Orchestra Kalakaar

Orchestra Kalakaar

Share

A team of entertainment professionals started off with KALAKAAR back in August 1985. Over 5000 plus

17/08/2023

Contact 9323749813/900433887
DATTA KOLI MUSIC DIRECTOR KALAKAR ORCHESTRA MUMBAI

21/11/2022

सुप्रभात 👏🙏🎩, 21 नवम्बर 1938 को मशहूर अभिनेत्री-डांसर *●हेलन●* जी का जन्म *रंगून-ब्रिटिश बर्मा (ब्रम्हदेश)* में हुआ...🌹🌹🌹

मै दत्ता कोळी संगीतकार कलाकार ऑर्केस्ट्रा मुंबई उनकी *84 वी सालगिरह पर उन्हें शुभकामनाएं देता हूँ...*🌹🌹👏👏

🎆 उनका नाम *हेलन अॅने रिचर्ड्सन* उनके पिता जॉर्ज डेस्मोर *अॅग्लो इंडियन* और माता मार्लिन *ब्रम्ही* थी, उन्हें एक भाई और एक बहन थीं, दुसरे विश़्वयुध्द में जब जापान का कब्जा ब्रम्हदेश पर था उसी दरम्यान उनके पिताजी का देहान्त हुआ...😪😪😪

🎆 जब *जापान* की हुकूमत चली गई तब उनकी माँ सिर्फ कपडों के साथ बच्चों को लेकर रंगून से पैदल गांव गांव डेरा डालकर *दिब्रुगड- आसाम* आई, वहाँ गर्भपात होने से बिमार हो गई, उन्हें बच्चों के साथ ब्रिटिश फौजी ने ईलाज के लिए *कलकत्ता (कोलकाता)* भेजा, इसी चक्कर में हेलन का स्कूल जाना छूट गया, वहाँ से 1943 मे वोह सब *बम्बई इलाका (मुंबई)-ब्रिटिश इंडिया*, आये और गुजारे के लिए हेलन की माँ ने *नर्स* का काम करना शुरू कीया...👍🏾👏🌹

🎆 हेलन खुबसूरत थी और नृत्य का पद्न्यास अच्छा था इसलिए परिवार के परिचित आदमी उन्हें उस वक़्त की *मशहूर डांसर कुक्कू* के पास लेके गये, कुक्कू ने हेलन की शिफारस **डान्स मास्टर बद्रीप्रसाद** जी से की, मास्टर जी ने उसे 1951 को दो फिल्मे *●आवारा●* और *●शबीस्थान●* मे *कोरस नृत्य* के लिए पहला मोका दिया, हेलन का काम फिल्म इंडस्ट्री मे चलते रहा...💃👯‍♀️🎺🎸🎹🎷

🎇 अब हेलन फिल्मों में सफाई से नृत्य करती थी, लेकिन उसे जादा शोहरत दी *शक्ति सामंता●* की 1958 साल मे आई फिल्म *●हावड़ा ब्रिज* ने गाना था *मेरा नाम चीन चीन चू* दर्शकोंने यह हेलन के नृत्य को चोटी पर पहुंचा दिया उस वक़्त हेलन की उमर सिर्फ 19 साल थी, हर एक निर्माता अपने फिल्म मे हेलन का नृत्य चाहे *शास्त्रीय, या कॅब्रे* हो या *लोकनृत्य* हो रखते थे, 60-70 के दशक में उन्हे *गीता दत्त,आशा भोसले, लता मंगेशकर जी* ने आवाज दी...💃👯‍♀️🎺🎸

🎇 अपनी सुंदरता, बिजली जैसा नृत्य और बेहतरीन अभिनय के बलपर हेलन जीने 700 के उपर फिल्मों में अपनी यादगार अदाकारी पेश की है, *1965 मे ●गुमनाम●* और *1979 मे ●लहू के दो रंग●* फिल्म के लिए उन्हें *बेस्ट सपोर्टींग अॅक्ट्रेस* का *फिल्म फेअर अवार्ड* और सरकार की तरफ से *2009 मे पद्मश्री पुरस्कार* से नवाजा गया, ♣️ *हिंदी फिल्म इंडस्ट्री मे हेलन जैसी कामयाब "नृत्यांगना" ना पहले हुई थी, ना आगे होनेवाली है* ♣️...🏆🏆🏆🏅🏅🏅💃👏🌹

