04/02/2022
*शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाचे कौशल्य आत्मसात केले तर उन्हाळी हंगामातही सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादनासह गुणवत्ता पूर्ण बियाणे निर्मिती सहज शक्य ....*
दि.2 फेब्रुवारी रोजी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने जारीकोट
ता.धर्माबाद येथील सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर
कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीन लागवडी कडे असणारा कल लक्षात घेता दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी करावयाच्या उपाय योजना,
माती परिक्षणावर आधारित खताचे व्यवस्थापन,सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, एकात्मिक कीड नियंत्रण व कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी यावर प्रा.वेंकट शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
तर धर्माबाद तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री.सुरेंद्र पवार यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व याचा लाभ घेण्याचे आवाहन केले, या वेळी कृषी विभागा मार्फत सुरक्षित कीटकनाशके फवारणी साठीच्या किटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी घरच्या घरी सुरक्षित किट तयार करण्याचे प्रात्यक्षिक ही शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आले.
उत्कर्ष लर्निंग सेंटर,कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण विभागाचे श्री.संतोष उलगडे यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत चालणाऱ्या विविध प्रशिक्षणाची माहिती दिली.या दरम्यान सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या प्रक्षेत्राची पाहणी केली गेली.