Kai Vasantrao Kale Senior College, Nanded

Kai Vasantrao Kale Senior College, Nanded

Share

At Chawal wala Complex, Degloor Naka, Nanded

Photos from Kai Vasantrao Kale Senior College, Nanded's post 12/08/2024

मैदानी खेळ हे सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली-डॉ. माधवराव पाटिल किन्हाळकर

नांदेड दि. – 12 ; स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत 'क' झोन अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालया द्वारे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाटन समारंभात डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी वरिल उद्‌गार काढले.

कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन दि.12/08/2024 रोजी करण्यात आले या स्पर्धेत आठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्‌घाटक म्हणून पुढे बोलताना डॉ. किन्हाळकर म्हणाले की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तिने मैदानी खेळ खेळला पाहिजे. ज्यामुळे मनोरंजनाबरोबरच निरोगी आरोग्य देखिल लाभते. प्रमुख पाहुणे म्हणून, भगवानराव पाटिल आलेगावकर म्हणाले की, महिती तंत्रज्ञानाच्या युगात युवक मैदानी खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे विशेष प्रयत्न करून युवकांना मैदानी खेळाकडे वळवण्याची गरज निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. उमान गणी यांनी केले. या वेळी मंचावर, क झोनचे चेअरमन प्राचार्य डॉ. पंजाब चव्हान, कै. बानो एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मझरोदीन,प्राचार्य डॉ. बाबुराव घायाळ,
क झोन सचिव डॉ. व्यंकट माने, निवड समिती अध्यक्ष, डॉ.उदय चव्हान, डॉ.महेश वाखरडकर,डॉ. किरण येरावार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. माने यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब भुक्‍तरे यांनी मानले. बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा.डी.बी. जांभरुणकर हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. मोहम्मद दानिस, प्रा. अक्षय हासेवाड,प्रा.सय्यद फराज, वैभव दमकोंडवार, मोहम्मद मोहसिन, मोहम्मद अतीफ,डॉ.जी.डी.कदम,डॉ. छाया कोठे,डॉ.दिलीप माने, डॉ.बळीराम इंगळे,डॉ.राहुल सरोदे,मोहम्मद अन्वर,वैभव अंभोरे,डी.व्ही.सोनसळे, गोविंद पांचाळ यांनी विशेष सहकार्य केले.

01/07/2024

All the students of the third year are hereby informed that those who have passed in Winter 2023 and Summer 2024 are requested to fill their convocation form as early as possible.
“Principal Kai Vasantrao Kale Senior College, Nanded”

19/06/2024
15/06/2024

85 bright minds from Kai Vasantrao Kale Senior College, Degloor Naka Nanded, graduated this academic year, ready to transform their knowledge into impactful contributions to society and their communities.

21/05/2024
07/03/2024

مولانا آزاد اردو نیشنل یونیورسٹی حیدرآباد
اسٹڈی سینٹر وسنت راؤ کالے سینئر کالج کا اعزاز
وسنت راؤ کالے سینئر کالج ناندیڈ مولانا آزاد ایونیورسٹی (حیدرآباد )کے فاصلاتی تعلیمی مرکز (اسٹڈی سینٹر ) کو (D D E ) director distance Education کی جانب سے ابتدائی مرحلے میں عمدہ کا ر کر د گی کی بنیاد پر اعزازی سند Appreciation Certificat سے نوازا گیا .واضح رہے کہ اسی سال ادارے هذا کو اسٹڈی سینٹر تفویض کیا گیا .اور ساتھ ہی کو آ ڈینیٹر ڈاکٹر سید واجد کی کا ر کر د گی کو سراہا گیا اس موقے پر ادارے کے پرنسپل ڈاکٹر سید عثمان غنی ،پروفیسر محمد اسمعیل صدر شعبہ اردو محمد دانش، محمد محسن، محمدمجیب و دیگر تدریسی و غیر تدریسی عملہ نے مبارک با د پیش کی.

