Kusumtai High School, Cidco, Nanded.

Kusumtai High School, Cidco, Nanded. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kusumtai High School, Cidco, Nanded., Education, Nd42 sambaji nagar, cidco, nanded, Nanded.

कुसुमताई प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड येथे आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय स्वातंत्र्य द...
15/08/2025

कुसुमताई प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड येथे आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
08/07/2025

आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

"तुमचं सहकार्य आम्हाला नेहमी आठवत राहील. सेवानिवृत्तीनंतरचा प्रत्येक क्षण आनंददायी आणि समाधानी जावो, ही मन:पूर्वक शुभेच्...
08/07/2025

"तुमचं सहकार्य आम्हाला नेहमी आठवत राहील. सेवानिवृत्तीनंतरचा प्रत्येक क्षण आनंददायी आणि समाधानी जावो, ही मन:पूर्वक शुभेच्छा!"

06/09/2023
😭 दुख:द निधन 😭माधवराव पाटील तथा शशिकलाताई  बिरादार मॅडम यांच्या मातोश्री चं हृदयविकारानं निधन... ----------------------ल...
09/10/2022

😭 दुख:द निधन 😭

माधवराव पाटील तथा शशिकलाताई बिरादार मॅडम यांच्या मातोश्री चं हृदयविकारानं निधन...
----------------------
लक्ष्मीबाई पांडुरंग जाधव, (शैल्लाळ , उदगीर) यांच दिनांक 9/10/22 रोज रविवारी रात्री 11 वाजता हृद्यविकाराने दुख:द निधन झालं. त्या मृत्यूसमयी 71 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती - पांडुरंग जाधव, मुलगा माधवराव पाटील जाधव ( सहशिक्षक, कुसुमताई हायस्कुल सिडको) तथा तीन मुली - जावाई, नातवंडे असा मोठा परीवार आहे.
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचीव मा. संभाजीराव बिरादार साहेब यांच्या त्या सासुबाई तर कुसुमताई मा. व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपमुख्याद्यापीका सौ.शशिकलाताई बिरादार मॅडम यांच्या त्या मातोश्री होत.
अंत्यविधी, त्यांच राहतं गाव शैल्लाळ ( उदगीर पासून अंदाजे 6 की. मी. ) ता. उदगीर जि. लातूर येथे दिनांक 10/10/22 रोज सोमवारी दुपारी अंदाजे 1.30 वाजता पार पडेल, असे खात्रीलायक कळाले आहे.
कुसुमताई हायस्कुल, गोदावरी पब्लिक स्कुल, शांतीनिकेतन पब्लिक स्कुल, यशवंतराव चव्हाण प्रा. शाळा, इंदिरा गांधी हायस्कुल हा सर्व शैक्षणिक परीवार जाधव कुटुंबीयांच्या दुख:त सहभागी आहे.
आई लक्ष्मीबाई यांच्या आत्म्यास शांती लाभो, तथा जाधव परीवारला, हे अपार दुख: सहन करून त्यातून बाहेर येण्याचं बळ मिळो एवढीच प्रार्थना आणि सआश्रूनी भावपुर्ण श्रद्धाजंली ...
🙏🙏🙏🙏

😭शोकाकुल😭
कुसुमताई तथा सर्व शैक्षणिक परीवार, नांदेड.

आदरणीय श्री अरविंद राठोड सर 26 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त होत आहेत. त्यांचा आम्हाला अतिशय छान सहवास लाभला. सरां...
28/02/2022

आदरणीय श्री अरविंद राठोड सर 26 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त होत आहेत. त्यांचा आम्हाला अतिशय छान सहवास लाभला. सरांचा स्वभाव सर्वांशी मनमिळाऊ, मृदूभाष्य, सदा हसतमुख चेहरा हे त्यांचे खास वैशिष्ट्य ते गणित विषयांचे गाढे आभासक म्हणून परिचत आहेत. त्यांना त्यांच्या सेवेत विविध स्तरातून अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशा आमच्या हरहुन्नरी शिक्षकांस सेवानिवृत्तीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा, सरांना भावी आयुष्य सुख शांती समाधानाचे जावो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!

