08/12/2024
भारतीय सैन्याचे सामर्थ्य आणि पराक्रम जवळून पाहण्याची संधी चुकवू नका!
महाराष्ट्रातील सर्वात भव्य शस्त्र प्रदर्शन – 'Know Your Army with Bhonsala' – अनुभवण्यासाठी नक्की उपस्थित राहा!
📍 भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक
🗓 १४ व १५ डिसेंबर २०२४
⏰ सकाळी ८:३० ते रात्री ९:००
Registration Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdkS7BwPpUOswW6U6tolxAkEZ-qSXXsp7g11N7r89yGNmRclA/viewform
13/10/2024
*🎊🌸Reading Day Celebration at VPP English Medium School🌸🎊*
*Reading Day was celebrated on 11 October 2024 at CHME Society's Vidya Prabodhini Prashala English Medium School in honor of the birth anniversary of Dr. APJ Abdul Kalam. The program aimed to instill reading values and highlight the importance of reading books among the students. A beautiful Bharud was performed by the students of Class VII to emphasize the significance of reading, which became the central attraction of the event.*
Students shared information about the life of the great scientist, Dr. APJ Abdul Kalam, highlighting the challenges he faced and how the good habit of reading helped him to overcome those difficulties.
*The program was successfully conducted under the insightful guidance of Hon. Chairman Mr. Jayant Khedekar sir* *and Hon. Principal Mr. Rajan Chettiar sir.**The coordinator, Mrs. Minakshi Amle, encouraged the students to participate enthusiastically in the event. Teachers Mrs. Sneha Joshi, Mrs. Nilima Dalal, Mrs. Prachi Deshpande and Mrs.Pragati Jadhav also put in great efforts to make the program a success.
25/09/2024
*Kavya Sammelan at VPP English Medium School.*
A Kavya Sammelan program was organized at CHME Society's Vidya Prabodhini Prashala English Medium School on 21st September. A program aimed at providing the platform to students while instilling the values of self awareness, empathy, mindfulness, preparing them to be well rounded both academically and emotionally.
Total 50 students from 5 to 10 std. showcased their self-composed poems on various subjects. The event was graced by the Chief Guest, Principal of VPP Marathi Medium School, Hon. Mrs. Shubhani Wangikar madam and Marathi Subject Professor, Hon.Mrs. Ujwala Kulkarni madam .Their words of wisdom inspired and enlightened the students, encouraging them to enhance their intuition and shape their future.The theme of the program was conceived Mrs. Asawari Dharmadhikari madam ,aiming to boost the self-confidence and imaginative power, of the students.
The event was successfully conducted under the leadership of Hon. Chairman Mr. Jayant Khedekar sir and Hon. Principal Mr. Rajan Chettiar sir.
School Supervisor Mrs. Priyanka Bhat madam played a key role in the final preparations for the program, while School Coordinator Mrs. Minakshi Amel madam supported the overall arrangements. Teachers Mrs. Shraddha Gholap, Mrs. Prachi Deshpande, Mrs. Sneha Joshi, and Mr. Sanjay Aswar sir made significant efforts to ensure the success of the program.
29/08/2024
**विद्या प्रबोधिनी प्रशाला* *इंग्रजी*
*माध्यम येथे आज दिनांक गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी इको-फ्रेंडली गणेश उत्सव कीर्तन स्पर्धा* आयोजित करण्यात आली.
"पर्यावरणपूरक गणेश उत्सव कीर्तन स्पर्धा" या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी गणेश उत्सवादरम्यान शाश्वत पद्धतींचा प्रचार करणाऱ्या संदेशांसह कीर्तन केले. हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत प्रेक्षकांना प्रबोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. जैवविघटनशील पदार्थांचा वापर, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळणे आणि जलसंधारणाला प्रोत्साहन देणारी कीर्तने विद्यार्थ्यांनी उत्कटतेने सादर केली. त्यांच्या संगीत गुणवत्तेवर आणि त्यांच्या इको-फ्रेंडली संदेशाच्या प्रभावाच्या आधारे परफॉर्मन्सचे मूल्यांकन श्री हरी कुलकर्णी सर व रुद्राणी संत या परीक्षकांनी केले.