🎇 हेलन ने जवानीमे *निर्माता पी एन अरोरा* से सबंध रखे, उनके धोखाधडी से वोह उनसे अलग हुई, बाद मे हेलन ने *लेखक निर्माता ●सलीम खान●* हीरो (सलमान खान) के पिताजी से *शादी* करके अच्छा जीवन बिता रही है...🤝❤🌹👏👍🏾

🎇 उनका यह गाना सुनते है निर्माता निर्देशक *शक्ति सामंता* जी कीं 1958 की सुपर डुपर म्यूजिकल हिट फिल्म *●हावङा ब्रिज●*...🎞🎬📽
संगीत *●ओ पी नय्यर●* जी...🎹🎺🎸🎷
शायर *●कम़र जलालाबादी●* जी ...✍️✍️✍️
गायक *●गीता दत्त●* जी...🎙🎙🎙📢📢📢🌹👏

14/11/2022

*$आठवणी संगम सिनेमाच्या$*
संगम सिनेमा प्रदर्शित झाल्याला ५७ वर्षे झाली.हिंदी सिनेमातल्या माईलस्टोन समजल्या गेलेल्या संगम च्या आठवणी आज मांडतो आहे.
जिस देश मे गंगा बहती है ला मिळालेल्या यशामुळे राजकपूर सकट सगळी आर.के.फिल्मस ची टीम उत्साहीत झाली.आर.के.काॅटेज मध्ये रोज विचार मंथन सुरु झाले.चार्ली चॅप्लिन च्या लाईमलाईट सिनेमावर आधारलेली एक पटकथा के.ए.अब्बास यांनी लिहीली होती या कथेवरच नंतर मेरा नाम जोकर ची निर्मिती झाली.यावर सिनेमा करायचा हा विचार १९५४ सालापासून राजकपूर करत होते.पण काही कारणाने हा विचार मागे पडला होता. डोक्यात होता.या कथेवर सिनेमा निर्माण करावा असे राजकपूर ना वाटले.कथेचे वाचन आर.के.काॅटेज मध्ये झाले.साल होते १९६१.याच कालखंडात लेखक इंदर राज आनंद राजकपूरना भेटले.त्यांच्या कडे पटकथा होती जी साने गुरुजी यांच्या तीन मुले या कथेवर आधारलेली होती.कथेचे नाव होते घरोंदा.ही कथा बरसात च्या वेळी राजकपूरनी वाचलेली होती.त्याच वेळी राजकपूरनी ठरवले होते की यावर सिनेमा करायचा.याचे पोस्टर तयार केले होते.हे पोस्टर आवारा सिनेमात पहायला मिळते.इंदर राज आनंद यांची पटकथा वाचल्यावर राजकपूर नी ठरवले आधी या सिनेमाची निर्मिती करु.साहजिकच मेरा नाम जोकर चा विषय मागे पडला.घरोंदाच्या निर्मितीची जुळवाजुळव सुरु झाली.सहनायकाच्या भुमिकेसाठी दिलिपकुमार ना विचारले.पण त्यांनी नकार दिला.मग त्या भुमिकेसाठी राजेंद्रकुमार ला निवडले.नायिकेच्या भुमिकेसाठी संबंध बिघडलेले असतानाही एका मध्यस्तां मार्फत नर्गिस ला विचारले.तिने नकार दिला.पद्मिनी ने घरच्या अडचणी ने नकार दिला.मग वैजयंतीमाला चा विचार सुरु झाला.तिने ही आधी खूप आढेवेढे घेतले.ललिता पवार,अचला सचदेव,कर्नल कपूर,इप्तेखार यांची निवड झाली.मधल्या काळात घरोंदा ची काही रीळे शूट केली.याच सुमारास जंगली सिनेमा रिलीज झाला.या रंगीत सिनेमाला मिळालेले यश पाहिल्यावर राजकपूरनी ठरवले आता रंगीत सिनेमा निर्माण करायचा.घरोंदा ची शूट झालेली रिळे स्क्रॅप केली.कोडॅक फिल्म कंपनी भारतात आपला कारखाना सुरु करायच्या विचारात होती.मुंबईला वरळी ला एक मोठी बिल्डींग कोडॅक ने बांधली.इथल्या सिने फोटोग्राफर्स ना टेक्नीकलर फोटोग्राफी चे प्रशिक्षण देण्यासाठी लंडन ला बोलावले.यात राजकपूर चे कॅमेरामन राघू कर्माकार,तसेच नामवंत कॅमेरामन द्वारका दिवेचा(शोले चे कॅमेरामन) यांचा समावेश होता.ट्रेनिंग घेऊन आल्यावर तिथे शूट केलेली टेक्नीकलर फिल्म पाहिल्यावर राजकपूरनी ठरवले टेक्नीकलर प्रिंटस काढायच्या.या साठी परकी चलनाची गरज होती.भारत सरकारकडे राजकपूर नी ३८ हजार रुपयाच्या परकी चलनाची मागणी केली.पण फक्त ८ हजार रुपयेच मंजूर झाले.