16/02/2024

कलेची जोपासना करून मनुष्य परिपूर्ण आयुष्य जगू शकतो – डॉ.मनोज बोरगावकर

नांदेड दि. 13 कलेची जोपासना करून कोणताही व्यक्ती परिपूर्ण आयुष्य जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डाॅ.मनोज बोरगावकर यांनी केले ते देगलूर नाका येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. देगलूर नाका येथील कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक संमेलनाची सुरुवात आज झाली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे प्रा.डी.बी. जांभरुणकर हे होते तर प्रमुख उपस्थिती संस्था सचिव अर्जुमंदबानो यास्मिन यांची होती.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.पुष्पा क्षीरसागर यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उस्मान गणि यांनी केले.
पुढे बोलताना डॉ.मनोज बोरगावकर म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने कोणत्या ना कोणत्या कलेची जोपासना केली पाहिजे कारण कला ही मनुष्याच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देत असते.व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी विविध प्रकारचे व्यवसाय करतो,पण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कलेची जोपासना करत असते त्यातून त्याचे आयुष्य समृद्ध होते. जीवन जगत असताना व्यक्तींनी बेगडीरूप धारण न करता वास्तवदर्शी वर्तन करूनच जीवन जगले पाहिजे तरच त्या व्यक्तीची ओळख ही मृत्यूनंतरही चिरकाल टिकून राहत असते.यावेळी संस्था सचिव प्रा.अर्जुमंदबानो यास्मिन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डी.बी. जांभरुणकर यांनी विद्यार्थ्यांना श्रम,सचोटी आणि मेहनतीने जीवनात मार्गक्रमण करून यशस्वी व्हावे असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.स्मिता कोंडेवार यांनी केले तर आभार प्रा.डाॅ.बाबासाहेब भुक्‍तरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.सय्यद वाजीद,प्रा.मो.इस्माईल,प्रा.मोहम्मद दानिश,प्रा.शेख नजीर शेख पाशामियाँ,प्रा.निजाम इनामदार,प्रा.सय्यद फराज, प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.शेख असिफ,प्रा.अजमत बेगम, प्रा.डाॅ.फर्जाना बेगम,प्रा. तर्रनुम चिश्ती,प्रा.सनोबर, प्रा.शबाना,प्रा.समीना खान,प्रा.जवेरीया,प्रा.इप्तेसाम ,प्रभावती नवसागरे,सचिन जोंधळे सर,आदित्य भोंग,आयेशा बेगम,आशाबाई,मोहम्मदी बेगम यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

03/01/2024

कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नांदेड दि.3 देगलूर नाका येथील काय वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. मोहम्मद दानिश,प्रा.डॉ. सय्यद वाजीद,प्रा.डॉ. बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा.पुष्पा क्षीरसागर, प्रा.डॉ.फरजाना बेगम,प्रा शबाना बेगम ,प्रा.जवेरीया गोहर, प्रा.निजाम शिक्षकेतर कर्मचारी आयेशा बेगम,मोहम्मदि बेगम,आशा आंबेराव यांच्यासह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Photos from Kai Vasantrao Kale Senior College, Nanded's post 13/10/2023

