09/05/2026
🌿 माणुसकीचा गोड सुगंध पुन्हा एकदा शाळेत दरवळला... 🌿
दोन महिन्यांपूर्वी आपल्या निरागस गतिमंद विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी अचानक शाळेत आलेले प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अंकुर विनायक निमकर, त्यांचे काका निमकर व सहकारी मित्र. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, शाळेची पाहणी केली आणि मनापासून आपुलकी दाखवली.
आज पुन्हा दोन महिन्यांनी ते अचानक शाळेत आले... हातात दोन मोठ्या पिशव्या घेऊन. आल्याबरोबर त्यांचा पहिला प्रश्न होता –
"हे विद्यार्थ्यांना आणलेला खाऊ देऊ का?"
त्या दोन पिशव्यांमध्ये होते तब्बल १०० ते १५० हापूस आंबे – तेही स्वतःच्या शेतातील, कोणतेही रासायनिक खत किंवा औषध न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले ऑरगॅनिक आंबे.
ते आंबे त्यांनी प्रेमाने शाळेत ठेवले आणि म्हणाले –
"पिकल्यावर लगेच मुलांना द्या..."
खरंच... आज पुन्हा जाणवलं,
बळीराजा फक्त शेतातच नाही, तर मनानेही श्रीमंत असतो. 🌾💛
विशेष म्हणजे श्री. अंकुर निमकर यांनी B.Sc. Agri शिक्षण घेतले असूनही त्यांना शेतीची अपार आवड आहे. त्यांनी असेही सांगितले की,
"शेतातील अनेक वस्तू आम्ही नेहमी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी देत राहू."
अशा दानशूर, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तीला आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
आई रेणुका देवीच्या चरणी प्रार्थना की त्यांना आयुष्यात भरभराट, सुख, समाधान आणि समृद्धी लाभो. 🙏🌺
संस्थापक : सौ. प्रतिभा कृष्णा इरकशेट्टी
अवनि मतिमंद निवासी विद्यालय व कार्यशाळा.
9920227816 9869982904