01/11/2024
Government Polytechnic College,Nanded
A famous institute A Famous Engineering Diploma Institute
01/11/2024
अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलीटेक्निक -दहावी नंतर करियरची उत्तम संधी
दहावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्थात पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी सीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग करावयाचे आहे त्यांना दहावीनंतर अकरावी बारावी सायन्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्थात पॉलिटेक्निक असे दोन पर्याय असतात. दोन्ही मार्गांनी दहावीनंतर सहा वर्षात इंजिनिअरिंग पदवी शिक्षण पूर्ण करता येते. म्हणूनच यातील कोणता योग्य पर्याय निवडावा याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम अथवा कुतूहल असते.
दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्थात पॉलिटेक्निक करण्याचे खालील फायदे विद्यार्थी व पालकांनी समजून घेतल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाईल.
इंजिनीरिंग डिप्लोमाचे (पॉलिटेक्निक) फायदे :
1) अकरावी बारावी सायन्सचा अभ्यास, सीईटी क्लासेस, भरमसाठ फी व स्पर्धा या सगळ्यातून सुटका होऊन डिप्लोमा नंतर थेट इंजीनियरिंग डिग्री च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. म्हणजे पॉलीटेक्निक प्रवेशासाठी व इंजीनियरिंग डिग्री (थेट द्वितीय वर्ष) प्रवेशासाठी कोणतीही सीईटी परीक्षा देण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसेच पॉलिटेक्निकचे शिक्षण हे तुलनेने खूपच कमी खर्चात पूर्ण करता येते आणि शासकीय तंत्रनिकेतनातून केल्यास अत्यल्प खर्चात पूर्ण करता येते त्यामुळे विशेषत: सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक शिक्षण ही एक पर्वणीच आहे असे म्हणता येईल.
2) दहावीपर्यंत संपूर्ण मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या निर्णयामुळे यावर्षीपासून प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे ही मातृभाषेतून अर्थात मराठीतून लिहिण्याची परवानगी असणार आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण मातृभाषेत असावे हे शासनाचे धोरण असल्याने ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना ज्या इंग्रजी भाषेची भीती असायची ती कमी होण्यास मदत होईल. तसेच त्यांची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी वेगळे विशेष प्रयत्न केले जातील.
इंग्रजी भाषेपासून सुटका व मातृभाषेत मराठी मध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा इंग्रजी बद्दलचा असणारा न्यूनगंडही कमी होण्यास मदत होईल
3) पॉलिटेक्निक डिप्लोमा हे व्यावसायिक शिक्षण असल्याने डिप्लोमा नंतर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसाय, स्टार्टअप च्या संधी उपलब्ध आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे, रेल्वे, संरक्षण दले, आरटीओ, महावितरण, एमआयडीसी इत्यादि शासकीय, निमशासकीय कार्यालये व उद्योगांबरोबरच खाजगी क्षेत्रातही नोकरीच्या संधी डिप्लोमा नंतर उपलब्ध आहेत. तसेच अनेक खाजगी व्यवसाय, उद्योगांची उभारणी करता येते व त्याकरिता बँकांचे, सरकारी योजनांचे आर्थिक पाठबळ मिळते. तसेच विविध शासकीय कामांची कंत्राटदार नोंदणी व तदनुषंगिक कामे प्राधान्याने दिली जातात.
4) पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर पुढील अभियांत्रिकी डिग्री शिक्षणासाठी भक्कम पाया तयार होतो व बहुतांश हेच विद्यार्थी अधिक गुणवत्तेने यश मिळवतात.
5) पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना खालील शिष्यवृत्ती योजना उत्पन्न मर्यादेच्या अधीन राहून लागू आहेत
अ) भारत सरकारची दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना (अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्यासाठी)
ब) व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता (भारत सरकार शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्यांसाठी)
क) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग)
ड) डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर यांचे करिता)
इ) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन समाजातील गुणवंत विद्यार्थी)
6) पॉलिटेक्निक डिप्लोमा शिक्षण हे साधारणतः एकोणिसाव्या वर्षी पूर्ण होत असल्याने हे विद्यार्थी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी रोजगाराभिमुख बनतात त्यामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबाकरिता निश्चितच हा आशेचा किरण ठरतो.
