02/04/2026
सर्व नागपूरकरांना आणि रामभक्तांना हनुमान जयंतीच्या अत्यंत मंगलमय आणि मनःपूर्वक शुभेच्छा! पवनपुत्र हनुमान हे केवळ शक्तीचे नव्हे, तर निस्वार्थ सेवेचे आणि समर्पणाचे सर्वोच्च उदाहरण आहेत. प्रभू श्रीरामांचे परमभक्त असणाऱ्या मारुतीरायाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि सर्वांना उत्तम आरोग्य, सुख-शांती व यश लाभो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!
बोलो बजरंगबली की जय! सियावर रामचंद्र की जय!
21/03/2026
सभी मुस्लिम भाइयों और समस्त नागपुरवासियों को रमज़ान ईद की दिली मुबारकबाद। यह पावन पर्व आप सभी के जीवन में सुख, शांति, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आए। हमारे समाज में सर्वधर्म समभाव, आपसी सम्मान और भाईचारे की भावना यूं ही निरंतर बढ़ती रहे यही अल्लाह से दुआ है।
सभी को दिल से ईद मुबारक!
21/03/2026
जागतिक वन दिनानिमित्त निसर्गाचं महत्त्व ओळखूया आणि पर्यावरण जपण्याचा प्रयत्न करूया. झाडं ही आपल्या आयुष्याचा आधार आहेत, त्यामुळे त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. 🌱
16/03/2026
मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतापर्यंत भिडवणारी धगधगती तलवार!
सामान्य मेंढपाळ कुटुंबात जन्म घेऊन केवळ स्वतःच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या आणि युद्धनीतीच्या जोरावर सुभेदार पदापर्यंत मजल मारणारे महान योद्धे आणि होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात आणि उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण करण्यात मल्हारबांचा सिंहाचा वाटा होता. त्यांची मुत्सद्देगिरी आणि रणांगणावरील चपळता आजही आपल्या सर्वांसाठी एक मोठा आदर्श आहे. या थोर सेनापतीच्या पावन स्मृतीस आणि त्यांच्या अद्वितीय कार्याला कोटी कोटी प्रणाम!
01/01/2026
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपल्यासाठी आनंद, यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. नवीन संधी, नवा उत्साह आणि नवे संकल्प पूर्णत्वास जावोत. आपले प्रेम आणि सहकार्य असेच कायम राहो.
04/10/2025
Booth Election Cong comtt
NMC Election 2026
24/09/2025
भाऊसाहेब अभिनंदन !अभिनंदन ! अभिनंदन ! 💐
नागपूर शहर (जिल्हा) काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे लोकप्रिय आमदार मा. श्री विकास भाऊ ठाकरे यांची काॅंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने छत्तीसगढ राज्याचे एआयसीसी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नुकतीच विकास भाऊंनी उत्तराखंड राज्यातील कोटद्वार जिल्ह्याचे एआयसीसी निरीक्षक म्हणून जवाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. लगेचच त्यांना पक्ष नेतृत्वाने दुसर्यांदा संधी दिली ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब आहे. काॅंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे मा. विकास भाऊ ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन!🙏🙏🙏