"या कार्यक्रमामुळे पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना निर्माण व्हावी हा उद्देश मनात ठेवून *संयोजिका सौ* *आसावरी धर्माधिकारी* किर्तन स्पर्धा ही संकल्पना राबवली. *माननीय चेअरमन श्री जयंत खेडेकर तसेच मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर यांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी सरकार्यवाहक श्री हेमंत जी देशपांडे सहकार्यवाहक श्री आनंद देशपांडे, कार्यवाहक श्री मिलिंद वैद्य, कोषाध्यक्ष श्री राहुल वैद्य तसेच संस्थेच्या सदस्या सौ सुवर्णा दाबक, सौ मिथिला देशपांडे तसेच सर्व मुख्याध्यापक सहभागी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली,
*या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका सौ प्रियांका भट तसेच शाळेच्या समन्वयक सौ मीनाक्षी आमले शिक्षिका सौ प्राची देशपांडे, सौ श्रद्धा घोलप , सौ स्नेहा जोशी, चित्रकला शिक्षिका प्रगती जाधव यांनी परिश्रम घेतले.*
तसेच कार्यक्रमाचे छायांकन
सौ.प्रियंका शेळके यांनी केले.
साऊंड सिस्टीम याची व्यवस्था श्री. दुसाने सर यांनी केली. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक उपस्थित सर्व मान्यवरांनी केले. विजेत्यांना इको-फ्रेंडली ट्रॉफी देण्यात आली आणि त्यांचे संदेश विविध प्लॅटफॉर्मवर पसरवले जातील.
तरुण पिढी परंपरेला शाश्वततेची जोड कशी देऊ शकते, यासाठी स्पर्धेने इतरांना गणेशोत्सव ग्रीन पध्दतीने साजरा करण्यासाठी प्रेरित केले.
धन्यवाद!
21/08/2024
*भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती। तत्रापि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥*
*सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन* *सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी* *प्रशाला इंग्रजी माध्यम* या *शाळेमध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी संस्कृत दिवस साजरा करण्यात आला* . कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.
कार्यक्रमाचे *प्रास्ताविक संस्कृत शिक्षिका स्मिता जोशी* यांनी केले.
कार्यक्रमात " *मम् माता देवता" हे संस्कृत* गीत विद्यार्थींनीनी गायले. तसेच विद्यार्थ्यांनी *"संस्कृत कथा काष्ठीकस्य निस्पृहता"* या कथेवर आधारित अभिनय सादर केला . " *किम मिथ्या किम वास्तवम्?* " इंटरनेट चे विश्व कसे आभासी असा संदेश देणारी आहे लघु नाटिका विद्यार्थिनींनी सादर केली. तसेच *नमामि ...नमामि संस्कृत गीतावर आकर्षक नेत्रदीपक असे नृत्य ही विद्यार्थिनींनी सादर* केले.
*शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.प्रियांका भट यांनी संस्कृत भाषा कशी मधुर आहे तिचे महत्त्व आपल्या भाषणातून मुलांना सांगितले.*
*शालेय समितीचे अध्यक्ष श्री.जयंत खेडेकर सर यांनी मुलांना केलेल्या आपल्या मार्गदर्शनात संस्कृत भाषा आपणच कशी विसरलो आहोत , ती संगणकासाठी कशी उपयुक्त आहे असे सांगितले.*
कार्यक्रमात शेवटी विद्यार्थ्यांनी बनवलेले *संस्कृत शब्दकोष संस्कृत घड्याळ,संस्कृत दिनदर्शिका यांचे अवलोकन शालेय समितीचे अध्यक्ष श्री. जयंत खेडेकर सर, मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर यांनी केले.* त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक ही केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या *संस्कृत शिक्षिका सौ स्मिता जोशी , चित्रकला शिक्षिका सौ प्रगती जाधव व नृत्यासाठी सौ.युगंधरा महाले यांचे सहकार्य लाभले*.*
कार्यक्रमास *शालेय समितीचे अध्यक्ष श्री. जयंत खेडेकर सर, मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर, पर्यवेक्षिका सौ.प्रियांका भट यांचे मार्गदर्शन लाभले.*
कार्यक्रमास समन्वयिका सौ मीनाक्षी आमले मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उत्साहाने सहभागी होते.
