MVP ITI, Nandgaon

MVP ITI, Nandgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MVP ITI, Nandgaon, Educational Research Center, New English school, Campus, Nandgaon.

25/02/2026
आज मंगळवार दि. २०/१/२०२६ रोजी शासकीय आय टी आय येथे तंत्र प्रदर्शन पाहाण्यासाठी मा. प्राचार्य, निदेशक व सर्व प्रशिक्षणांर...
21/01/2026

आज मंगळवार दि. २०/१/२०२६ रोजी शासकीय आय टी आय येथे तंत्र प्रदर्शन पाहाण्यासाठी मा. प्राचार्य, निदेशक व सर्व प्रशिक्षणांर्थी या सर्वाची उपस्थिती

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेलीपहार काढून ज्या माऊलीनेगुलामगिरीच्या छाताड्यावर केला प्रहारत्या थोर राजमाता जिजाऊला मान...
13/01/2026

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताड्यावर केला प्रहार

त्या थोर राजमाता जिजाऊला मानाचा मुजरा

राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन...

जिजाऊ यांची गौरव गाथा
त्यांच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता

दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी मविप्र औद्योगीक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य , गटनिदेशक , निदेशक व सेवकवृंद उपस्थीत होते....

03/01/2026
आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि आदित्य...
02/01/2026

आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई (एम पॉवर) यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना मानसिक आरोग्य प्रकल्प यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औ. प्र.संस्थेचे प्राचार्य श्री.एच.बी.ठाकरे सर होते. अध्यक्षीय मनोगतामध्ये ठाकरे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये बळावणाऱ्या मानसिक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा अतिवापर तसेच सोशल मीडियावरील वेगवेगळ्या गेमिंग लिंक्स, मोबाईल मधील अनेक प्रकारच्या गेमिंग ॲपमुळे, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामधील समन्वय दुरावला जात असल्याने विद्यार्थी हे एकल भूमिका घेतात तसेच मानसिक समस्यांना बळी पडत असतात व चुकीचे निर्णय घेतात व्यसनाधीनतेकडे वळतात. आणि म्हणूनच याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी औ.प्र.संस्थेतर्फे श्री चेतन राठोड यांना निमंत्रित करण्यात आलेले होते.प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन करताना श्री.चेतन राठोड यांनी सध्या समाजात नैराश्य, चिंताग्रस्तता, व्यसनाधिनता, आत्महत्या यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. यासारख्या समस्यांपासून सोडवणूक करणे काळाची गरज असुन सदर बाबतीत भविष्यात देखील मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर राहील असे आश्वासन दिले.

आज दि.01/1/2026रोजी महाबली ट्रेडर्स इंजि.वर्कशॉप, नांदगाव येथे इंडस्ट्रीयल व्हीजीट निमित्ताने मविप्र औ.प्र.संस्थेचे प्रा...
01/01/2026

आज दि.01/1/2026रोजी महाबली ट्रेडर्स इंजि.वर्कशॉप, नांदगाव येथे इंडस्ट्रीयल व्हीजीट निमित्ताने मविप्र औ.प्र.संस्थेचे प्राचार्य श्री.एच.बी.ठाकरे सर,गट निदेशक श्री. एस. जे. ठाकरे सर निदेशक श्री.एच.बी.सोनस सर, श्री.ए.बी.वाणी, श्री.आर.एस.बोराळे,श्री.जे.के.बोरसे, तसेच शाखेतील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी मा.श्री.सुनील भाऊ वाघ साहेब (Training Officer) यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले तसेच मेकॅनिकल विषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले.

आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (सब स्टेशन) , नांदगाव येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी कनिष्...
01/01/2026

आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (सब स्टेशन) , नांदगाव येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी कनिष्ठ अभियंता पाटील साहेब, तसेच स्टेशन ऑपरेटर श्री.वाघ साहेब यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यासोबतच औ.प्र.संस्थेचे वरिष्ठ निदेशक श्री.आर.आर
चव्हाण यांनी देखील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी श्री.आर.आर.चव्हाण, श्री.डी.डी.काकळीज, श्री.डी.एस.अमराळे, श्री.एस.बी.बोरसे, श्री.के.डी.आहेर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

*मविप्र औ.प्र.संस्थेत वीर बाल दिवस संपन्न*मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथ...
26/12/2025

*मविप्र औ.प्र.संस्थेत वीर बाल दिवस संपन्न*
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथे वीर बाल दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी सामाजिक क्षेत्रात तसेच पर्यावरण संवर्धन व गरजू तसेच निराधार लोकांना मदत करण्यासाठी अग्रेसर असलेला युवक ओम संजय ठाकूर तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी ईश्वर शंकरराव पवार यांनी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल, नांदगावचे जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशोक मार्कंड यांनी छोट्या छोट्या चांगल्या समाजोपयोगी गोष्टींवर लक्ष घालावे. पर्यावरणाचे संवर्धन करावे. प्राणी मात्रांवर भूतदया दाखवावी. तसेच शौर्य गाजवण्यासाठी सैनिकी सेवेतच जाण्याची आवश्यकता नसून स्थानिक पातळीवरील छोट्याछोट्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला तरी समाजकार्य घडत असते.अपघातग्रस्तांची मदत करा. भ्रष्टाचाराला थारा देऊ नका. अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य एच. बी. ठाकरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना आवाहन केले की आज समाजामध्ये अनेक गरजू तसेच बेसहारा लोक आहेत त्यांना आपल्या परीने छोटेखानी मदत करावी. त्यांना गरजेनुसार तसेच आपल्या परिस्थितीनुसार सहकार्य करावे. तसेच आजच्या तरुणाईमध्ये अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांचे लक्षणे दिसून येतात. तसेच आजची युवा पिढी ही सोशल मीडियाच्या अधीन गेलेली दिसते तरी या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी योगाभ्यास तसेच व्यायाम व खेळाकडे विशेष लक्ष केंद्रित करावे जेणेकरून आजची पिढी सक्षम होईल व रोगराई हद्दपार होईल आणि हीच खरी आजच्या वीर दिवसासाठी आदरांजली ठरेल असे अध्यक्षीय भाषणात विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एच.बी.ठाकरे होते प्रास्ताविक निदेशक आर.आर.चव्हाण यांनी केले तर आर.एस.बोराळे व एस.बी.बोरसे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस यु टेंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.डी काकळीज यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेतील निदेशक निदेशकेतर कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय मूल्य व शौर्य याबाबतची शपथ घेऊन तसेच राष्ट्रगीताने झाली.

Address

New English School, Campus
Nandgaon
423106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MVP ITI, Nandgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share