11/08/2025
CBSE चा 9वीसाठी Open Book Exam निर्णय ऐकून मन खिन्न झालं.
विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याच्या नावाखाली आपण त्यांची विचारशक्ती हरववतो आहोत का?
आमच्या काळात आम्ही पुस्तकं वाचली, पाठ केली, मनातल्या मनात उत्तरं शोधली…
तेव्हा संयम, स्मरणशक्ती, आत्मविश्वास तयार होत होता.
आज पुस्तकं समोर ठेवून लिहिणं सोपं आहे, पण विचार करण्याची सवय हरवली तर?
ज्ञान फक्त पुस्तकात नसतं, ते मेहनतीत आणि आठवणीत असतं.
ताण कमी करण्यासाठी पुस्तकं नव्हे, योग्य अभ्यासपद्धती आणि प्रेरणा हवी.
भविष्य घडवण्यासाठी सोपे रस्ते नाही, तर मजबूत पायाभरणी हवी!
#विद्यार्थीविचार #मराठीपोस्ट #शिक्षणव्यवस्था #गावचागुरुजी #मराठीविचार #विद्यार्थी #मराठीशिक्षक #मराठीमन #गावआणिशिक्षण