08/11/2025
🌾
*शालांत परीक्षेतील कमी गुण... पालकांंची चिंता*
दिपावली नंतर शाळा सुरू होताच प्रथम सत्र शालेय परिक्षांचा निकाल जाहीर होतो. दरवर्षी बरेच पालक निराशाजन्य प्रश्न विचारतात... सर माझ्या पाल्याला गणित विषयात फारच कमी गुण मिळाले/ नापास झाला. हे सहसा इयत्ता सातवी, नववी,state/CBSE/ICSE या वर्गात अनुभवायला मिळते. अकरावी - बारावी त इंटिग्रेटेड कोर्स असतो म्हणून शालेय गुण हा मुद्दा पालकांना महत्त्वाचा नसतो.
गणित हा विषय शालेय जीवनात बऱ्याच विद्यार्थ्यांना भितीदायक वाटत असतो. गणित विषयाच्या अभ्यासात analytical skill म्हणजे विश्लेषण क्षमता आवश्यक असते. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची ती क्षमता वेगवेगळ्या वयात विकसित होते. शालेय परिक्षेत गणितात कमी गुण म्हणजे तो विद्यार्थी मंदबुद्धी नसतो. त्या विद्यार्थ्यांना समजून घेण्याची गरज असते.
मी दहावीपर्यंत गणितात नेहमी नापास होत होतो. तरीही मी ४५ वर्षापासून गणित विषय शिकवत आहे. गणितावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुस्तके मी लिहीली परंतु मला आजही पाढे येत नाहीत.
माझा मित्र तुळशीदास मोरे हा अनेकदा गणितात नापास झाला होता. तो आज Belimore ह्या नाशिकच्या कंपनीचा मालक आहे.
प्रश्न आहे.... गणितात नेहमी नापास होत असेल तर शिकुन काय फायदा ? सगळेच IITan होत नसतात परंतु जिवनात हेच विद्यार्थी खुप काही करुन जातात. वेळ दिला पाहिजे, टाळाटाळ तर होत नाही ना. यावर लक्ष द्या ! विद्यार्थी गणित शिकताना त्रस्त होत असेल, रडत असेल तर त्याच्या कलेने घ्या !
विद्यार्थी Demotivate होईल असे कोणतीही चर्चा घरात करु नये. ज्या विषयात चांगले गुण आहेत त्यावर शाबासकी द्या.
एका वर्तमान पत्राने गत पन्नास वर्षांच्या मॅट्रिक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा पाठपुरावा केला होता. निरीक्षणादरम्यान असे आढळून आले की त्या पन्नास पैकी दोन तीनच विद्यार्थ्यी यशस्वी झाले होते. इतर सर्व सर्वसाधारण जिवन जगत होते.
१९९० चा मानखुर्द झोपडपट्टीतील म्हस्कर नावाचा विद्यार्थी महाराष्ट्रात दहावीला बोर्डात प्रथम आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे स्वतः त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन बक्षीस दिले. नंतर त्याला अकरावीत नापास होण्याची वेळ आली होती, शेवटी शाळेने पास केले होते.
सलमान खान यांनी मुलाखती त स्वतः मान्य केले होते की ते गणितात नेहमी नापास होत असत.
तसेच इंग्रजी विषयाचे पण आहे. आजकालच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी इंग्रजी व्याकरणाचे वेगळे पुस्तक असते. माध्यम इंग्रजी असून इंग्रजी त नापास होणे. म्हणजे त्या भाषेचा सराव नसणे. आमच्या काळात इयत्ता ८ वीत ABCD शिकवणे सुरू होई. तिन वर्षे अक्षरशः इंग्रजी शिकवणे म्हणजे टाईमपास ! पुढे BSc पर्यंत फारसे इंग्रजी नसे. ठराविक वाक्यांचा उपयोग एवढेच इंग्रजी. जसे की..... It is defined as.., /consider that..., /putting value of x=.... / solving above equation.... We get / The chemical reaction is.....
अवांतर वाचन करताना फार वांदे..! लेफ्टनंट कर्नल चे स्पेलिंग मला अजूनही येत नाही. मला नेहमी प्रश्न पडत असे की.... tion चा उच्चार शन कसा? व्हॅक्युम या शब्दात डबल यु uu कसा येतो absenteeism मध्ये ee नंतर लगेच i कसा ? यांची उत्तरे आजही मला माहीत नाहीत हो. परंतु मी तासंतास कोणत्याही विषयावर इंग्रजी भाषेत बोलू शकतो. सांगायचा हेतू एकच... शालेय गुणांना महत्त्व देवू नका.
शालेय परीक्षेतील गुणांचा पुढे फरक पडत नाही. हे लक्षात ठेवावे.
P G Pawar.
(Founder and chief director) Shree IIT Mumbai.
9867935651