ही गोष्ट रशियन वकालतीला समजल्यावर त्यांनी टेक्नीकलर प्रिंटस चा खर्च रशियन सरकार करेल असे आश्वासन राजकपूर ना दिले. सिने निर्मिती ची कामे सुरु झाली.शैलेंद्रने लिहीलेल्या बोल राघा बोल गाण्यावरुन राजकपूरनी घरोंदा चे नाव बदलून संगम ठेवले.वैजयंतीमाले कडून बरेच दिवस होकार मिळत नव्हता.राजकपूर नी तिला मद्रास ला तार करुन विचारले बोल राधा बोल संगम होगा के नही.वैजयंतीमाला ने तार करुन उत्तर दिले होगा होगा होगा.
आऊट डोअर शूटींग साठी राजकपूरनी पुणे निवडले.हवाई दलाच्या लोहगाव विमानतळ वर शूटींग करायची परवानगी आणि हवाई दलाचे काही स्टाॅक शाॅटस वापरायची परवानगी भारत सरकार ने दिली होती.तसेच पुणे स्टेशनवर काही सीन्स शूट झाले.बंड गार्डन परीसरात तसेच कॅम्प भागातही काही सीन्स शूट केले गेले.बोल राधा बोल हे गाणे लोणावळा परिसरात मळवली येथे असलेल्या एका तळ्यांत केले गेले.
शैलेंद्र,हसरत,शंकर जयकिशन या चौकटीने अतिशय बहारदार श्रवणीय गाणी संगम साठी तयार केली.राधा नावाच्या हिंदु प्रेयसीला उद्देशून हसरत नी ४० च्या दशकात लिहीलेले एक प्रेमगीत ( ये मेरा प्रेमपत्र पढकर) संगम मध्ये वापरले गेले.निर्माता/दिग्दर्शक किकूभाई देसाई च्या मुलीच्या लग्नात ऐकलेले एक लोकगीत राजकपूरना आवडले होते.हसरतकडून त्या गीतात सुधार करुन वापरले.हे गाणे होते मै क्या करु राम मुझे बुढ्ढा मिल गया.शंकर जयकिशननी त्याला बॅगपाईप इफेक्ट देऊन धुंद गाणे तयार केले.(या गाण्यात आणि बोल राधा बोल गाण्यात बॅगपाईप चा इफेक्ट तोटा नावाच्या वाद्यावर काढलेला आहे).
भारत चीन युध्दात चीन ने केलेल्या दगाबाजी च्या पार्श्वभुमीवर शैलेंद्र ला सुचले दोस्त दोस्त ना रहा.मुळातले पाच अंतरे असलेले हे गाणे रेकाॅर्ड करताना तीन अंतरेच वापरले आणि प्रत्यक्ष सिनेमात दोनच अंतरे वापरले.( एल.पी. रेकाॅर्ड वर तिसरा अंतरा ऐकायला मिळतो ) या गाण्यात पियानो वाजवला होता राॅबर्ट कोरीया ने.महेंद्रकपूर चा आवाज हरदिल जो प्यार करेगा गाण्यात मुकेश आणि लता यांच्याबरोबर वापरला होता.संगीतकार जयकिशन चे आवडते हाॅटेल चर्चगेट स्टेशनसमोर चे गेलाॅर्ड .तिथे एक पाॅप सिंगर होता विवीयन लोबो.तो नेहमी जयकिशनला सिनेमात गायची संधी द्यावी म्हणून विनंती करायचा.त्याचा आवाज राजकपूरना पसंत पडला. इश लब दिश आय लव यू हे पाॅप गाणे त्याच्या आवाजात रेकाॅर्ड केले.शंकर जयकिशन च्या संगीतात नेहमी पार्श्वसंगीत जयकिशन तयार करायचे.पण संगम च्या वेळी जयकिशन आजारी असल्याने सगळे पार्श्वसंगीत शंकर जीं नीं फक्त चार दिवसात केल्याचा उल्लेख राजकपूरचे प्रसिध्दी अधिकारी वसंत साठे यांच्या पुस्तकात आहे.
संगम ची निर्मिती सुरु झाली तेव्हा हा सिनेमा चार तासांचा करायचा राजकपूर यांचा विचार अजिबात नव्हता.वैजयंतीमाला ला कार्लेव्ही वॅली येथल्या आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवाला जायचे होते.शूटींग थांबले.राजेंद्रकुमार,शंकर जयकिशन पण युरोप दौर्‍यावर निघून गेले.त्यावेळी मेकअपमन सरोश मोदी नी राजकपूरना सुचवले तुम्ही पण युरोप दौर्‍यावर जा.राजकपूरना ही संकल्पना आवडली आणि युरोप मध्ये आऊट डोअर शूटींग करायचे त्यांनी ठरवले आणि दोन मध्यंतराचा संगम तयार झाला.
