Aalap Sangeet Vidyalaya

Aalap Sangeet Vidyalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aalap Sangeet Vidyalaya, School, 1/21 new subhedar layout nagpur/24, Nagpur.

Aalap Sangeet Vidayalaya,Nagpur
Exam Affiliated with Akhil Bhartiya Gandharva Mandal
Online and Offline batches available

Address-1/21 New Subhedar Layout, Nagpur, Maharashtra, Nagpur 440024

15/07/2026

रसिकंहो नमस्कार 🙏 पावसाळा सुरु झाला की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील राग मल्हार.. राग देस.. सोबंतच आठवतो.. अतिशय लोकप्रिय मधूर... श्रीकृष्णच्या भक्तीशी जोडलेला..वृंदावनात उगम पावलेला
"राग वृंदावनी सारंग.."
आनंद.. ताजेपणा..आल्हाददायक वातावरण निर्माण करणारा हा राग,उन्हाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या सुरवातीला गायला जातो. सारंग रागावर आधारित अनेक मराठी.. हिन्दी गाणी आहेत त्या पैकी "सावन आये या ना आये.. जिया जब झूमे सावन है." माझ्या आवडीचं हे सुंदर गाणं सहजचं "आलापच्या छोट्या विद्यार्थ्यांना शिकवलं ते ऐकाल.. 🙏🌹☺️

रसिकं जनहो नमस्कार..!!🙏 "आलाप" चा मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा निमित्त "भक्ती संगीताचा कार्यक्रम" आणि राम नवमी चा "र...
27/03/2026

रसिकं जनहो नमस्कार..!!🙏
"आलाप" चा मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा निमित्त "भक्ती संगीताचा कार्यक्रम" आणि राम नवमी चा "रामगजर.जल्लोष.. रामाची आरती.. प्रसाद..कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला...
चरचरातील स्फूर्ती राम..
सुमंगलाची पहाट राम..
सुंदर सूर तेथे राम...
शब्द सुंदर तेथे राम..
सुंदर माधव मेघ:श्याम.!
अश्या सर्वांग सुंदर मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवनिमित्य तुमच्या जीवनात सुख.. शांती.. समृद्धी आणि आनंद भरून राहो.. रामनामाच्या स्मरणाने तुम्हा सगळ्यांचे आयुष्य उजळून निघो.. प्रभू श्रीराम तुम्हाला उत्तम आरोग्य.. आणि यशाचा आशीर्वाद देवो.
जय श्रीराम..!!🙏🌹☺️

मराठी नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा..!🙏🌹☺️ अत्यंत आनंदाने सांगावेसे वाटते की आलाप संगीत विद्यालय ला Kaa...
21/03/2026

मराठी नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा..!🙏🌹☺️
अत्यंत आनंदाने सांगावेसे वाटते की आलाप संगीत विद्यालय ला Kaari Art Fest 2026 मध्ये Best Music Teacher Award प्राप्त झाला आहे! 🏆
हा सन्मान मा.आदिनाथ मंगेशकर (Secretary General, VSKA, MIT-ADT University) आणि डॉ नचिकेत शलाका किरण ठाकूर (Pro Vice Chancellor) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 🙏

हा भव्य सोहळा MIT-ADT University, School of Fine Arts & Applied Arts यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

हा पुरस्कार फक्त माझा नसून माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे. तुमची मेहनत, समर्पण आणि संगीतावरील प्रेम यामुळेच हा सन्मान शक्य झाला. मनापासून धन्यवाद 🙏

आलाप संगीत विद्यालयात प्रवेश सुरू!अनुभवी शिक्षकांकडून शिका:🎤 शास्त्रीय गायन | 🎼 सुगम संगीत | 🪘 तबला🎹 हार्मोनियम | 🎸 गिटा...
18/03/2026

आलाप संगीत विद्यालयात प्रवेश सुरू!
अनुभवी शिक्षकांकडून शिका:
🎤 शास्त्रीय गायन | 🎼 सुगम संगीत | 🪘 तबला
🎹 हार्मोनियम | 🎸 गिटार | 🎧 सिंथेसायझर | 💃 कथक

📚 ऑनलाइन आणि ऑफलाइन बॅचेस उपलब्ध

📞 संपर्क: 9822576963 / 9922733253

👉 आजच प्रवेश घ्या! मर्यादित जागा!

आलाप संगीत विद्यालयात प्रवेश सुरू!अनुभवी शिक्षकांकडून शिका:शास्त्रीय गायन |  सुगम संगीत |  तबलाहार्मोनियम |  गिटार | सिं...
18/03/2026

आलाप संगीत विद्यालयात प्रवेश सुरू!
अनुभवी शिक्षकांकडून शिका:
शास्त्रीय गायन | सुगम संगीत | तबला
हार्मोनियम | गिटार | सिंथेसायझर | कथक

📚 ऑनलाइन आणि ऑफलाइन बॅचेस उपलब्ध

📞 संपर्क: 9822576963 / 9922733253

👉 आजच प्रवेश घ्या! मर्यादित जागा!

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन...महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचे स्मरण मराठीतून करायला लावणारी ही मराठी भाषा ती स...
07/03/2026

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन...
महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचे स्मरण मराठीतून करायला लावणारी ही मराठी भाषा ती संतांनी जिवंत ठेवली त्यानंतर मराठी साहित्यिकांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवली त्यापैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर साहित्यातील महान कवी.. नाटककार कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर ) यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. .. ऐतिहासिक संस्कृतिक वारसा जपणे आणि नवीन पिढीमध्ये भाषे बद्दल प्रेम निर्माण करणे हया एकमेव उद्देशाने "आलाप " मध्ये लाभले "आम्हास भाग्य बोलतो मराठी "तसेच "हे शिवसुंदर समरशालिनी" हया गीतांसोबतच मानवी जीवनातील विविध टप्प्यांवर मनात निर्माण होणारे भावतरंग सांगणाऱ्या विविध भावागीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.🌹🙏☺️

05/02/2026

सगळ्यांना नमस्कार 🙏नित्य जे जनं गायन करिती त्या वरी माझी अति प्रिती l त्यांचे घरी अखंडिती l तेथे आपण असे अवधारा ..! आपण सगळे संगीत कलेचे साधक आहोत आणि "गुरुचरित्रातील हे इतकं सुंदर वर्णन वाचलं की खरंच खूप समाधान मिळतं आणि परमेश्वराचे मनापासून आभार मानले जातात... विद्यार्थ्यांना गुरु भजन शिकवतांना मिळालेला आनंद..🙏🌹☺️

26/01/2026

रसिकहो नमस्कार 🙏 👏
"शब्द प्रत्येक आहे तुझा तूच आहेस वागेश्वरी...
सूर, लय, ताल रूपे तुझी तूच साक्षात रागेश्वरी...
शब्द सौंदर्य तू नाद माधुर्य तू..
तूच हृदयातली भावना शारदे पूर्ण कर " "असं अप्रतिम वर्णन असलेली देवी शारदा, माता सरस्वती चा प्रगट दिवस म्हणजे माघ शुद्ध पंचमी...अर्थात निसर्गाचा उत्सव... वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता म्हणजे वसंत ऋतू आणि वाणीला मधुरता देणाऱ्या तिमीराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या माता सरस्वतीचा प्रगट दिवस..या दिवशी "आलाप" च्या विद्यार्थ्यांनी गायन वादन नृत्य सादर करून शारदेच्या चरणी सेवा समर्पित केली.

Address

1/21 New Subhedar Layout Nagpur/24
Nagpur
440024

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aalap Sangeet Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aalap Sangeet Vidyalaya:

Shortcuts

Share

Category