सिडको- हडको भागातील covid-19 (कोरोना) या काळात स्वतःच्या जीवाची, घरातील मुलाबाळांची, घरातील वयोवृद्ध नातेवाईकांची काळजी ...
08/01/2022

सिडको- हडको भागातील covid-19 (कोरोना) या काळात स्वतःच्या जीवाची, घरातील मुलाबाळांची, घरातील वयोवृद्ध नातेवाईकांची काळजी घेत सक्षम पणे प्रशासनाचे कार्य बजावत, स्वतहाचा जीव धोक्यात घालून जीवाची परवा न करता 24 तास कार्यात मग्न राहून सेवा बजावलेल्या कर्तुत्ववान व यशस्वी महिलांचा सत्कार कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको येथे करण्यात आला. आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. असेच कार्य उद्याच्या भावी पिढीकडून घडो असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित मुख्याध्यापिका श्रीमती उषाताई कारामुंगे, तळमळीने व नियोजनपूर्वक कार्य करणारे संस्कृतिक प्रमुख श्री किशोर इप्पर सर, व सौ. श्यामसुंदरी मुंढे, इतर शिक्षक वृंद सौ. सुनंदा वाघमारे, सौ. पुष्पा निलपत्रेवार, सौ. राजेश्री भाईकट्टे, सौ. शिवनंदा गोरे, सौ. रेखा भालेराव, शाळेचे व समाजाचे समाजसेवक श्री मेरवान जाधव, श्री गणेश गव्हाणे, श्री संजय सूर्यवंशी, श्री संग्राम चव्हाण, श्री संजय आलेवाड, श्री व्यंकट गायकवाड, श्री मारुती पेंटे, श्री आनंदा हिवराळे, श्री शिवाजी बिरादार, श्री मिलिंद जाधव, श्री हनवते सर इत्यादी होते.

कुसुमताई प्राथमिक शाळेमध्ये सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली।
03/01/2022

कुसुमताई प्राथमिक शाळेमध्ये सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली।

कुसुमताई प्राथमिक शाळेचे हिंदी विषयाचे शिक्षक रायकवाडे सर यांचे दिर्घ आजाराने दुख:द निधन झाले !!भावपूर्ण श्रद्धांजली
18/05/2021

कुसुमताई प्राथमिक शाळेचे हिंदी विषयाचे शिक्षक रायकवाडे सर यांचे दिर्घ आजाराने दुख:द निधन झाले !!
भावपूर्ण श्रद्धांजली

17/01/2021

कुसुमताई विध्यालयाचे भालेराव (सर) आण्णा अनंतात विलीन...

