28/04/2026
तुम्ही येत्या काही काळात तुमच्या संस्थेत कामासाठी नवीन लोक शोधत आहात का?
लर्निंग कंपॅनिअन्स मागील ७ वर्षांपासून विदर्भामध्ये चांगले मनुष्यबळ तयार व्हावे, त्यातून आपल्या प्रदेशातील संस्थांना अजून मजबुती यावी आणि एकत्रितपणे चांगली कामे उभी व्हावी हे स्वप्न घेऊन काम करत आहे.
मागील ७ वर्षात नागपूर मधील साधारण २५-३० संस्थांनी लर्निंग कंपॅनिअन्स च्या माध्यमातून hiring केलेली आहे. आणि त्यातून संस्थांना खूप चांगली मदत झाल्याचे अनुभव आहेत.
हे अनुभव आणि वेळोवेळी अजून येणाऱ्या मागण्या लक्षात घेऊन आम्ही पुढील टप्प्यावर अधिक नियोजित पद्धतीने हे काम करण्याचे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही Work Life Preparedness (WLP) नावाने नवीन फेलोशिप सुरु करत आहोत, ज्यामधून कॉलेज मधून बाहेर पडण्याच्या आधीच प्रत्यक्ष कामाचा अनुभव कॉलेज युवकांना आम्ही देत आहोत. या प्रक्रियेमधून साधारण ५०-६० युवा दरवर्षी तयार होतील.
तुम्हाला अशा प्रकारे लर्निंग कंपॅनिअन्स च्या प्रक्रियेतून निघणारे युवा hire करण्यात इंटरेस्ट असेल तर कृपया हा फॉर्म भरून आपला इंटरेस्ट कळवा. Hiring साठी ८-१५ जणांची पुढील बॅच जून २०२६ मध्ये तयार असेल.
इंटरेस्ट नोंदणी फॉर्म: https://forms.gle/ARRDUeZ7X9xXypxM6
अधिक माहितीसाठी संपर्क: निखील - 9422186406
नोंदणीची शेवटची तारीख: ३ मे २०२६