Phulora nanded.

Phulora nanded. new concept school at nanded concept school at nanded.

01/10/2022

जो शब्द वाचायचा आहे,त्यापुढील शब्द पाहण्याची सवय असणे,ही शैक्षणिक समस्या काही मुलांमधे आढळते.ही समस्या सोडवन्यासाठी आम्ही हे रिडिंग कार्ड बनवले आहे.नवनवीन प्रयोग,म्हणजेच तर खरे शिक्षण आहे ना...😊

आज आपल्या "फूलोरा नंदनवन" येथे नांदेड शहरातील "क्रिएटिव क्लासेस"चे संचालक,हजारो डॉकटर्स,इंजीनियर्सचे गुरु,प्रा.रमाकांत ज...
15/09/2022

आज आपल्या "फूलोरा नंदनवन" येथे नांदेड शहरातील "क्रिएटिव क्लासेस"चे संचालक,हजारो डॉकटर्स,इंजीनियर्सचे गुरु,प्रा.रमाकांत जोशी सरांनी भेट दिली..कुष्ठधाम नेरली या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या आणि समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या संस्थेच्या आवारात सुरु असणाऱ्या फूलोरा शाळेस जोशी सरांनी भेट देवून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.सोबत सरांच्या अर्धांगिनी होत्या.अचानकपने सरांनी येऊन एक सुखद धक्का दिलाय..एका नव्या शैक्षणिक क्रांतिची ही सुरुवात असल्याची सरांनी दिलेली पावती आम्हास प्रेरणादायी आहे..😊

24/01/2021

"लाॕकडाऊनचा हा काळ माझ्या 10 आणि 12 वर्षांच्या मुलांनी कसा घालविला?"
या विषयावर मी 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5वाजता Phulora nanded या माझ्या फेसबुक फेजवरून मी व्यक्त होणार आहे.
आपल्या मुलांसोबत , कुटुंबासोबत व आपल्या मित्र परिवारासह अवश्य सहभागी व्हा.

09/11/2020

पालकांच्या या मनस्वी प्रतिक्रिया म्हणजे आमच्या कार्याचे चीज होणेच आहे..

दिनांक : ०९/११/२०२०

आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येक व्यक्ती ही अस्वस्थ आहे . पैसा आणि त्यातुन मिळणार भौतिक सुख हे अंतिम ध्येय आहे . अपयशाच्या अनामिक अशा भितीने सर्वच ग्रस्त आहेत . आपल्या मुलांना आपण केंव्हाच सतत धावणाऱ्या रोबोट्स मध्ये रूपांतरीत केलेले आहे . संपूर्णपणे व्यावसायिक झालेल्या शाळा , सोबतीला कोचिंग क्लासेस , घोकंपट्टीवर आधारित अभ्यास , सतत पुढे राहण्याचे दडपण यात मुलं अर्थातच होरपळून निघत आहेत . एकलकोंड्या आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या पिढ्या आपण कळत-नकळत घडवत आहोत . हे दुष्टचक्र तोडायचे असेल तर यात "शाळा" या संस्थेचा फार मोठा वाटा असणार आहे .

भारतभरात काही उत्कृष्ट अशा प्रायोगिक शाळा आहेत ज्या मुलांना त्यांचं बालपण आणि त्यांची सृजनक्षमता मिळवून देत आहेत . "शिकणे" या प्रक्रियेतील स्वयंस्फुर्तता आणि नैसर्गिकता जपत आहेत . आपल्या भरकटलेल्या शिक्षणव्यवस्थेस अशा शाळाच पुढे योग्य मार्ग दाखवतील .

नांदेड शहरातही शिक्षणाच्या बाबतीत कुठली आशादायक परिस्थिती आढळून येत नाही हे खरे परंतु यास सध्या एक अपवाद आहे तो म्हणजे सुचिता पाटील यांची "फुलोरा" नावाची शाळा . माझी मुलगी फुलोरात युकेजी मध्ये आहे . माझा फुलोराशी संबंध मागिल दोन वर्षांपासुनचा . संचालक सुचिता पाटील ह्या मुळातच प्रयोगशिल आहेत तसेच शिक्षणक्षेत्रात त्यांचा दोन दशकांचा अनुभवही आहे . परंपरागत शिक्षणव्यवस्थेची अकार्यक्षमता आणि व्यावसायिकता त्यांना अस्वस्थ करते . यातुन मग मुलांच्या नैसर्गिक वाढीशी , त्यांच्या क्षमतांशी आणि आवडी-निवडीशी समरूपता साधू शकणाऱ्या काही अभिनव शिक्षण-पद्धती त्यांनी विकसीत केलेल्या आहेत . पाठांतराला फाटा देऊन प्रत्यक्ष कृतिशीलतेवर व स्वानुभवावर येथे भर देण्यात येतो . फुलोरातील मुले ही अधिक निर्धास्त , उल्हासीत आणि सृजनशिल असल्याचे स्पष्ट जाणवते .

