HURRY UP....... ENROLL TODAY 2022-23
17/01/2022
* *🇮🇳🇮🇳रक्तदान शिबीर* 🇮🇳🇮🇳
*ईश्वराचा अंश असे जो, तो जीव* *जगवी रक्तदान**
*माझ्यातले ते तुझ्यात प्रवाही, याहून श्रेष्ठ कुठले दान!...रक्तदान !!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण समाजात राहतो आणि समाजाचे प्रतिरूप दर्शवत असतो. आपल्या उत्कर्षाला आणि अस्तित्वाला समाज सर्वतोपरी बांधिल असतो. तसेच समाजाशी संलग्न सर्वच बाबींना एक नागरिक म्हणून आपणही जबाबदार असतो. समाजासाठी विधायक कार्य करणे व इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणे, हे *माणूस* म्हणुन आपले कर्तव्यच आहे.
याच कर्तव्य परायणतेसाठी *26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना व कार्याला उजाळा देण्यासाठी व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे व्हीजन कार्यपूर्तीसाठी नाशिक शहरातील, *मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेतर्फे* रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या भारत देशाला प्रगतीशील राष्ट्र, महासत्ता व विश्वगुरू भारत बनविण्यासाठी आपले प्रत्येकाचे एक पाऊल पुढे पडावे यासाठी हा कार्य प्रपंच. कुठेतरी, कुणालातरी तुमची गरज आहे ! सामाजिक बांधिलकी निभावण्याचा एक छोटासा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातील आपला खारीचा वाटा हा कोण्या एका जीवासाठी जीवदान ठरू शकतो. जीवन दानाइतके पवित्र आणि थोर कार्य ते काय असू शकेल ?
रक्तदान अमूल्य आहे! त्वरीत *रक्तदान करा...*
तुमची कोणी तरी वाट बघतय !
मदतीसाठी ......
मी भारतीय आहे हे कार्य कर्तृत्वातूनच सिद्ध करा !
चला या देश कार्यात, मानवसेवेच्या कार्यात सहभागी व्हा !
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान !
या महान कार्याकरिता आम्ही आपली वाट बघतो...
*एक प्रयत्न, एक सुरूवात*
*एका श्वासासाठी... एक रूजवात!*
*🙏🙏जय भारत! जय मानव!! 🙏🙏*
04/01/2022
🙏🇮🇳
*मानवधन दिनदर्शिकचे व डिजिटल कलेंडरचे शिक्षण उपसंचालक डॉ बी बी चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन* 🇮🇳🙏
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक ही आपल्या शैक्षणिक अष्टपैलू कृतीकार्यक्रमासाठी ओळखली जाते. नानाविध प्रायोगिक उपक्रम व शैक्षणिक विकासात्मक कौशल्याधिष्ठित कार्यक्रम सातत्याने संस्थेमध्ये राबविले जात असतात. अशीच एक मानवधन संस्थेची आगळीवेगळी ओळख निर्माण करणारी, सगळ्यांना भूत - वर्तमान - भविष्य यांच्याशी जोडून ठेवणारी कलाकृती म्हणजे, 'मानवधन दिनदर्शिका.'
'मानवधन दिनदर्शिका' प्रकाशन सोहळा नुकताच शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच मानवधन डिजिटल दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक आणि मानवधन दिनदर्शिकेचे निर्माते श्री. प्रकाश सुकदेव कोल्हे, डाॅ. सारंग इंगळे, डाॅ. अश्विनीकुमार भारद्वाज, पी. यू. पाटील, गोविंद साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनदर्शिकेविषयी अधिक माहिती देताना श्री. प्रकाश कोल्हे म्हणाले की, 'मानवधन दिनदर्शिका ही शैक्षणिक कार्यात उपयुक्त तर आहेच. शिवाय सण-उत्सव, तिथी यासोबतच संतापासून, साहित्यिकांपासून ते शास्त्रज्ञ, शोध, जागतिक घडामोडींचा संक्षेपात माहिती देणारी अभ्यासिकाच आहे. सामान्य ज्ञान ते स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी मानवधन दिनदर्शिका प्रत्येक घरात असायलाच हवी! कारण ही दिनदर्शिका जीवन समृद्ध होण्यासाठी फलदायी ठरेल.तसेच डिजिटल कलेंडरच्या सेवेचा आनंद आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मानवधन दिनदर्शिका २०२२ हे ॲप डाउनलोड करून देखील घेऊ शकता.' असे प्रतिपादन श्री. प्रकाश कोल्हे यांनी यावेळी केले.
दिनदर्शिकेबद्दल विशेष कौतुक करत, यांसारख्या ज्ञानार्जन देणाऱ्या गोष्टींची निर्मिती, प्रचार व प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आशावाद मान्यवरांनी याठिकाणी व्यक्त केला.
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 8am - 6pm |
| Wednesday | 8am - 6pm |
| Thursday | 8am - 6pm |
| Friday | 8am - 6pm |
| Saturday | 8am - 6pm |