03/08/2024
*विद्या प्रबोधिनी मध्ये दीप अमावास्या उत्साहात साजरी.*
नाशिक: सेंट्रल हिंदू मिलिटरी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम) शाळेत शुक्रवार (2 ऑगस्ट 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील *"दीप* *अमावास्या"* इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली उत्साहात पार पाडली.
*"आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते."* विद्यार्थ्यांना दीप अमावास्या का साजरी केली जाते हे कळावे हा यामागील हेतू असून,विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या दीपांची माहिती व सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी दीपांचे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. हे कार्यक्रमाच्या द्वारे निदर्शनास आणून दिले.सूत्रसंचालना पासून तर संपूर्ण कार्यक्रमाची धुरा ही विद्यार्थ्यांनी सांभाळलेली होती. विद्यार्थ्यांनी दीपांची माहिती सांगितल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांन समवेत दीप प्रज्वलित केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती आणि संस्कारांची मूल्ये जोपासणे,नेतृत्व गुण, वक्तृत्व, सभा धीटपणा, संवाद कौशल्य, आत्मविश्वास,लेखन-वाचन, सृजनशीलता, निर्णयक्षमता, श्रमप्रतिष्ठा व कलाकौशल्य हे मूल्य रुजावे या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. राधिका गायधनी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी सौ. राधिका गायधनी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच काही बोलां सह तबलावादन सादर केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली हा दीप अमावास्ये चा कार्यक्रम राबविण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजन चेट्टीयार आणि शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. प्रियंका भट आणि समन्वयक सौ. मीनाक्षी आमले उपस्थित होत्या. अशा प्रकारे हा दीप अमावास्येचा कार्यक्रम दीपांच्या लखलखीत प्रकाशाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
29/07/2024
*विद्यारंभ संस्कार*
सी. एच. एम.ई सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यारंभ संस्कार हा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यांच्या शिक्षणातील दुसऱ्या टप्प्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,म्हणून हे संस्कार करण्यात येतात. यात वेदोपनिषदातील काही मंत्रांचे आणि ऋचांचे पठण करून घेतले जाते. यात विद्येची देवता सरस्वतीचे वंदन आणि पुजन करून तिचे स्तवन केले जाते; आणि विद्यार्थ्यांकडून संकल्प करून घेतला जातो. त्याच वेळेस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्याचे महत्व देखील सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध बासुरी वादक श्री सुहास दत्तात्रेय वैद्य उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून दैनंदिन जीवनामध्ये कसे वागावे व भविष्यात मोठी स्वप्न कशी बघावी याबाबत मार्गदर्शन केले.
शालेय समिती अध्यक्ष स आसावरी धर्माधिकारी मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या स्वतःमध्ये मूल्य कशी रु उजवावी याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम, मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार सर व पर्यवेक्षिका सौ.प्रियांका भट मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी शिक्षिका सौ.श्रद्धा घोलप,संगीत शिक्षिका सौ. नीलिमा दलाल ,चित्रकला शिक्षिका सौ. प्रगती जाधव यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाची सांगता शाळेच्या समन्वयक सौ .मीनाक्षी आमले मॅडम यांनी आभार प्रदर्शन केली.