एकंदरीत समाज व राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीकरिता पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रम अत्यंत चांगला असून आपल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपीमध्ये वाढ होण्यास अत्यंत उपयुक्त आहे. पॉलिटेक्निक डिप्लोमा या शिक्षणानंतर बाहेर पडणारा अभियंता हा विशिष्ट क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य आत्मसात करून कृषी, उद्योग, बांधकाम व सेवा इत्यादी आघाड्यांवर यशस्वी होऊ शकतो व देशाच्या आर्थिक विकासाचा दर उंचावण्यास हातभार लावू शकतो हे नक्की.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.dtemaharastra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मोफत मार्गदर्शन, समुपदेशन व प्रवेश अर्ज भरण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, बाबनगर, नांदेड या संस्थेस भेट द्यावी.
संपर्क: प्रा. मुधोळकर 9422172891
प्रा. ए. एन. यादव 8855888905
डॉ.गोरक्ष गर्जे
प्राचार्य
शासकीय तंत्रनिकेतन नांदेड
23/07/2021
The Date for online registration to Diploma in Engineering (First year Polytechnic) after SSC is extended till 30/07/2021, grab the opportunity. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका( डिप्लोमा इन इंजिनीअरिंग) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दि. ३०/०७/२०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा!
01/07/2021
Extension building of Government Polytechnic Babanagar, Nanded
21/06/2021
*शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात राज्यस्तरीय ज्ञानवर्धिनी कार्यक्रमाचे संयोजन*
तंत्रशिक्षण क्षेत्रातील नावाजलेले व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत असलेल्या नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील शिक्षण घेतलेल्या विविध अभियांत्रिकी शाखेतील इंजिनियर्स अनेक नामांकित पदांवर कार्यरत आहेत. त्यापैकीच
असे कार्यतत्पर व कौशल्यपूर्ण इंजिनियर्स तयार करणारा विद्युत अभियांत्रिकी विभाग हा परिपूर्ण उपकरणांनी युक्त आहे. या उपकरणांची माहिती व हाताळणी राज्यातील इतर तंत्रनिकेतनातील प्राध्यापकांनाही अवगत करण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागाने पुढाकार घेऊन एका आठवड्याच्या ऑनलाईन प्रशिक्षणाची - "ज्ञानवर्धिनी कार्यक्रमाची" अभिनव योजना आखली. या प्रशिक्षणासाठी उत्सुक महाराष्ट्रातील अनेक तंत्रनिकेतनातील प्राध्यापकांनी नावनोंदणी केलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावणे व तंत्रनिकेतनातील कार्यरत असलेल्या अध्यापकांचे ज्ञान व तंत्रकौशल्य अद्यावत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणाचे उदघाटन संस्थेचे प्राचार्य डाॅ. जी. व्हि. गर्जे यांचे शुभहस्ते आज दिनांक 21 जून 2021 रोजी संपन्न झाले.
सदर प्रशिक्षणाचे प्रमुख संयोजन विभाग प्रमुख प्रा. व्हि. व्हि. सर्वज्ञ, सहसंयोजन प्रा. पी. एस. लिंगे, प्रा. ओ. एस. चव्हाण, प्रा. वाय. एस. कटके व नियोजन प्रा. पी. के. विनकरे, प्रा अब्दुल फैमीद ,प्रा.जी. एम. बरबडे सौ. ए.एस. सायर, प्रा. सौ पी. बी. खेडकर यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रा. एस. ए. कुलकर्णी, प्रा. एस एस चौधरी, प्रा. व्हि. बी. उश्केवार, उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक श्री मिराशे व श्री ढाळे तसेच कर्मचारीवर्ग श्री मध्यबैनवाड व श्री झडते यानी परिश्रम घेतले.