اُردو رسائل و اخبارات کا مطالعے کے ذریعہ اُردوزبان کا فروغ ممکن

ناندیڑ:12/اکتوبر(راست) شہر کے واحد اقلیتی ڈگری کالج کے وسنت راؤ کالے سینئر کالج میں بتاریخ 12/اکتوبر 2023کو استقبالیہ پروگرام کا انعقاد عمل میں آیا۔ وہیں کالج میں بزم اُردو ادب کی افتتاحیہ تقریب بھی عمل میں لائی گئی۔ اس باوقار تقریب میں نومنتخبہ ارکان (بورڈ آف اسٹیڈیز اُردو سوامی رامانند تیرتھ مراہٹواڑہ یونیورسٹی کا استقبال کیا کیا۔ اودگیر کے جناب مقبول احمد صاحب نے صدارتی ذمہ داریاں سنبھالیں مہمانان خصوصی کے طورپر ڈاکٹر حمید اللہ خان صاحب (سابقہ ایچ اوڈی) ڈاکٹر حامد اشرف (ممبر بی۔ او۔ایس)، ڈاکٹر قاضی کلیم الدین (ممبر بی۔ او۔ ایس)، ڈاکٹر ارشاد احمد خان (ممبر بی۔ او۔ ایس) ڈاکٹر نورالامین (ممبر بی۔ او۔ ایس)محمد وسیم الدین (ممبر بی۔ او۔ ایس) موجود تھے۔ تقریب کا آغاز تلاوت کلام پاک سے ہوا۔ نورجہاں بیگم (سال سوم) نے قرأت سے سب کو مسحورکیا۔ بی کام سال سوم کے طالب علم مقیط الاسلام نے حمد باری تعالیٰ پیش کی، نعت رسول مقبول بی اے فرسٹ ایئر کی طالبہ نے پیش کیا اس کے بعد تمام شرکائے تقریب کا گل پوشی و شال پوشی کی گئی۔ تقاریر کے سلسلہ میں جناب ڈاکٹرحامد صاحب نے طالبات کو لگن مستقل مزاجی کے ساتھ سخت محنت کرنے کی تلقین کی، ڈاکٹرحمید اللہ خاں صاحب نے دورحاضر اور اُردو زبان پر اپنے خیالات کا اظہار کیا۔ جناب ڈاکٹر قاضی کلیم الدین صاحب نے اپنی مترنم آواز میں غزل پیش کی جس سے سامعین مسحور ہوئے۔ صدارتی خطبہ میں ڈاکٹر مقبول احمدصاحب نے طلباء کو اُردو رسائل و اخبارات کے مطالعے کے ذریعہ اُردوزبان کے فروغ میں عملی حصہ لینے کی دعوت و تلقین کی۔ نظامت کی کاروائی فرح ناز اوربریرہ (سال اول) کی طالبات نے بحُسن و خوبی انجام دیں۔ ڈاکٹر فرزانہ بیگم کے اظہار تشکر پر پروگرام کا اختتام عمل میں آیا۔ اس پروگرام کو کامیابی سے ہمکنار کرنے میں اراکین بزم اُردو ادب نے عملی حصہ لیا نیز کالج کے پرنسپل ڈاکٹر عثمان غنی صاحب، پروفیسر محمد اسماعیل، پروفیسر پشپا شرساگر، پروفیسر سمتا کونڈے وار، پروفیسر رضوان، پروفیسر محمد جنید، پروفیسر شیخ نذیر، پروفیسر نظام الدین، نوری میڈم،جویریہ گوہر میڈم، لمعت النور میڈم، شائستہ میڈم، ابتسام میڈم، خان ثمینہ میڈم، ترنم میڈم، دانش سر،اکشے سر،اطیب الدین وغیرہ نے بھی پروگرام کی کامیابی میں عملی طور پر حصہ لیا۔

Photos from Kai Vasantrao Kale Senior College, Nanded's post 18/09/2023

कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाद्वारे व्हॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन

