Green Valley International School, Khairgaon, Naigaon, Nanded.

  • Home
  • India
  • Nanded
  • Green Valley International School, Khairgaon, Naigaon, Nanded.

Green Valley International School, Khairgaon, Naigaon, Nanded. The Green Valley International School is opened with an ideology to nourish and nurturer the potential of individuals to the extent of perfection.

Glimpses of 15 August 2023 Celebration
15/08/2023

Glimpses of 15 August 2023 Celebration

Admission are open for year 2023-24
25/04/2023

Admission are open for year 2023-24

24/02/2023
ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव या शाळेचा पाचवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 'ध्वनी' कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 17/02/20...
24/02/2023

ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव या शाळेचा पाचवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 'ध्वनी' कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 17/02/2023 रोजी शालेय प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री.श्रीकृष्ण कोकाटे सर हे होते.या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष मा.श्री गंगदास पटेल सर, संस्थेचे सचिव मा. श्री कुंमुदकांत पटेल,उपाध्यक्षा सौ. संगीता पटेल मिस, सदस्य राजू पटेल सर, मा. राहुल पाटील नकाते सर, मा. श्री अभिषेक शिंदे (P.I) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ. सरोज धरणे मिस यांनी केले.तर सूत्रसंचालन श्री.नवनाथ वरवटे सर यांनी केले. या कार्यक्रमाला जवळ पास 4000 ते 5000 पालक जनसमुदायांनी उपस्थिती लावली. शाळेचे सचिव मा. श्री कुमुदकांत पटेल सर यांनी शाळेच्या गत पाच वर्षातील प्रगतीचा आलेख आणि येणाऱ्या वर्षातील करावयाच्या कामाबद्दल आपल्या शैलीत उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला एक अविस्मरणीय आठवण बनविण्यासाठी सलग एक महिन्यापासून अथक मेहनत घेणारे शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अर्जून बैस सर, त्याची टीम आणि शाळेच्या चिमुकल्यानी भव्यदिव्य स्टेज वर लख्ख अशा रोषणाईत विविध themes च्या माध्यमाने आपल्या परफॉर्मन्स चे सादरीकरण केले. आणि उपस्थितांची मने जिंकली.अशा रीतीने अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. त्या वेळची क्षणचित्रे...

26 जानेवारी 2023 भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्य ध्वजारोहण कार्यक्रम ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कुल खैरगाव येथे आयोजित करण्...
26/01/2023

26 जानेवारी 2023 भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्य ध्वजारोहण कार्यक्रम ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कुल खैरगाव येथे आयोजित करण्यात आला.सकाळी ठीक 08:05 वा. संस्थेचे अध्यक्ष मा. गंगदासजी पटेल साहेब सचिव मा. कुमुदकांत पटेल सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला या प्रसंगी मा. सोमनाथ चिद्रावार सर, मा. राजेशजी पटेल सौ. जयाबेन पटेल आदी उपस्थित होते.
या निमित्य विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विविध पारितोषिकांचे ही वाटप करण्यात आले ज्यात आंतरशालेय घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांची पारितोषिके 2022-23,
विज्ञान प्रदर्शन स्पर्धा 2021-22,
प्रश्नमंजुषा स्पर्धा 2021-22
चित्रकला स्पर्धा 2021-22 अशा शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांची पारितोषिके मुलांना देण्यात आली.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होता. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरशालेय विविध क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि ...
24/01/2023

ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरशालेय विविध क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि खेळाचे प्रात्यक्षिक करतानाची क्षणचित्रे.....

*भारतीय सांस्कृतिक सण परंपरेतील धार्मिक आणि वैज्ञानिक अनन्यसाधारण महत्त्व असलेला सण म्हणजे मकर संक्रांत* या निमित्त,*ग्र...
22/01/2023

*भारतीय सांस्कृतिक सण परंपरेतील धार्मिक आणि वैज्ञानिक अनन्यसाधारण महत्त्व असलेला सण म्हणजे मकर संक्रांत* या निमित्त,
*ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव* येथे *"हळदीकुंकू"* समारंभाचे आयोजन करण्यात आले.या *कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. संगिता कुमुदकांत पटेल (संस्थापक उपाध्यक्षा: श्री उमिया माता बहु.सेवाभावी संस्था खैरगाव) या होत्या तर या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक डॉ.प्रा. कल्पना जाधव मॅडम (मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका पीपल्स कॉलेज नांदेड) या होत्या.*
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्षांचे व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक सौ. संकल्पना जाधव मॅडम यांनी *"मुलांच्या जडणघडणीतील आईचे योगदान"* याविषयी आपले विचार उपस्थित सर्व माता पालकांच्या समवेत मांडले आणि त्यांच्याशी सुसंवाद ही साधला. सौ. संगीता पाटील मॅडम यांनी उपस्थित सर्व माता पालकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर शाळेच्या प्राचार्या सौ. सरोज धरणे मॅडम यांनी या *कार्यक्रमाचा उद्देश आणि अनौपचारिक संवाद हा किती महत्त्वाचा आहे.* याविषयी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त सुरेख अशा रांगोळी काढण्यात आल्या.यानिमित्य अल्पोपहार तसेच माता पालकांना वाणाचे वाटप शाळेतील सर्व महिला शिक्षिकांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गंगा कोरे मिस यांनी केले तर कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अर्जुन बैस सर आणि त्याच्या टीमने केले अत्यंत उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळची काही क्षणचित्रे.....

आज दिनांक 12 जानेवारी 2023 गुरुवार *ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव* येथे *राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊमाता आ...
12/01/2023

आज दिनांक 12 जानेवारी 2023 गुरुवार *ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव* येथे *राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊमाता आणि ज्यांनी सबंध जगाला आपले भारतीय अध्यात्म व तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली असा एक संन्यस्त खङग स्वामी विवेकानंद यांची जयंती* शालेय परिपाठाच्या वेळेत साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.सरोज धरणे मिस तसेच शाळेतील महिला शिक्षिकांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी शाळेच्या चिमुकल्या मुला- मुलींनी माँसाहेब जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या वेषभूषेत उपस्थित राहून *माँसाहेबांचे जीवन कार्य व त्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा कशा बनल्या आणि स्वामी विवेकानंद यांनी सबंध विश्वाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख आणि अध्यात्माची रुजवणूक कशी करून दिली.* हे आपल्या भाषणातून व्यक्त केले.शाळेच्या प्राचार्य सौ सरोज धरणे मिस यांनी आपल्या *मुलांच्या बौद्धिक ज्ञानाबरोबरच एक संस्कारयुक्त शिक्षण ही काळाची गरज* याविषयी आपले मत व्यक्त केले. तर शाळेचे सचिव मा. कुमुदकांत पटेल सर यांनी *विद्यार्थ्यांत योग्य संस्काराची रुजवणूक करण्यासाठी शालेय स्तरापासूनच आपल्या या महान आदर्शांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरे करण्याचे महत्व* हे आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले. तसेच माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेतील सर्व चिमुकल्यांचे त्यांनी कौतुक ही केले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अत्यंत नियोजनपूर्ण अशा स्वरूपात परिपाठाची सांगता झाली. या वेळची कांही क्षणचित्रे....

Address

Nanded
431709

Opening Hours

Monday 9am - 3pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 9am - 3pm
Thursday 9am - 3pm
Friday 9am - 3pm
Saturday 9am - 12pm

Telephone

+919067835111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Green Valley International School, Khairgaon, Naigaon, Nanded. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Green Valley International School, Khairgaon, Naigaon, Nanded.:

Shortcuts

Share

Category