03/01/2026
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन*
*अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आज दिनांक ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.*
*यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकौशल्य विकसित व्हावे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची ओळख व्हावी, या उद्देशाने वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.*
*या स्पर्धेत प्राथमिक गट, उच्च प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा तीन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य, स्त्रीशिक्षणाचे महत्त्व, सामाजिक सुधारणा तसेच समतेचा संदेश या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राथ. शिक्षक श्री. देसले सर होते.*
*तसेच शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.*
*या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. अक्षयभाऊ पवार, माध्यमिक मुख्याध्यापक दादासो मा. श्री. अविनाशजी पवार सर, प्राथ. मुख्या. मा. श्री. किशोर पाटील सर, यांची उपस्थिती लाभली.*
*कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, अभिव्यक्ती कौशल्य व सामाजिक जाणीव वाढीस लागल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.*
🙏🙏💐💐💐💐🙏🙏