नांदेड दि.18 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत "क" झोन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालया मार्फत यशस्वीपणे करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून स्वारातीम नांदेडचे माजी क्रीडा संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मझरोद्दीन खलिलोद्दीन हे होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ.उस्मान गणी,निवड समिती अध्यक्ष डॉ.विक्रम कुंटूरवार,कझोन सचिव डॉ.महेश वाखरडकर, डॉ.बालाजी जाधव,डॉ. किरण येरावार,डॉ.मनोज पैंजणे,डॉ.बळीराम इंगळे,डॉ. अश्विन बोरीकर,इम्तियाज खान यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत 'क'झोन मधील एकूण 13 महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवला. मुलांमध्ये प्रथम क्रमांक शारीरिक शिक्षण महाविद्यालय,कौठा नांदेड,द्वितीय श्री.गुरुगोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड तर तृतीय क्रमांक यशवंत कॉलेज, नांदेड यांनी पटकावला. मुलींमध्ये श्री. गुरुगोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम,बळीराम पाटील महाविद्यालय किनवट द्वितीय तर तृतीय क्रमांक सायन्स कॉलेज नांदेड यांनी मिळवला.पंच म्हणून कासिम खान,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी क्षीरसागर,अजिंक्य पवार,साजिद खान,प्रशांत आळणे,सय्यद अब्बास यांनी काम पाहिले.पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर तुळशीराम पवार महाविद्यालय हाडोळती चे प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार हे होते. व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय,देगलूर नाका नांदेड द्वारे करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.दिलीप माने, डॉ.फुलारी सर,डॉ.गजानन कदम,डॉ.राहुल सरोदे,डॉ.छाया कोठे,डॉ.सीमा सबनीस यांनी सहकार्य केले तर संयोजक म्हणून प्राचार्य डॉ.उस्मान गणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सय्यद वाजिद, प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा. मोहम्मद दानिश,प्रा.शेख नजीर शेख पाशामियाॅं,प्रा.अक्षय हासेवाड,मो.मोहसिन,शेख फुरखान यांनी विशेष परिश्रम घेतले.

07/09/2023

कै.वसंतराव काळे वरीष्ठ महाविद्यालयाचा फुटबॉल संघ उपविजेता

सगरोळी दि.7 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सी. झोन मध्ये खेळवण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे. सगरोळी येथील उत्कर्ष व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज सगरोळी द्वारे आयोजित या फुटबॉल स्पर्धेत सी.झोन मधील एकूण पाच संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना गुरुगोविंद सिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड व कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड यांच्यात झाला अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात 5/4 असा निसटता पराभव होऊन कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय उपविजेता ठरला.या संघास क्रीडा संचालक प्रभारी प्राचार्य डॉ. उस्मान गणी यांनी मार्गदर्शन केले.संघाचा कर्णधार शेख साद अमिन शेख बिलाल अमिन होता. संघातील इतर खेळाडूत मोहम्मद ईरशाद,मो.फैजान खान मो.रहमत खान,शेख कैफ शेख अख्तर,शाजेब खान,सय्यद अदनान,सलमान खान शुकूर खान,मोहम्मद फैजान,कुरेशी अराफात,उमर फारुखी, सय्यद रेहान,सय्यद शम्स, मोहम्मद जुनेद,शेख शारेख, शेख अल्ताफ यांचा समावेश होता. यावेळी सी झोन फुटबॉल निवड समिती अध्यक्ष डॉ.विक्रम कुंटूरवार व सदस्य. डॉ उस्मान गणि यांनी निरीक्षण केले तर स्पर्धेचे उद्घाटन सी झोनचे सचिव प्रा. डाॅ महेश वाखरडकर यांच्या हस्ते झाले आणि क्रीडा शिक्षक मोहम्मद अथरोद्दीन कुरेशी यांनी पंच प्रमुखांचे विशेष कार्य केले सी.झोन स्तरावर फुटबॉल संघाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोहम्मद मझरोद्दीन,सचिव प्रा.अर्जुमंदबानो यास्मिन, प्रा. डाॅ.स्मिता कोंडेवार,प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा.मो.इस्माईल, प्रा.रिजवान बागवान,प्रा.शेख नजीर,प्रा.मो.दानिश,प्रा. फर्जाना बेगम,प्रा.नुरी बेगम, प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.डॉ. सय्यद वाजिद,प्रा.निजाम.मो.मोहसिन यांनी अभिनंदन केले आहे.

Want your school to be the top-listed School/college in Nanded?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Degloor Naka
Nanded