Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur

Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur

Share

Official page of Kamla Nehru Mahavidyalaya, established in 1983.

Follow us for updates, events, achievements, and all that’s happening in and around our college community.

23/12/2025

🎶 सांस्कृतिक मंचावर कमला नेहरू महाविद्यालयाचा सूर यशस्वी! 🎶
प्रेरणा कॉलेज, नागपूर येथे आयोजित डॉ. एस. सी. गुल्हाने आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या एकल गीत स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी लोकेश कोल्हे याने उत्कृष्ट गायन सादर करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
त्याचप्रमाणे युगल गीत स्पर्धेत मोहित विश्वकर्मा आणि जागृती कंठाले या विद्यार्थ्यांनी सुरेल सादरीकरण करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली व अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी वंजारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 🌟
विद्यार्थ्यांच्या या यशातून त्यांची मेहनत, संगीतप्रेम आणि कलात्मक गुणवत्ता अधोरेखित होते.

Photos from Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur's post 21/12/2025

🎉 नागपूरच्या सांस्कृतिक व्यासपीठावर कमला नेहरू महाविद्यालयाचा डंका! 🎉
प्रेरणा कॉलेज, नागपूर येथे आयोजित “Aanandam” आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील “Rewind Reunion – Retro Family Reunion Dance Competition” या विशेष नृत्य स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
भूतकाळातील कौटुंबिक संस्कृती, रेट्रो भावविश्व आणि नृत्याच्या सुरेल लयी यांचा सुंदर संगम सादर करत विद्यार्थ्यांनी परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकली. संघाच्या सर्जनशील संकल्पनेला, शिस्तबद्ध सादरीकरणाला आणि भावनात्मक मांडणीला विशेष दाद मिळाली.
या विजयी संघात सहभागी विद्यार्थी –
स्वरूपा रानडिवे, पार्वती कोल्हे, प्रांजली लोखंडे, प्राची शिंदे, संस्कृती सेलोकर, सृष्टी वासनिक, झरिका नकटोडे, आर्यन मेश्राम, तेजस वंजारी, सुमीत सापटे, फाल्गुन चापले, परेश महाजन आणि सार्थक सावरकर – यांनी या यशात मोलाचा वाटा उचलला.
ही कामगिरी केवळ बक्षीसापुरती मर्यादित नसून, कमला नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमतेचा, संघभावनेचा आणि सांस्कृतिक वारशाच्या जपणुकीचा गौरव आहे.
🏆 संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!

Photos from Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur's post 10/12/2025

अमर सेवा मंडळाचे कमला नेहरू महाविद्यालयाने आज महाराष्ट्र विधानसभा, हिवाळी अधिवेशन नागपूरला भेट देण्याची संधी मिळाली लोकशाहीची कार्यप्रणाली, विधायक प्रणाली प्रश्नोत्तर कालावधी आणि लोकप्रतिनिधींचे प्रत्यक्ष कामकाज जवळून बघण्याचा विद्यार्थ्यांना अनुभव आला .ही भेट विद्यार्थ्यांसाठी केवळ स्टडी टूर नसून तर प्रशासन कसे चालते धोरण निर्मिती कशी होते लोकशाहीची जबाबदारी प्रत्यक्ष कसे घडून येते याचे अनमोल अनुभव होता.

Photos from Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur's post 09/12/2025

“Beauty with Social Responsibility”
कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा येथील कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी विभागाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने मात्रुशक्ती कल्याण केंद्र, हनुमान नगर, नागपूर येथील अनाथ मुलींसाठी ‘Awareness Campaign for Maintenance of Hands and Feet for the Girls of the Orphanage’ हा विशेष सामाजिक उपक्रम राबविला. या अभियानात बी. एस. सी CT तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी हात‑पायांची निगा, स्वच्छता, योग्य देखभाल तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करून सौंदर्यशास्त्रासोबतच स्वच्छतेचे मूल्य मुलींना समजावून सांगितले. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या उपक्रमात एकूण ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्तिथ होते ,विद्यार्थ्यांमध्ये या विषयाशी संबंधित सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, तसेच मात्रुशक्ती कल्याण केंद्रातील मुलींना स्वतःची निगा राखण्याबाबत उपयुक्त आणि व्यवहार्य मार्गदर्शन मिळाले.
#कमला_नेहरू_महाविद्यालय


