Jamdar High School Education Society Nagpur

Jamdar High School Education Society Nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jamdar High School Education Society Nagpur, School, Reshimbagh, Nagpur.

Ganpati making competition in Jamdar high school  &jr College Nagpur
10/09/2026

Ganpati making competition in Jamdar high school &jr College Nagpur

10/09/2026

जामदार हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा

नागपूर, दि. ९ सप्टेंबर : जामदार हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रेशीमबाग येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती साकारत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला आरोग्यभारती, नागपूरचे मुर्तीकार मोहनजी झारकर, निरिजा पाटील व श्री. बडगेयांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेच्या प्राचार्य डॉ. प्राची गांगुलवार यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीचे प्रमुख श्री. सावळापूरकर तसेच सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

25/08/2026

सरस्वती मंदिर संचालित,
कै. सौ विद्यावती जोगळेकर वाचनालय , तुळशीबाग रोड रेशीमबाग तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठांतर व निबंध स्पर्धा
वर्ग 5 ते 7 साठी महालक्ष्मी अष्टक पाठांतर स्पर्धेत वर्ग 6 वी ची आलिमा अन्सारी हीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
निबंध स्पर्धेत वर्ग 5 ते 7 मधून वर्ग 6 वी ची शाहीना अन्सारी हीला तृतीय व 8 ते 10 मधून वर्ग 10 वी ची लीना बरगट हीला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

26/07/2026
10/07/2026

भारत विकास परिषदेकडून जामदार हायस्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी ₹१५,००० ची पुस्तकांची मदत

नागपूर : समाजसेवेचा व शिक्षणप्रेमाचा आदर्श जपत भारत विकास परिषद यांच्या वतीने जामदार हायस्कूल, रेशीमबाग, नागपूर येथील गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी ₹१५,००० चा धनादेश प्रदान करण्यात आला.

हा धनादेश डॉ. संध्या उलके यांच्या हस्ते शाळेच्या प्राचार्या डॉ. प्राची गांगुलवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव श्री. सेलगांवकर, तसेच भारत विकास परिषदेच्या सौ. शुभांगीताई काकडे(अध्यक्ष)सौ. उषा घुई(सचिव)श्री. मिलन काळे आणि श्री. वसंत काकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्या डॉ. प्राची गांगुलवार यांनी भारत विकास परिषदेचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी शाळेची भावी वाटचाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, आगामी शैक्षणिक नियोजन तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याच्या शाळेच्या ध्येयधोरणाविषयी उपस्थितांना माहिती दिली. समाजाभिमुख संस्थांच्या अशा सहकार्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार लागतो, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्री. सावळापूरकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

30/06/2026
30/06/2026

*जामदार हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नव्या पर्वाला प्रारंभ*
नागपूर, दि. ३० जून : जामदार हायस्कूल, रेशीमबाग, नागपूर येथे शैक्षणिक सत्र २०२६–२७ चा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प व बिस्कीट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवीच्या प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते वर्गांचे उद्घाटन करून नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. रोहित माडेवार यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे महत्त्व पटवून देत शालेय जीवनात संस्कार, शिस्त आणि चारित्र्यनिर्मिती यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव सहकार्य करण्यास तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नवीन शाळा, नवीन परिसर आणि आधुनिक इमारतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेचा परिसर आनंदाने व कुतूहलाने पाहत नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस अविस्मरणीय बनविला. यावर्षी विशेष आकर्षण ठरलेल्या आकर्षक 'सेल्फी पॉइंट'वर विद्यार्थ्यांनी आपल्या नव्या शाळेतील पहिला सेल्फी काढून प्रवेशोत्सवाचा आनंद उत्साहात साजरा केला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

याप्रसंगी सर्व शिक्षकांनी संयुक्तपणे परिपाठ सादर करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, संस्कार, मूल्यशिक्षण आणि सामाजिक जाणीवा रुजविण्याचा संदेश दिला.

अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्राची गांगुलवार यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, कारण त्या संस्कार, गुणवत्ता आणि मूल्यांचे केंद्र आहेत. जामदार हायस्कूल आज सीबीएसई शाळांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरले असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याची आम्ही पूर्ण हमी देत आहोत. विद्यार्थी आणि पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सदैव कटिबद्ध राहील."

प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप भराडे आणि संस्थेचे सचिव मा. महेश अंधारे यांचे मार्गदर्शन व सहकार्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लाभले.

उत्साह, आनंद आणि नव्या आशांनी भरलेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, जामदार हायस्कूलने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संचालन व आभार प्रदर्शन उत्सव समिती प्रमुख श्री प्रशांत सावळापूरकर यांनी केले.

29/04/2026

जामदार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान संस्कार शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न
जामदार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित विज्ञान संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम आज अत्यंत सुंदर व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शिबिरातील अनुभव आणि विज्ञानाविषयीची आपली आवड व्यक्त केली.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले माननीय डॉ. सुनील भट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञान केवळ प्रयोगशाळेत मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनातही अनुभवता येते, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
यावेळी विज्ञान भारतीच्या विविध आयामांबाबत माहिती देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी विज्ञानाशी संबंधित उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जामदार हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. दिलीप भराडे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ विषय म्हणून न पाहता जिज्ञासा, संशोधन वृत्ती आणि नवोपक्रमशील दृष्टीकोन विकसित करण्यावर भर दिला. तसेच अशा विज्ञान संस्कार शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो व भविष्यात देशाच्या प्रगतीसाठी सक्षम पिढी घडते, असे त्यांनी नमूद केले.
शिबिराच्या आयोजनामागील उद्देश व महत्त्व शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्राची गांगुलवार यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी विज्ञान भारतीच्या कोऑर्डिनेटर साठे मॅडम, संस्थेचे सचिव महेश अंधारे यांचीही उपस्थिती लाभली. तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेचे कोऑर्डिनेटर श्री. सावळापुरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. वेळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. निघोट यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Address

Reshimbagh
Nagpur
440009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jamdar High School Education Society Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category