26/09/2026
𝐀𝐀𝐊𝐀𝐑 𝐆𝐀𝐍𝐄𝐒𝐇𝐎𝐓𝐒𝐀𝐕 - 𝟐𝟎𝟐𝟔 !!
आकार गणेशोत्सव - २०२६ !!!
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी.….🙏🙏
ढोलताशांचा दणदणाट... गुलालाची उधळण...भजन ..व महाप्रसाद आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष......अशा भक्तिमय वातावरणात आकार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,हिंगणा, नागपूर गणपती मंडळांची थाटात मिरवणूक निघाली. यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ग्रुप च्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा भक्ती आणि शक्तीचा महापूर ओसंडून वाहत होता. सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर जोषामध्ये गणरायाला निरोप दीला.
विसर्जन हे पर्यावरण पुरक असावे याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांनी दहा दिवसाच्या उत्सवात विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला , सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला व आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, सर्वांचे अभिनंदन. !!!
गणनायका तुझी कृपा आम्हावर अशीच राहू दे
व सुखशांती नांदू दे !
सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव...
सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासात भरपूर यश मिळावे हीच बाप्पा चरणी प्रार्थना ..........!!!
ॐ नमोजी श्रीगणेशा |
ॐ नमोजी बुध्दिप्रकाशा ||
ॐ नमोजी गुणेशा |
सिध्दिदायका तुज नमो ||
बाप्पाची कृपा सदैव आपल्यावर राहील, या विश्वासाने पुढच्या वर्षी आणखी उत्साहाने गणरायाचे स्वागत करण्यासाठी सज्ज राहू.
तूर्तास...
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या ॥
मंगल मुर्ती मोरया | पुढच्या वर्षी लवकर या ॥
🙏🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