आजच्या निरागस मुलांना त्यांच्या येणाऱ्या भविष्यात खंबिरपणे आगेकूच करण्याकरीता तसेच एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याकरीता आजची नियमित शिक्षणपद्धती किती बरे हातभार लावत आहे ? या प्रश्णाच्या शोधात आपल्यापुढे उत्तर म्हणून "फुलोरा" सारख्या शाळा पुढे येतात . महत्त्वाचा मुद्दा एकच आहे ; अशा समांतर व्यवस्था ह्या टिकयला हव्यात , वाढायला हव्यात . शिक्षणाचा खरा अर्थ कळण्या इतपत समाजमन प्रगल्भ होणे ही आजच्या वर्तमानाची तातडीची गरज आहे .

डॉ सचिन सरोदे
डॉ स्वाती सरोदे
(मितांशी सरोदे चे पालक)

24/10/2020

अस्वच्छ रस्ते, कचरा, सार्वजनिक इमारतींची अस्वच्छ अवस्था, सरकारी दवाखान्यांच्या रंगीत भिंती, सार्वजनिक अस्वच्छतागृहे, राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची अवस्था , एकूण देशभरातील कचरा कुंड्यांची न मोजलेली संख्या पहाता आपल्या देशात 'शिक्षण व्यवस्था ' आहे आणि शिक्षितही आहेत यावर विश्वासच बसत नाही.

23/10/2020

"लहान मुलांवर संस्कार कसे करावेत?" या महत्त्वाच्या विषयावर उद्या सायंकाळी पाच वाजता मी व्यक्त होणार आहे.
या चांगल्या उपक्रमाला आपल्या प्रोत्साहनाची अपेक्षा आहे.
भेटूया उद्या 24 आॕक्टोबर सायं. पाच वाजता.

22/10/2020

Hello all parents, teachers and students .
आजपासून मी शिक्षणा संबंधी माझे विचार मांडणार आहे.
मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कितीही चांगला शिक्षक कुणालाही काहीही शिकवू शकत नाही. शिकणं ही वैयक्तिक पातळीवर चालणारी अतिशय सुरेख प्रक्रिया आहे.

10जाने.ते 19 जाने. फुलोरा स्कुल मध्ये नाट्य प्रशिक्षक व नाट्य दिग्दर्शक  सौ शुभांगी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांस...
16/03/2019

10जाने.ते 19 जाने. फुलोरा स्कुल मध्ये नाट्य प्रशिक्षक व नाट्य दिग्दर्शक सौ शुभांगी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी नाट्य शिबीर झाले. यामध्ये मुले नाट्यलेखन, नेपथ्य,वेशभुशा, अभिनय व म्युझिक अशा नाटकाच्या सर्व गोष्टी शिकली व स्वतः मुलांनी एक एकांकीका लिहून तिचे सादरीकरणही 'फुलोरोत्सवात' केले.

या 'घाम हवा घाम' या मुलांनी लिहिलेल्या हस्तपत्रीकेचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलगुरु डाॕ. उद्धव भोसले सर यांच्या हस्ते आणि मा. माधुरी पुरंदरे, मा . सुशील शुक्ल, मा. राजीव तांबे याःच्या उपस्थितीत सद्या विद्यापीठात चालू असलेल्या "बालसाहित्य - सद्यःस्थिती आणि भवितव्य " या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मुलांच्या उपस्थितीत झाले.

10/03/2019

🙏पालकमित्रहो,
मी सुचिता पाटील, नांदेडमध्ये "फुलोरा प. स्कुल" या इंग्रजी शाळेच्या माध्यमातून काम करीत आहे.
शासनाने जागतिक शैक्षणिक प्रवाहांचा योग्य अभ्यास करून खूपच सुंदर असा ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम संपूर्ण देशात, सर्व भाषांत लागू केला आहे. आणि सर्व जि.प. किंवा शासकीय यंत्रणेतील शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देऊन त्याची उचित अंमलबजावणी केली जात आहे.

परंतु आज बहुतांशी मुले खाजगी इंग्रजी शाळांत शिकत आहेत. जेथे खाजगीच अभ्यासक्रम वा पुस्तके वापरली जातात किंवा परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून केवळ पाठांतराधिष्ठीत शिक्षण दिले जाते.
फुलोरा ही अशी इंग्रजी स्कुल आहे जेथे बदलणाऱ्या जागतिक शैक्षणिक प्रवाहांचा वेध घेऊन मुलांना आंतरराष्ट्रीय पद्धतीने शिकविले जाते.
एकदा जरुर भेट द्या किंवा फोन करा. आणि आमचे Phulora nanded हे फेसबुक पेज फाॕलो करा.
फोन नं 8788792210
धन्यवाद !

Address

Malegaon Road, Nanded
Nanded

Telephone

+918788792210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Phulora nanded. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category