भालेराव सर कुसुमताई विध्यालयात 1993 साली नौकरीला लागले. कुसुमताई चा हा अगदीच प्रांरभीचा खडतर काळ. ना मुले, ना शिक्षकं, ना आजच्या सारखी भव्य इमारत. होता तो कुसुमताई ला पुढे नेण्याचा ध्यास आणि कष्ट उपसण्याचा हव्यास. आरंभीच्या काळी अनेक शिक्षकांची कुसुमताई च्या अंगणात ये जा होत राहीली परुंतू भालेराव सर शेवटच्या क्षणा़पर्यंत कुसुमताई् वर प्रेम करत राहिल.
कुसुमताई ला त्याकाळी विध्यार्थी पुरवण्याचा स्त्रोत तुप्पा बनला होता. त्याचं श्रेय भालेराव सराना जाते.
भालेराव सर खरं तर दिलदार, मस्त कलंदर, धर्माचरणी, गर्दीत मिसळूनही स्वत:ची स्वभाव वैशीष्टे जपणारा आपलातून माणूस. त्यांची धर्माविषयीची जाण, माणुसकी ची पहेचान सर्वानाच सुखावणारी होती. मानलं की त्यांच अर्थशास्त्र कच्च होतं परुंतू मैत्रीचं शास्त्र निर्मळ, निरागस, निस्वार्थ होतं. "अर्था" ला निर्थक समजून कांहीजण
"मित्रसंपती" ची तिजोरी अमाप भरतात. भालेरावसरही अशाच विचारधारेतले एक वाटसरू.
माणसांची भव्यता आणि दिव्यता तो कीती संपती कमावला यावर नसून....त्यांच्या अंतयात्रेला कीती लोक जमले आणि त्यात गर्दीपेक्षा दर्दी कीती होते यावरून होते. शिवाय, याच निकशावरून तो व्यक्ति कीती पुण्यवान व धनवान होता याचा अर्थ काढला जातो. हेच जर माणसाची उंची मोजण्याचं एकक असेल तर आमचे भालेराव सर अव्वलस्थानी होते..
माणूस ज्या दिवसी जन्माला आला...त्याच दिवसी त्यांचा अंतही ठरलेला असतो. कोणीच अमरत्वाचा पट्टा गळ्यात बांधून आला नाही आणि येणारही नाही.परुंतू त्या व्यक्तीने जगात आपल्या जीवाचे कीती माणसे तयार केली, त्यांच्या पश्चात लोक त्याना "चांगल" किती जण म्हणतात हे खुपच महत्वपूर्ण ठरते. आणि भालेराव सरांची हीच मोठी कमाई आहे. सर्व स्टाफ सोबत कोटूबिंक सबंध जपणारे आण्णा आज आपल्यात नाहीत. खरं तर बेळकोणे सरानी त्याना अण्णा ही उपादी दिली. आणि तितक्याच प्रेमळ वागणूकीने गेल्या 27 वर्षाच्या सेवा कालावधीत त्यानी ती जपली आणि आपल्या कार्याने ते सिद्ध ही केले. प्रत्येकाच्या सुख-दुख:त हिरीरीने भाग घेणारा आमचा आण्णा आमच्यात नाही हे म्हणायला जीव कासावीस होतोय. आण्णा तुम्हाला कैलासवासी कसं लावाव? अजून दोन वर्षे सेवा असताना असं अवेळी रिटायर का झालात ? खरच! आमचा इतका कंटाळा आला होता का? सेवानिवृत्तीचा कार्यक्रम चांगला घेऊत म्हणाला होतात अन् अंतविधी चा कार्यक्रम घाईगडबडीत उरकुन घेतलात.
जेव्हा तुमच्या घरी येवून तुमच्यासी मनमोकळ्या गप्पा मारल्या तोच आमचा तुमच्या भेटीचा शेवटचा क्षण ठरला.
मुलीच्या लग्नात दोन्ही हात हातात घेऊन डोळ्यातील आश्रूंना मुक्तेपणे वाहू दिलात. आण्णा मुलीच्या लग्नात नवीन कपडे परिधान करुन कसं सजून बसला होतात हो. तेंव्हाच तुम्हाला डोळे भरून आपला कुसुमताईचा परीवार पाहिला अन् हृद्यात साठवला.
तुमच्या घरी जेंव्हा शेवटची भेट मी आणि जाधव सरानी घेतली. मी म्हटलं होतं, महिनाभरापासून तुम्ही शाळेत नाहीत.. मला तुम ची फोटो काढू द्या. त्यावर तुम्ही म्हणाला होतात,
शेखसर माझी फोटो मी गेल्यानंतर डीपी म्हणून ठेवता की? मी गेल्यावर शाळेत फोटो लावता की? मला आठवण करता की?
हे तीन प्रश्न माझ्या पुढ्यात टाकुन रडत, रडतच भिंतीला धरून पंलगावर स्वत: ला फेकून दिलं... मी आणि जाधवसरानी आण्णाच्या हातात हात देऊन हिम्मतीचे दोन बोलून परतलो.

भा व पू र्ण कु सु म प री वा र

- शेख निजाम गवंडगावकर

Address

Nd42 Sambaji Nagar, Cidco, Nanded
Nanded
431603

Telephone

9404062395

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kusumtai High School, Cidco, Nanded. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category