राजकपूर स्वतः उत्कृष्ट संकलक होते.पण तरीही ते संकलन जी.जी.मयेकर यांच्याकडूनच करुन घेत.जिस देश मे गंगा बहती है च्या वेळी मयेकर आजारी असल्याने राजकपूरनी संकलन करुनही एडिटर गिल्ड ने मान्यता न दिल्यामुळे टायटल्स मध्ये याचे श्रेय मयेकरांना दिले होते.ही गोष्ट रशियन लोकांना माहिती होती.त्यांनी आग्रह धरला की संगम च्या टायटल्स मध्ये आधी राजकपूर यांचे नाव संकलक म्हणून आणि सह संकलक म्हणून मयेकर यांचे नाव टाका.मयेकरांना अपमान वाटला आणि ते आर.के.फिल्मस मधून बाहेर पडले.जवळ जवळ पंधरा दिवस रोज त्यांच्या घरी जाऊन राजकपूर त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करत होते.पण ते ऐकेनात.शेवटी राजकपूर नी स्वतः संकलन केले.एडिटर गिल्ड ने मान्यता दिल्यामुळे राजकपूर यांचे नाव संकलक म्हणून द्यायला सुरुवात झाली संगम पासूनच.
राजकपूर ना सफेद साडीतली नर्गिस नेहमी आवडायची.संगम मध्ये पण वैजयंतीमाला सफेद साडीत दाखवली आहे.राजकपूर यांच्या व्यक्तिगत जीवनातले अनेक प्रसंग त्यांच्या सिनेमात डोकावतात.यातला वैजयंतीमाला चिठ्ठी फाडते हा प्रसंग प्रत्यक्षात घडला होता.आधीच्या काळात नर्गिस च्या आयुष्यात आलेल्या कॅप्टन अंसारी ने नर्गिस ला पाठवलेली चिठ्ठी राजकपूरना सापडल्यावर नर्गिस ने ती फाडून टाकली होती.हा प्रसंग जशाचा तसा राजकपूरनी दाखवला होता.
संगम चा वर्ल्ड प्रिमीयर रशियात ताश्कंद च्या स्टेडियम थिएटर मध्ये झाला.शून्याखाली गेलेल्या तपमानातसुध्दा प्रेक्षकांची अफाट गर्दी जमली होती.हर दिल जो प्यार करेगा गाणे संपल्यावर अभिनयाचे दर्शन घडवत राजकपूर एक धून अकाॅर्डियनवर वाजवतात.आर.के.फिल्म ची ही सिग्नेचर ट्यून रुमानियन बंडखोर संगीतकार इवानिच यानी तयार केलेली होती.हा संगीतकार रशियन राज्यक्रांतीत मारला गेला.ही धुन ऐकताक्षणी रशियन लोक इतके बेभान झाले की या गाण्याचे रीळ दहा वेळा परत दाखवावे लागले.
मुंबईत नुतनीकरण केलेल्या अप्सरा सिनेमा गृहात(आधीचा लॅमिंग्टन सिनेमा) संगम चा प्रिमीयर शो सकाळी दहा वाजता झाला.यानंतर पत्रकारांना दिलेल्या मेजवानीत राजकपूरनी महाराष्ट्रीयन पध्दतीचे श्रीखंड पुरी चे जेवण दिल्याची आठवण बुजुर्ग पत्रकार सांगत.अप्रतिम संगीत,सुरेख दिग्दर्शन आणि संकलन ,अप्रतिम छायाचित्रण यामुळे संगम देशात आणि विदेशात तुफान लोकप्रिय झाला.त्या वर्षी पहिल्यांदा सिनेसृष्टीवर आयकर विभागाचे छापे पडले.राजकपूर यांच्याकडे बेहिशोबी ४० लाख रुपये सापडले.(१९६४ साली).पण त्या वर्षी भारतातल्या दहा करोडपतींची यादी जाहीर झाली.त्यात राजकपूर यांचा नंबर सहावा होता इतके अफाट उत्पन्न संगम ने दिले.त्याच वर्षी त्यांनी पुण्याजवळ लोणी काळभोर येथे ११० एकर जमीन विकत घेतली आणि तिथे आपले फार्म हाऊस राजबाग उभारले.
भारत आणि इराण यांच्या राजनैतिक संबंधांची सुरुवात संगम च्या इराणी भाषेतल्या प्रिमीयर शो ने झाली.संगम चे संगीत अप्रतिम असुनही फिल्मफेअर च्या घाणेरड्या राजकारणाने संगम ला सर्वोत्तम संगीताचा पुरस्कार डावलला गेला. या सिनेमाशी संबंधीत कोणीच या जगात नाही.स्टुडिओ पण इतिहासजमा झाला.पण डिजीटल स्वरुपात हा सिनेमा जतन केला आहे.टिव्हीच्या चॅनेलवरुन दाखवला जातो आणि नविन पिढी पण तितकाच आनंद लुटते जितका आमच्या पिढीने लुटला होता.
👌👌👌👌👌👌