29/07/2024
*२६ जुलै, २०२४ रोजी कारगिल विजय दिवसाला* २५ वर्षे पूर्ण झाली, या पार्श्वभूमीवर *सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी* माध्यम येथे दर वर्षी प्रमाणे शहिद जवानांना श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात
धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे व भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ति रूजावी या उद्देश्याने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धातील प्रसंग सादर करत शहीद जवानांना अभिवादन केले. तसेच
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करत वातावरण चैतन्यमय केले.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर,
शाळेच्या समन्वयक सौ.मीनाक्षी आमले, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सैनिकांचे आपल्या देशाविषयी कर्तव्य व त्यांचे योगदान याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने करण्यात आली.कार्यक्रमासाठी शाळेच्या चेअरमन सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम , शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर आणि पर्यवेक्षिका सौ. प्रियंका भट मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका सौ. स्मिता अहिरे , सौ.प्राची देशपांडे,सौ. प्रगती जाधव व इतर सहकारी शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
26/07/2024
*विद्या प्रबोधिनी मध्ये बालसभा उत्साहात साजरी.*
नाशिक: सेंट्रल हिंदू मिलिटरी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम) शाळेत मंगळवार(23 जुलै 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पहिली बाल सभा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात पार पाडली. बालसभेसाठीचा विषय *"वृक्षांचे महत्त्व"* हा होता. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये वृक्षांचे असलेले अनन्य असे महत्त्व कळावे हा यामागील हेतू असून,विद्यार्थ्यांनी आपल्या भाषण कौशल्याद्वारे व नृत्याद्वारे वृक्षांचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे, हे कार्यक्रमाच्या द्वारे निदर्शनास आणून दिले.
या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. सूत्रसंचालना पासून तर संपूर्ण कार्यक्रमाची धुरा ही विद्यार्थ्यांनी सांभाळलेली होती.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, वक्तृत्व, सभाधीटपणा, संवाद कौशल्य, आत्मविश्वास,लेखन-वाचन, सृजनशीलता, निर्णयक्षमता, श्रमप्रतिष्ठा व कलाकौशल्य हे मूल्य रुजावे या उद्देशाने बालसभेची संकल्पना ही गेल्यावर्षीपासून शालेय समिती अध्यक्ष सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून बागायती कामामध्ये अग्रेसर असणारे श्री.रवींद्र दांडगे उर्फ रवी मामा हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संगीत शिक्षिका सौ.निलीमा दलाल यांनी गीत गायन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी छान असे नृत्य प्रदर्शित केले.
कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षिका सौ. प्रियांका भट यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे वृक्षाचे महत्व व पर्यावरणाचा समतोल याचे महत्त्व सांगितले.
तसेच समन्वयक सौ मीनाक्षी आमले यादेखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
आजचा हा पहिला बालसभेचा कार्यक्रम शालेय समिती सदस्या सौ .आसावरी धर्माधिकारीआणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजन चेट्टीयार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाला.
कार्यक्रमासाठी शिक्षिका सौ.आशा जाधव यांनी परिश्रम घेतले.
26/07/2024
*Investiture Ceremony at Vidya Prabodhini Prashala English Medium School ,*
Nashik.
On 25 th July, Vidya Prabodhini Prashala English Medium School in Nashik held its investiture ceremony, a significant event marking the formal installation of the newly elected or appointed leaders and officers of the school, aiming formally to invest the newly elected leaders and officers with their respective roles as well as to inspire and motivate the new leaders to uphold the values and their responsibilities associated with their positions.To know the spirit of leadership and responsibility about the betterment of school. The ceremony commenced with a warm welcome and an introduction of the dignitaries. *The event was graced by the presence of the chief guest,*Honorable Dr. Varsha Bhalerao madam , a renowned personality from Nashik city has made great contribution to the society. Her work has had a significant impact and servers as an inspiration to everyone in the program *Hon. Dr. Bhalerao mam delivered an inspiring speech, emphasizing the importance of leadership and responsibility to the overall development of school.**The newly elected leaders took the oath of office, pledging their commitment to their roles. Badges or sashes were then presented to the new leaders, symbolizing their official roles within the school responsibilities.The newly invested leaders addressed their vision and goals for their tenure. The ceremony concluded with a vote of thanks, expressing gratitude to all who contributed to the event's success.The program was conducted successfully due to the guidance of Hon Chairperson Mrs.Asawari Dharmadhikari madam.Res. principal Mr. Rajan Chettiar sir supported strongly which enabled to bring the program to fruition.Res. Supervisor Mrs.Priyanka Bhat mam gave deep insight to make the event possible.Sports master Mr. Anil Dusane sir took great efforts to set the entire program.The program was coordinated by Mrs.Prachi Deshpande and Mrs.Anita Hire teachers .The event ended with the recitation of "Vande Mataram" by the Meghalay girls.