एस. एस. सी. नंतर अभियांत्रिकी पदविका (Diploma in Engineering) एक उत्तम पर्याय:
ज्या पालकांची पाल्ये थोड्याच दिवसात दहावीची परीक्षा पास होणार आहेत त्यांच्यासमोर आपल्या पाल्याने दहावीनंतर पुढे काय करावे हा प्रश्न निश्चितच उभा ठाकला असेल. दहावीनंतर कुठलीही प्रवेश परीक्षा न देताही आपला मुलगा/मुलगी इंजिनिअर होऊ शकते!
दहावीनंतर कुठल्याही प्रवेश परिक्षेशिवाय आपल्या पाल्याला अभियांत्रिकी पदविका म्हणजेच Diploma in Engineering या ३ वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी फक्त दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण विचारात घेतले जातात व त्याआधारे आपल्या पाल्याच्या गुणानुक्रमे आपल्याला हव्या असलेल्या तंत्रनिकेतन म्हणजेच Polytechnic मध्ये प्रवेश मिळू शकतो.
या ३ वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमानंतर अभियांत्रिकीच्या पदवीच्या म्हणजेच Degree in Engineering (B.E. or B.Tech.) द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळतो तोही कुठलीही प्रवेश परीक्षा न देता. दहावीनंतर बारावी सायन्स करून B.E/B.Tech. करण्यासाठी आणि दहावीनंतर डिप्लोमा करून B.E./B. Tech. करण्यासाठी लागणारा कालावधी सारखाच आहे, सहा वर्षांचा. परंतु दहावीनंतर बारावी सायन्स करून B.E./B.Tech. ला प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा(CET or JEE)अनिवार्य आहे. या मार्गाने B.E./B.Tech. ला मिळणारा प्रवेश हा प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार मिळतो त्यासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जात नाहीत.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागला की लगेचच सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास शासकीय तंत्रनिकेतन(Government Polytechnic) बाबानगर नांदेड येथे प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा या संस्थेच्या gpnanded.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा प्रा.मुधोळकर सर - 9422172891/ प्रा.दमकोंडवार सर - 9921522251 यांच्याशी संपर्क साधावा. या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती:
Government Polytechnic बाबानगर, नांदेड
शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर नांदेड ही १९६४ साली सुरू झालेली अतिशय जुनी व उज्वल परंपरा असलेली सरकारी संस्था आहे.
१) शासकीय तंत्रनिकेतन नांदेड ही महाराष्ट्रात नामांकित संस्था असून या संस्थेत उच्च विद्या विभूषित व अनुभवी प्राचार्य, तज्ञ व अनुभवी विभाग प्रमुख, अधिव्याख्याते, मनमिळावू कर्मचारी, अद्यावत प्रयोगशाळा व Workshop, विस्तीर्ण परिसर, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, मेस, भव्य ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, भव्य क्रीडांगण, सुसज्ज जिम इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
२) संस्थेस उज्वल निकालाची परंपरा कायम आहे.
३) या संस्थेत Civil engineering, Mechanical engineering, Electrical engineering, Production engineering, Information technology व Medical electronics ह्या शाखा उपलब्ध आहेत.
४) या संस्थेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी शासकीय कार्यालयात तसेच खाजगी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. उदा.या संस्थेतून उत्तीर्ण झालेले माननीय विलास देबडवार साहेब हे सध्या मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. पाटबंधारे विभागात सब्बीनवार साहेब व मुंदडा साहेब अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत आहेत. असे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच अनेक माजी विद्यार्थी उद्योगपती बनले आहेत.
५) संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी कंपनी व उच्च शिक्षणासाठी तज्ञ व्यक्तीद्वारे मार्गदर्शन केले जाते. संस्थेत अनेक नामांकित कंपन्या campus recruitment साठी दरवर्षी येतात त्यामुळे डिप्लोमा नंतर नोकरी करू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. तसेच संस्थेतील सर्वच शाखांचे निकाल उत्तम लागत असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळतात.
When we Engineers have completed our task all can see that the dreams and plans have materialized for the comfort and welfare of all. Happy Engineers Day.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
Baba Nagar
Nanded
431601