23/09/2022

सुप्रभात 👏🙏🎩, २३ सप्टेंबर १९४३ रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री *तनुजा* चा जन्म *(चेंबूर-मुंबई) बॉम्बे इलाका-ब्रिटिश इंडिया* मधे झाला...🌹🌹

मी दत्ता कोळी संगीतकार कलाकार ऑर्केस्ट्रा मुंबई त्यांना त्यांच्या *७९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो...*🎂🌹👏

🎇 २३ सप्टेंबर १९४३ रोजी *(चेबूर-मुंबई) बॉम्बे इलाका-ब्रिटिश इंडिया* मधे तनुजाचा जन्म *मराठी सीकेपी कुटुंबात झाला*, तीचे वडील *कुमारसेन समर्थ* चित्रपट निर्माते व आई *शोभना समर्थ* दिग्गज अभिनेत्री होत्या, सुप्रसिद्ध *अभिनेत्री नूतन* ची ती लहान बहिण, आजी *रतनबाई* आणि आत्या *नलिनी जयवंत* याही सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री होत्या, अभिनयाचा वारसा तनुजाला रक्तातूनच मिळाला, हाच वारसा तिची मुलगी *काजोल* ने समर्थपणे पुढे नेला, तनुजा लहान आसतानाच तनुजाचे आईवडील विभक्त झाले...🎞💔

🎇 नूतन आणि तनुजा या दोघींना आई शोभना समर्थ यांनी आपल्या चित्रपटातून पदार्पणाची संधी दिली, *१९५०* साली *तनुजाच्या* चित्रपट कारकीर्दीची सुरूवात झाली, *●हमारी बेटी●*' या चित्रपटात तनुजा *बाल कलाकार* म्हणून चमकली, मोठी बहिण *नूतन* या चित्रपटाची *नायिका* होती, *शोभना समर्थ* या चित्रपटाच्या *निर्मात्या - दिग्दर्शक* होत्या, *नूतन* आणि *तनुजा* या आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी या चित्रपटातून रसिकांपुढे आणले, तनुजा *स्वित्झर्ल॓ड* हून शिक्षण पुर्ण करून आल्यावर १९६० च्या *●छबिली●* या चित्रपटापासून तिची चित्रपट कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली, या चित्रपटातही नायिका *नूतन* होती व संगीतकार होते *स्नेहल भाटकर* १९६१ च्या *केदार शर्मा* यांच्या *●हमारी याद आयेगी●* या चित्रपटातून *तनुजा* सर्वप्रथम नायिकेच्या भूमिकेत रसिकांसमोर आली, *राज कपूर , मधुबाला, गीता बाली* आणि *तनुजा* यांना घडवण्यात *केदार शर्मा* यांचा मोठा वाटा होता...🎞🎬📽💃