Photos from Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur's post 09/12/2025

“Future Cosmetic Scientists in Action!”
कमला नेहरू महाविद्यालय आणि कॉस्मॅटिक विभागाच्या वतीने, सक्करदरा येथे Onesto Labs Pvt. Ltd., गुरगाव (हरियाणा) या ख्यातनाम उद्योगसंस्थेच्या तज्ज्ञांची उद्योग‑संस्था सहयोग विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कंपनीचे सहसंस्थापक व संचालक श्री. विमल भोला, आरअँडडी मॅनेजर (स्किन अँड सनकेअर) श्रीमती नीहरू शर्मा व वरिष्ठ आरअँडडी मॅनेजर (हेअर केअर) श्री. कुशाल कुमार हे मान्यवर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. १ डिसेंबर २०२५ रोजी चाणक्य हॉलमध्ये सकाळी ९.३० वाजल्यापासून झालेल्या या व्याख्यानमालेत “Cosmetic व Personal Care उद्योगातील सध्याचे, नवनवीन व उदयोन्मुख प्रवाह” या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. केतकी मिसार यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि करिअर संधी समजून घेण्याची अनमोल संधी मिळाली.
#कॉस्मेटिकवायरल #कॉस्मेटिकवायरल

Photos from Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur's post 19/10/2025

कमला नेहरू महाविद्यालयाचा अभिमान!

🎓 गौरी खंडारे आणि राज पांडे — या दोघांनी वाद-विवाद स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी करत कमला नेहरू महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले!
🗣️ नुकत्याच एम. पी. देव धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथे झालेल्या “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) — रोजगार निर्माण तथा शिक्षा क्षेत्र के लिए वरदान साबित होगा” या विषयावरील वाद-विवाद स्पर्धेत या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

🏆 यानंतर दयानंद आर्य महाविद्यालयात झालेल्या वाद-विवाद स्पर्धेतही त्यांनी पुन्हा प्रथम क्रमांक मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
👏 विद्यार्थ्यांच्या या दुहेरी यशाबद्दल
अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा आद. डॉ. श्रीमती सुहासिनी वंजारी,संस्थेचे सचिव आद. ऍड. अभिजीत वंजारी,कोषाध्यक्षा आद. डॉ. स्मिता वंजारीआणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
💫 कमला नेहरू महाविद्यालयाचे विद्यार्थी — यशाच्या शिखरावर!

Photos from Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur's post 08/10/2025

शिस्त - सेवा - नेतृत्व – IPS होण्याचा मंत्र!"
कमला नेहरू महाविद्यालयाच्या करिअर कट्टा कार्यक्रमात डीसीपी रश्मिता राव (झोन 4, नागपूर) यांनी विद्यार्थ्यांना UPSC तयारीसंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.लोकसेवा ही केवळ नोकरी नसून समाज बदलण्याची संधीयशासाठी शिस्तबद्ध जीवनशैली, सेवाभाव आणि प्रभावी नेतृत्व आवश्यकUPSC प्रवासात सातत्यपूर्ण तयारी, वेळेचे व्यवस्थापन आणि अपयशातून शिकणे महत्त्वाचेविद्यार्थ्यांशी थेट संवाद, शंका निरसन आणि करिअर टिप्सया सत्राने विद्यार्थ्यांना नागरी सेवेत यश मिळवण्यासाठी नवी उमेद दिली!

Want your school to be the top-listed School/college in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Sakkardara Square, Umred Road
Nagpur
440024