20/06/2026
महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावणारे मोहक संदीप चवले यांनी आपल्या यशामागील प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त करताना Excellent Academy of Science, वरोरा येथील शिक्षकांचे मनापासून आभार मानले.
“माझ्या या यशामागे उत्कृष्ट मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य दिशा मिळाली, हेच सर्वात मोठं कारण आहे. अकॅडमीतील शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी, समजण्यासारखी आणि संकल्पना स्पष्ट करणारी आहे. प्रत्येक विषय सखोलपणे समजावून सांगितला जातो, त्यामुळे अभ्यास अधिक आत्मविश्वासाने करता आला.
विशेषतः अभय टोंगे सरांचे मार्गदर्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. त्यांनी केवळ विषय शिकवला नाही, तर अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसे ठेवावे आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःला कसे सुधारत राहावे याचेही योग्य मार्गदर्शन केले.
नियमित टेस्ट्स, डाऊट सोल्विंग सेशन्स आणि सतत मिळणारा मोटिव्हेशन यामुळे माझी तयारी अधिक भक्कम झाली. शिक्षकांनी दिलेला आत्मविश्वास आणि योग्य दिशा यामु