🎇 हिंदी फिल्म इंडस्ट्री हा तसा दिखाऊ मामला आहे, पन्नास, साठ , सत्तरच्या दशकात आघाडीच्या नायिका लोकांसमोर आपली सोज्वळ प्रतिमा उभी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत, त्या काळात *तनुजा बिनधास्त अभिनेत्री* होती, ती सेटवर बिनधास्त सिगरेट ओढायची, व्हिस्की तिला आवडायची आणि हे सगळं बिनधास्त, लोकां पासून काहीही न लपवता !!! *●ज्वेल थीफ●* सिनेमातील *रात अकेली है* हे गाणं तिच्या बिंधास्त इमेजला शोभून दिसलं आणि गाजलंही...🎞📽💃

🎇 १९६६ च्या *●बहारे फिर भी आयेगी●* या चित्रपटातून तिच्यातल्या अभिनय क्षमतेची चुणुक प्रेक्षकांना दिसली, तिच्या व्यक्तीमत्वाशी विसंगत अशी ही भूमिका होती, पण ही भूमिका प्रेक्षकां च्या पसंतीस उतरली, *इथून पुढे तिला चित्रपटात प्रमुख भूमिका मिळायला लागल्या*, १९६६ *देव आनंद* च्या *●ज्वेल थीफ●* या चित्रपटात तिला सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली, *वैजयंतीमाला* या चित्रपटाची नायिका होती , पण आपल्या बिनधास्त इमेजमुळे तनुजा ह्या चित्रपटात भाव खाऊन गेली . तिच्यावर चित्रित झालेले *रात अकेली है* हे या चित्रपटातील गाणे खूपच लोकप्रिय झाले होते, त्यानंतर तिला मिळालेला मोठा चित्रपट म्हणजे १९६९ सालचा *●जीने की राह●* यात *जितेंद्र* नायक होता, हा चित्रपट सुपर हीट ठरला, त्याच वर्षीच्या *●पैसा या प्यार●* या चित्रपटासाठी तनुजाला *बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा "फिल्म फेअर पुरस्कार" मिळाला*, १९७१ *चिन्नाप्पा देवर सॅण्डो-मद्रास* यांचा *●हाथी मेरे साथी●* हा चित्रपट *सुपर डूपर हिट* झाला, *सुपरस्टार "राजेश खन्ना"* या चित्रपटाचा नायक होता, आजपर्यंतचे चित्रपट उत्पन्नाचे सर्व विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले होते, या यशा नंतर *●दूर का राही, मेरे जीवनसाथी, दो चोर, एक बार मुस्कुरा दो, कामचोर, याराना, खुद्दार, मासूम●* वगैरे, हे तिचे अन्य काही गाजलेले चित्रपट *●पवित्र पापी, भूत बंगला, अनुभव●* हे चित्रपटही रसिकांना आवडलेले चित्रपट, १९७१ चा *संजीवकुमार* बरोबरचा *●अनुभव●* हा हृदयस्पर्शी चित्रपट दोघांच्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांना आवडला होता, हिंदी चित्रपटात *धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेंद्र* बरोबर तिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती *लग्नाची बेडी* ह्या *आचार्य अत्रे* लिखित नाटकातील *नटखट रश्मीची भूमिका तनुजाने काही प्रयोगात केली* होती *●झाकोळ, उनाड मैना●* आणि अलीकडचा २०१३ सालचा *●पितृऋण●* हे तिचे गाजलेले *मराठी* चित्रपट, *●पितृऋण●* ' ह्या चित्रपटासाठी कथेची गरज म्हणून तिने *केशवपन केले होते*, ह्या चित्रपटानंतर तनुजा मोठ्या पडद्यावर फारशी दिसली नाही...🎞📽💃🎖🏆🎭

