26/09/2025
* *जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्री सत्यसाई कॉन्व्हेंट येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश* श्री सत्यसाई कॉन्व्हेंट,नरसाळा रोड, नागपूर येथील विद्यार्थ्यांनी दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोज गुरुवार नंदनवन येथील महिला महाविद्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. यामध्ये मुलींनी अंडर 17 मधून खो-खो स्पर्धे अंतर्गत प्रथम क्रमांक पटकावला.अंडर 14 मध्ये मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच अंडर 17 मुलांनी तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या यशाबरोबरच शाळेतील क्रीडा शिक्षक राजेंद्र बिरोले सर यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.याप्रसंगी स्वर्गीय दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नरेंद्रजी ढवळे सर, संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. श्री सत्यसाई कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका माननीय स्नेहल बांगरे, स्वर्गीय दौलतराव ढवळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय डॉ. रश्मी वाटाणे, श्री सत्यसाई विद्या मंदिरचे मुख्याध्यापक माननीय निलेश सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशाकरिता अनेक शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. कॉन्व्हेंट मधील क्रीडा शिक्षक श्री. राजेंद्र बिरोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून स्पर्धेची तयारी देखील करून घेतली.