DNC College. Nagpur

DNC College. Nagpur

Share

Dhanwate National College (DNC) was founded by a faction of public-spirited citizens who recognised the need for huge prospects for University Education. D. C.

It was started at Wardha in 1935 as Wasudeo Arts College and later shifted to Nagpur in 1942. About DNC
Dhanwate National College (DNC) was founded by a faction of public-spirited citizens who recognised the need for huge prospects for University Education. It was started at Wardha in 1935 as Wasudeo Arts College and later shifted to Nagpur in 1942 renamed as National College. Shri Shivaji Educati

17/09/2020
01/09/2018

Once in a physics class, the teacher asked the students, “Why do we have brakes in a car?”

Varied answers were received:

“To stop”

“To reduce speed”

“To avoid collision” etc.,

But the best answer was,

“To enable you to drive faster”

Give it a thought.

For a moment assume you have no brakes in your car then how fast will you drive your car?

It’s because of brakes that we can dare to accelerate, dare to go fast and reach destinations we desire.


At various points in life, we find our parents, teachers, mentors & friends etc. questioning our progress, direction or decision. We consider them as irritants or consider such inquiries as “brakes” to our ongoing work.

But, remember, it’s because of such questions (periodical brakes) that you have managed to reach where you are today. Without brakes, you could have skid, lost direction or met with an unfortunate accident.



Appreciate the “brakes” in your life. Use them wisely!

Photos from DNC College. Nagpur's post 26/02/2018

धनवटे नॅशनल कॉलेज चे प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक डॉ. बबनराव तायवाडे सरांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न । रविवार, 25 फेब्रूवारी 2018

27/12/2017

भाऊसाहेबांच्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन।

Photos from DNC College. Nagpur's post 21/05/2017

भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथि पर डॉ. प्राचार्य तायवाडे सर DD News पर बात रखते हुए ।

Photos 20/05/2017

*राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त चर्चासत्र रविवारी*

नागपूर :- राजीव गांधी स्टडी सर्कल विदर्भ विभाग नागपूरच्या वतीने भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रविवार २१ मे रोजी सकाळी ११ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, कॉग्रेसनगर येथे *"राजीव गांधी: माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि भारतीय, राजकीय विकेद्रीकरणाचे निर्माते"* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उदघाटन माजी मंत्री डॉ. अनिस अहमद यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री यादवराव देवगडे हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अतुल लोंढेे, नगरसेवक प्रफुल गुळधे, नगरसेवक बंटी शेळके, गिरीष पांडव उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Photos 10/04/2017

भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांच्याविषयी थोडक्यात माहिती असलेला एक लेख..

"डॉ.पंजाबराव देशमुख यांचे : चरित्र & कार्य" -

बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांचे चरित्र आणि कार्य हिमलयापेक्षा उत्तुंग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांनी अनुभवली होती.

"चिखलात पाय आणि पायात काटा,अशाच वात् ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वाट्याला असतात" या वास्तवाचे भान असलेल्या भाऊसाहेबांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला.शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या पंजाबरावांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडील शामरावबापू असे होते.इयत्ता ३ री पर्यंतचे शिक्षण पापड या गावीच झाले.४था वर्ग नसल्याने एक वर्ष पुन्हा ३ र्याच वर्गात शिक्षण घ्यावे लागले.पुढे भाऊसाहेबांचे आजोळ सोनेगावच्या जवळच असलेल्या चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत चौथा वर्ग पूर्ण केला.

माध्यमिक शिक्षण (कारंजा) लाड येथे तर matric चे शिक्षण अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून पूर्ण केले.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून इंटरमिडीएटचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी भाऊसाहेब इंग्लंड ला गेले.तेथे त्यांनी ‘वेद वाड:मयातील धर्माचा उद्गम आणि विकास'(१९२०)मध्ये OXFORD विद्यापीठाच्या डॉक्टरेट (पी.एच.डी.)हि पदवी संपादन केली..प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांडपांडित्य संपादन करणारे भाऊसाहेब कधीच पोथीनिष्ठ नव्हते तर ते होते कृतीनिष्ट.

बहुजनांचे दु:ख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे ते Baristar होते.

"भाऊसाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य"-

महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार दोन भाऊ-त्यात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत.देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनि १९३१ मध्ये अमरावती येथे केली.यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास भारतीय शेती शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ' हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले.बहुजनांच्या शिक्षणातील अडचण हि प्रतीगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे हि मनुवादी विचारधारा नेस्तनाभूत करण्यासाठी अखंड प्रयत्न केले.शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी "जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा" हा मंत्र दिला.देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला शेतकऱ्यांसाठी ‘जागतिक कृषि प्रदर्शनाचे" आयोजन केले.तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे.ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.

शिक्षण,शेती,सहकार,अश्पृश्योद्धार,जातीभेद निर्मुलन,धर्म इ.विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले.ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ट असल्याने त्यांच्यात अज्ञान,अंधश्रद्धा,दैववाद,अवैज्ञानिकता,देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते.तसेच ब्राम्हणी वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता.खऱ्या अर्थाने भारतातील बहुजन समाज हा गुलामगिरीच्या श्रुन्कलांनी जखडलेला होता आणि १०% सेटजी,भटजी,लाद्जी हा वर्ग सरकारी वर्ग नोकऱ्या,उच्चपदे,सोयी सवलतीचा लाभ घेत होता.

जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान,दारिद्र्य,पारतंत्र्य यासाठी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले.१९२७ सालच्या मोशीच्या हिंदुसभेचा अधिवेशनाचा डॉ.पंजाबराव देशमुखांनी ताबा घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा निषेध ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, "आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवरनासारख्या सुधारनाच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत.चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन दुरुस्त झाला नाही तर तो रांजनच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही." हे भाऊसाहेबांचे उर्वरित कार्य शिवश्री.पुरुषोत्तम खेडेकर,डॉ.आ.ह.साळुंके,इतिहासाचार्य मा.म.देशमुखान्सारख्या कोट्यावधी बहुजन बांधवांनी १२ जानेवारी २००५ रोजी मातृतीर्थ सिंधखेडराजा येथे शिवधर्माचे प्रगटन करून केले आहे.आता चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन फुटल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता अशी लोकशाही या देशात अस्तित्वात येईल.

डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला.पण भाऊसाहेब डगमगले नाहीत,पुढे त्यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु.विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले.त्यांनी १९३० मध्ये अस्पृश्य पित्तर केला.तसेच हिंदू देवस्थान संपत्ती बिल १९३२ मध्ये आणले.भाऊसाहेबांनी डॉ.बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता.भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता.ते म्हणत ,"मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल."

खरोखरच आजही डॉ.भाऊसाहेबांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक,संस्थाचालक,शिक्षणतज्ञाना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.

अश्या या महामानवाच्या नावाने व त्यांच्याच कार्यप्रणालीवर चालणारी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद ही विद्यार्थी,शिक्षक व समाजहितासाठी कार्य करत असते.ज्यांना ज्यांना यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेता येईल अशा सर्वांनी सहभाग घेवून समाजऋण फेडावे...

Photos 14/02/2017

Happy Birthday Sir..

Photos from DNC College. Nagpur's post 12/01/2017

माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम.

Want your school to be the top-listed School/college in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Congress Nagar
Nagpur
440012