27/01/2024
*ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल गुंडेगांव रोड नांदेड येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*........…............. . . . . ....................नांदेड -ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सिडको गुंडगाव रोड नांदेड येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात *संस्थेचे अध्यक्ष सौ वैशाली मारकोळे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.* त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सौ.ज्योस्तना तुषार राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर. संस्थेचे अध्यक्ष सौ वैशाली मारकोळे पाटील, श्री खुशाल सिंह परदेशी, माजी प्राचार्य एस. एम.मस्के,प्राचार्य गणेश सोराळे, मुख्याध्यापिका मेघा स्वामी, आदि उपस्थित होते.* यावेळी विद्यार्थ्यांनी भारतातल्या पंजाब, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कश्मीर या राज्यातील वेशभूषेतून त्या ठिकाणच्या बोलीभाषेचे सादरीकरण केले. तसेच काही चिमुकल्यांनी राष्ट्रीय क्रांतिकारकांच्या वेशभूषेत येऊन त्यांच्या कार्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथिंच्या स्वागतासाठी विविधतेतून एकता याद्वारे प्रमुख पाहुण्यांचे चिमुकल्यांच्या हस्ते कुमकुम तिलक करून स्वागत करण्यात आले. हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले डंबेल्स ,पीटी व योगाद्वारे पिरॅमिड बनवून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यात आला. *यावेळी डॉ.सौ.ज्योस्तना तुषार राठोड यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आणि शाळेमध्ये झालेल्या
विविध कलाकृती बद्दल कौतुक व्यक्त केले. व तसेच विद्यार्थ्यांनी कुठलाही कागद हातात न ठेवता एवढ्या लहान वयाच्या मुलांनी अतिशय उत्तम प्रकारे भाषण केले निश्चितच याचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना जाते. लवकरच ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ची ओळख संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लवकरच होईल. अशी आशा व्यक्त केली. *कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन भूमिका रायबागकर व भाग्यश्री बारसे मॅडम यांनी केले.* तर *संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली मारकोळे पाटील यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचे व उपस्थित पालकांचे आभार मानले.* व तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी व चिमुकल्या विद्यार्थ्यांना 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघा स्वामी, भूमिका रायबागकर, भाग्यश्री बारसे,आशा पवार, ज्योती कोकरे,नीता उशलवार, जयश्री ढोले,मंजुषा काळे, कांचन शेटे, उज्वला कदम, रूपाली भोसले,शिवलिंग तुरेराव, अशोक मळगे, संजय कदम कदम सर, प्रताप वर्तळे, शिवशंकर जोगदंड, प्रमोद भोसले,सुनिता कोकरे, सरस्वती ठकुर. आदींनी परिश्रम घेतले.