🎇१९७३ साली *तनुजाचा विवाह शोमू मुखर्जी यांच्याशी झाला,* १९७२ च्या *●एक बार मुस्कुरा दो●* च्या सेटवर तनुजा आणि शोमू मुखर्जी यांची प्रेमकहाणी फुलली, *काजोल* आणि *तनिषा* ह्या त्यांच्या दोन मुली, *काजोल* ने चित्रपट सृष्टीत चांगले यश प्राप्त केले, तिचा *विवाह अजय देवगण बरोबर झाला,* वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने *शोमू मुखर्जींचे निधन झाले*...❤🌹👏

🎇 १९६० च्या दशकात तनुजाने *बंगाली चित्रपटसृष्टी* ही गाजवली होती, १९६३ *●देया नेया●* १९६७ *●अँथोनी फिरंगी●* १९६९ *●तीन भुवनेर पारे, प्रथम कदम फूल●* १९७० *●राजकुमारी●* हे तिचे गाजलेले *बंगाली चित्रपट* या पडाद्यावर *उत्तमकुमार* व *सौमित्र चटर्जी* बरोबर तिची जोडी प्रेक्षकांना आवडली, अशा या गुणी अभिनेत्रीला *पुन्हा वाढदिवसाच्या शुभकामना ! जीवेत् शरदः शतम् !!...*🌹🌹👏👏

🎇 त्यांनी साकारलेली अदाकारी पाहुया, १९६७ *देव आनंद निर्मित* हिट चित्रपट *●ज्वेल थिप●*...🎞🎬📽
संगीत *●एस डी बर्मन●*...🎼🎹🎻🎺
शायर *●मजरूह सुल्तानपुरी●*...✍️✍️✍️
गायिका *●आशा भोसले●*...🎙🎙🎙📢📢📢🌹👏

29/08/2022

सुप्रभात 👏🎩, २९ ऑगस्ट २००८ अभिनेत्री **जयश्री गडकर(धुरी)** यांचे मुंबईत निधन झाले 😪😪😪

मी दत्ता कोळी संगीतकार कलाकार ऑर्केस्ट्रा मुंबई त्यांच्या *१४ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो...* 😪🌹👏

🎆 त्यांचा जन्म २१ मार्च १९४० साली *कारवार, कणसगिरी गांव -ब्रिटिश बॉम्बे (मुंबई) ईलाखा* इथे एका मध्यमवर्गीय *कोकणी* कुठुंबात झाला, त्या कुठुंबियां सोबत १९४६ साली *गिरगाव-मुंबई* येथे रहायला आल्या, व तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्यानंतर गिरगावातील *राममोहन हायस्कुल* मधून त्यांनी शालान्त परीक्षा दिली, शिक्षणाची आवड असूनदेखील त्यांना फार शिक्षण घेता आले नाही. लहानपणापासून मात्र त्यांना गाण्याची आवड होती. त्या मास्टर नवरंग त्यांच्याकडे गाणे शिकल्या. त्याना लहानपणा पासून नृत्याची आवड होती 💃, सिनेमा सृष्टीत त्यांना प्रथम सुसंधी *चित्रपति व्ही. शांताराम* यांनी आपल्या १९५५ सालच्या *●झनक झनक पायल बाजे●* या चित्रपटात *समुह नृत्यात* दिली...🏭🚛📖💃🎞🎥

🎇 भारत भेटीवर आलेले *रशिया चे अध्यक्ष "निकीता क्रुश्चेव"* यांच्या *पुण्यातील स्वागत समारंभात* जयश्रींनी *१) घनःश्याम सुंदरा व २) लटपट लटपट* या गाण्यांवर नृत्य सादर केले, तेथे हजर असलेले फोटोग्राफर *बाळ देसाई* यांनी त्यांचे फोटो काढुन आपल्या स्टुडिओत लावले, ते फोटो पाहुन दिग्दर्शक *दिनकर पाटील* यांनी त्यांना १९५६ साली *●दिसत तस नसत●* या चित्रपटात *राजा गोसावी* यांच्या बरोबर नृत्य करण्याची संधी दिली...💃🎞🎥

