15/06/2023
बंसल क्लासेसची पहिल्याच वर्षी
नीट परीक्षेत यशस्वी घोडदौड
-- पलक जाजू राज्यात द्वितीय तर मराठवाड्यात प्रथम
नांदेड,दि.१४:गेल्या चाळीस वर्षांपासून भारतात कार्यरत असलेल्या व अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या बंसल क्लासेसने महाराष्ट्रात नव्याने विस्तार वाढविला असला तरी या क्लासेसने पहिल्याच वर्षी नेत्रदीपक यशाची परंपरा सुरू केली आहे. बंसल क्लासेसची कु.पलक श्रीकांत जाजू हिने नीट मध्ये ७२० पैकी तब्बल ७०५ गुण संपादन करून महाराष्ट्रात दुसरा तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बंसल क्लासेसच्या या यशस्वी घोडदौडीत अन्य शेकडो गुणवंतांनी योगदान दिले आहे.
बंसल क्लासेसने संपूर्ण देशात शैक्षणिक चळवळीत योगदान दिले आहे. या क्लासेसने महाराष्ट्रात नव्याने शाखा कार्यरत केल्या आहेत. या शाखेत दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जाते. नांदेडला आनंदनगर व बाबानगर येथे शाखा चालू झाल्यानंतर ही पहिलीच निटची परीक्षा झाली. पहिल्याच वर्षी या क्लासेसने यशाची घोडदौड सुरू केली आहे.
बंसल क्लासेसचे शेकडो विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले असून निट परीक्षेत या क्लासेसची पलक श्रीकांत जाजू हिने ७०५ गुण घेऊन राज्यात द्वितीय आणि मराठवाड्यात प्रथम आली आहे. या क्लासेसच्या शिवम श्रीमंत शेळके याने ६७०, प्रथमेश राजाराम कोटे -६४५, वेदांत शिवसांभ दासे- ६४०, अभिजित शशिकांत जाधव-६२०,निरज शिवाजी तिम्मेवार याने ६१९ गुण घेऊन यश संपादन केले आहे.
दरम्यान मराठवाड्यात प्रथम व राज्यात द्वितीय आलेल्या कु.पलक जाजू हिचा बंसल क्लासेसचे मुख्य प्रवर्तक श्री चंदूलालजी बियाणी यांनी सत्कार केला. बंसल क्लासेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ. रामेश्वर बांगड, स्टेट हेड विष्णू घुगे, बंसल क्लासेस नांदेडचे संचालक धीरज तोष्णीवाल, सहसंचालक गोपाल तापडीया, एस. आर. शिंदे, प्रवीण तोष्णीवाल, बंसल क्लासेस नांदेड शाखेचे व्यवस्थापक इंजि. प्रविण जाधव, प्रा. विश्वनाथ दासे यांनी कु. पलक व अन्य गुणवंतांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.