Deaf and Dumb Industrial Institute, North Ambazari Shankar Nagar Nagpur-10

  • Home
  • India
  • Nagpur
  • Deaf and Dumb Industrial Institute, North Ambazari Shankar Nagar Nagpur-10

Deaf and Dumb Industrial Institute, North Ambazari Shankar Nagar  Nagpur-10 Established in 1946 (Regd. No. F-567(N), It works for total Rehabilitation of Hearing Impaired Divyangas.

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था शंकरनगर नागपूर येथे  दिनांक 29/08/2026 रोजी प्रकृतिवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
02/09/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था शंकरनगर नागपूर येथे दिनांक 29/08/2026 रोजी प्रकृतिवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे दिनांक 27/08/2026 रोजी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन...
02/09/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे दिनांक 27/08/2026 रोजी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था , शंकरनगर, नागपूर येथे  जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थ...
12/08/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था , शंकरनगर, नागपूर येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, कला, इतिहास आणि सामाजिक योगदान याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविधतेचा आदर, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आले .

विद्यार्थी मेळावा व संवादमूक आणि बधिर विद्यालय, शंकरनगर, नागपूर येथे दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी “विद्यार्थी मेळावा व संवाद...
12/08/2026

विद्यार्थी मेळावा व संवाद

मूक आणि बधिर विद्यालय, शंकरनगर, नागपूर येथे दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी “विद्यार्थी मेळावा व संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी मूक आणि बधिर औद्योगिक संस्थेचे मा. सचिव श्री. मुकुंद पैठणकर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या, शैक्षणिक प्रगती तसेच भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेतले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “शिक्षण, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून विविध क्षेत्रांत प्रगती साधावी, असेही त्यांनी सांगितले.

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे पोलीस दीदी व पोलीस काका यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुर...
11/08/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे पोलीस दीदी व पोलीस काका यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुरक्षितता, शिस्त, वाहतुकीचे नियम आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक सूचना दिल्या.

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्...
11/08/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालकांचे पाय धुऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आई-वडिलांचा आदर आणि त्यांचे आशीर्वाद हेच जीवनातील खरे धन आहे.”

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे "रेनी सीझन" उपक्रम🌧️ पावसाळी ऋतूचे स्वागत उत्साहात! 🌿विद्यार्थ्यांनी ...
04/08/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथे "रेनी सीझन" उपक्रम🌧️ पावसाळी ऋतूचे स्वागत उत्साहात! 🌿विद्यार्थ्यांनी रंगीत छत्र्या, रेनकोट, कागदी होड्या, ढग, इंद्रधनुष्य यांसारख्या आकर्षक वस्तूंच्या सहाय्याने सुंदर सादरीकरण केले.शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पावसाळी वातावरणाचा आनंद लुटला.

॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथील विद्...
04/08/2026

॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥

आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकरनगर, नागपूर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने दिंडी काढून परिसर भक्तिमय केला.विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि आषाढी एकादशीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून देण्यात आले.शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भक्ती, संस्कार आणि एकात्मतेचा सुंदर संदेश दिला.

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकर नगर, नागपूर येथे विद्या, ज्ञान आणि संस्कृतीची अधिष्ठात्री देवी श्री सरस्वती मातेचे पू...
03/08/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकर नगर, नागपूर येथे विद्या, ज्ञान आणि संस्कृतीची अधिष्ठात्री देवी श्री सरस्वती मातेचे पूजन अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकर नगर, नागपूर येथे सत्र 2026–27 चा शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्या...
27/07/2026

मूक आणि बधिर औद्योगिक संस्था, शंकर नगर, नागपूर येथे सत्र 2026–27 चा शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेत नवीन शैक्षणिक वर्षाचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

Address

North Ambazari Road, Shankar Nagar
Nagpur
440010

Telephone

+919960410716

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deaf and Dumb Industrial Institute, North Ambazari Shankar Nagar Nagpur-10 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Deaf and Dumb Industrial Institute, North Ambazari Shankar Nagar Nagpur-10:

Shortcuts

Share

Category