Government Residential Public School Nagpur

Government Residential Public School Nagpur

Share

Government Residential Public School Nagpur

Social Justice and Special Assistant Department Nagpur

Photos from Government Residential Public School Nagpur 's post 11/03/2023

*माझी मेट्रो नागपूर*

*अविस्मरणीय मेट्रो प्रवास*

सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा वाठोडा नागपूर...

पुस्तकाच्या जगापेक्षा बाहेरील जगाची ओळख व्हावी.. बाहेरील जगाची सुंदर कलाकृती यांच्या सहवास मिळावा निसर्ग व विज्ञान यांचा संगम विद्यार्थ्यांनी ओळखावा या उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम व इतर सर्व शिक्षक वृंद यांच्या कल्पनेतून साकार झालेला प्रवास हा अप्रतिम होता, मेट्रो प्रवास च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरावी, बाहेरील जगाशी ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांनी मेट्रो प्रवास करत आनंद लुटला याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Photos from Government Residential Public School Nagpur 's post 11/03/2023

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐

सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा वाठोडा नागपूर....
येथे आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहल शंभरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षक श्री योगेन सयाम सर यांनी दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षिका विशाखा गनोरकर मॅडम यांनी विद्यार्थ्याना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनासंबंधी माहिती दिली, स्त्री शिक्षण,पहिली शिक्षिका , समाज सुधारणांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग याविषयी माहिती व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री मंगेश राठोड सर यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Photos from Government Residential Public School Nagpur 's post 09/03/2023

आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्य...
*स्त्री सन्मान* खास कार्यक्रम

नागपूर :
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सफाई कामगार मुला मुलींच्या शासकीय निवासी शाळा नागपूर. जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या सभागृहात महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहल शंभरकर मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी शाळेतील पुरुष शिक्षकांनी अनेक मनोरंजनात्मक खेळ, उपक्रम सादर केले, महिलांचे विविध पैलू या विषयावर विचार मंथन केले व शाळेतील महिला शिक्षिकांसाठी तसेच शाळेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात स्वागत सत्कार करण्यात आले, यात सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. यावेळी शाळेचे सगळे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Photos from Government Residential Public School Nagpur 's post 09/03/2023

होळी सण उत्साहात साजरा

सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा
नागपुर... तर्फे पारंपारिक होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विशेष करून होलिका दहन याचे महत्त्व, वाईट गुणांचा त्याग व चांगल्या गुणांचा कसा टिकाव करावा, नैसर्गिक रंग का महत्वाचे आहेत व पाण्याचा सदुपयोग कसे करावे हे रहस्य शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहल शंभरकर मॅडम यांनी मुलांना सांगितले..

या प्रसंगी शाळेचे वार्डन सर श्री कैलास सोमकुवर व शारीरिक शिक्षक श्री योगेश सहाय व इतर शिक्षक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते

Photos from Government Residential Public School Nagpur 's post 09/03/2023

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

नागपूर :
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सफाई कामगार मुला मुलींच्या शासकीय निवासी शाळेतर्फे नागपूर महानगर पालिका, डम्पिंग यार्ड, भांडेवाडी, नागपूर येथील महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला.
महिलांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान केला पाहिजे. आणि सफाई कामगार हा नेहमी दुर्लक्षित असलेला समाज, ज्यांच्यामुळे आपण सगळे स्वच्छ आणि सुरक्षित राहतो, पण मासिक पाळीच्या काळात विशेष लक्ष दिले पाहिजे. आणि म्हणून त्याच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत त्यांना मार्गदर्शन करून सॅनिटरी नॅपकिन, साबण, आणि मास्क चे वितरण करून त्यांच्या सुरक्षेची माहिती तसेच सफाई कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या शाळेच्या विविध योजनांबद्दल, शाळेच्या प्रवेशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल शंभरकर यांनी उपस्थित महिलांना दिली. यावेळी महानगरपालिका भांडेवाडी प्लांट चे इन्चार्ज श्री राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली NMC कर्मचारी श्री किशोर राऊत सर यांची विशेष उपस्थिती होती तसेच GRPS चे शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते...

Photos from Government Residential Public School Nagpur 's post 05/03/2023

19 फेब्रुवारी 2023
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

सफाई कामगार मुलामुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर19 फेब्रुवारी 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या प्रसंगी शिवाजी महराज यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण प्रस्तुत केले तसेच पोवाडा च्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज,अफझल खान जिजामाता यांच्या वेशभूषा करून शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सुंदर झांकी प्रस्तुत केली तसेच माहराजांच्या प्रतिमेची पालखी सजवून वाठोडा नगपुर यापरिसरत प्रभातफेरी काढण्यात आली. शिवाजी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वितरीत करण्यात आले
शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर तसेच बह्यास्त्रोत कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.सदर कार्यक्रमचे संचालन विशाखा गणोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मंगेश राठोड सर यांनी केले.
GRPSschoolnagpur






Photos from Government Residential Public School Nagpur 's post 05/03/2023

23 फेबरुवारी 2023
थोर संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

नागपूर :
सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर येथे कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली याप्रसंगी नागपूर महानगरपालिका नेहरूनगर झोनचे सॅनिटरी इन्स्पेक्टर श्री सोनू बागडे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दीपक खरे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले शाळेचा विद्यार्थी हिमांशू हांडे यांनी संत गाडगे महाराज यांची वेशभूषा करून त्यांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी अध्यक्षांनी व उपस्थित शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले तसेच शाळेच्या परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शाळेच्या शिक्षिका कु विशाखा गणोरकर यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितला. वसतिगृहाच्या अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन चेतना मेश्राम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रीती पाटील यांनी केले.







Photos from Government Residential Public School Nagpur 's post 05/03/2023

*मराठी राजभाषा दिवस व कवी कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

नागपूर
सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर येथे *मराठी राजभाषा गौरव दिन* म्हणून कवी *कुसुमाग्रज* यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर महानगरपालिका नेहरूनगर येथील कर्मचारी *शंकर मेश्राम* हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून *दीपक खरे* होते व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी मार्गदर्शन केले. शाळेचे विद्यार्थी *प्रतिक वायले* व *राखी शर्मा* यांनी मराठी माणसांच्या वेशभूषा परिधान केल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, चारोळ्या, भाषण, प्रश्नमंजुषा अशा विविध माध्यमातून मराठी भाषेविषयी आपले विचार व्यक्त केले. शाळेतील सहायक शिक्षक *विजेश आडे* यांनी स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *दिपाली बुरबुरे* व आभार प्रदर्शन *भारती नगरारे* यांनी केले.







Photos from Government Residential Public School Nagpur 's post 03/03/2023

28 Feb 2023
Government public School Nagpur celebrated National Science Day to commemorate the discovery of Raman Effect by Sir Chandrasekhara Venkata Raman.

To celebrate his achievements, the students of the school organised various activities. Mrs vaishali khobragade highlighted the path-breaking discovery of Raman Effect which lead to the winning of Nobel Prize by Prof CV Raman. Videos were shown to the students through which they came to understand the several aspects of science and technology and its growth in last few decades. The students of class 6th to10th participated in the science quiz and various models were displayed The students actively participated in the quiz. The students came to know about the contribution of indian scientist in the field of science.principal and teachers appreciated the efforts done by the students.

Want your school to be the top-listed School/college in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Wathoda Ring Road Nagpur
Nagpur