🎇 त्यांचे *अप्रतिम सौंदर्य व अप्रतिम पदन्यास* पाहुन *भालजी पेंढारकर* यांनी आपल्या *●गाठ पडली ठकाठका●* या चित्रपटात *"मुख्य भुमिका" दिली व तो चित्रपट खुप चालला* व त्यांची "घोडदौड" *सहज सुंदर अभिनयाने* सुरू झाली...💃🎞🎬🎥🏇🏇🏇

🎇 १९५९ साल *●सांगते ऐका●* या त्यांच्या चित्रपटाने कहर केला, हा चित्रपट *पुण्यातील विजयानंद चित्रपटगृहात सलगपणे १३२ आठवडे चालला,* ५० ते ८० या दशकात* त्यांनी *राजा गोसावी, सूर्यकांत व अरूण सरनाईक* यांच्या सोबत *तमाशा प्रधान व सोज्वल सामाजिक* यशस्वी चित्रपट केले...💃🎞🎥

🎇 आपल्या *५० वर्षाच्या रूपेरी जीवनात* त्यांनी *२५० च्या वर "मराठी, हिंदी, गुजराथी, पंजाबी व एका तामिळ" चित्रपटात* व *रामानंद सागर* यांच्या *रामायण* मालिकेत काम केले...💃🎞🎥📺

🎇 त्यांच्या *वैजंता, मानिनी, साधी माणस व सवाल माझा ऐका* या चित्रपटाना *राष्ट्रीय पुरस्कार मिळाले*...🏆🏆🏆🎖🎖🎖🌹🌹🌹👏👏👏

🎇 त्यांचे हे अप्रतिम गाणे ऐकूया, १९६१ निर्माता *एल व्ही प्रसाद-मद्रास* व दिग्दर्शक *टी प्रकाश राव* यांचा म्युझिकल सुपरहिट चित्रपट *●ससुराल●*...🎞🎬🎥
संगीत *●शंकर जयकिशन●*...🎼🎹🎻🎺
कवी *●शैलेंद्र●*...✍️✍️✍️
गायिका *●लता मंगेशकर●*...🎙🎙🎙📢📢📢🌹👏

24/08/2022

सुप्रभात 👏🙏🎩, 24 आगस्त 2000 को मशहूर संगीतकार *कल्याणजी विरजी शहा* जी का देहान्त मुंबई में हुआ...😪😪

मै दत्ता कोळी संगीतकार कलाकार ऑर्केस्ट्रा मुंबई उनकी *22 वी पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हू ...* 😪🌹👏

🎇 30 जून 1928 को *कच्छ - (बंम्बई इलाका ब्रिटिश इंडिया)* में जन्मे कल्याणजी, *पिताजी और परिवार* के साथ मुंबई के *गिरगाव* इलाके मे आ बसे और वहाँ उनके पिताजी *किराणा दुकान* चलाने लगे, उनके घर मे *बाप दादाओं के जमाने से लोक संगीत का माहोल था* इसलिए वोह बचपन से ही हार्मोनियम बजाते थे और पढाई से संगीत मे जादा रूचि लेते थें...🏭🛣🎼🎻

🎇 जवानी में *भारत में पहली ऑर्केस्ट्रा पार्टी कल्याणजी ने बनाई और कार्यक्रम करना शुरू कीया था,* वह *इलेक्ट्रानिक "क्ले व्हायोलिन"* अच्छा बजाते थे, फिल्म इंडस्ट्री मे अलग-अलग संगीतकारों के साथ म्युजिशियन का काम करते करते वोह मशहूर संगीतकार *हेमंत कुमार* जी के असिस्टेंट बने, फिल्म *●नागिन●* की *"बिन" की धुन* क्ले व्हायोलिन पर बजाके कल्याणजी मशहूर हुये, काम बढते गया...🎼🎻🎞🎹

🎇 कल्याणजी को 1958 मे स्वतंत्र संगीत देने का मौका निर्माता निर्देशक *बाबुभाई मिस्त्री* जी ने दिया फिल्म *●सम्राट चंद्रगुप्त●* के लिए, इस फिल्म के सभी गाने सुपरहिट हुए, बाद मे 1959 को आयी *●बेदर्द जमाना क्या जाने●*, उनके बाद आयी *●पोस्ट बॉक्स नं. 999, सट्टा बाजार● वगैरह* फिल्मे जबरदस्त म्यूजिकल हिट हुई थी और उनकीं दौड शुरू हुई वह उनके आखिरी तक थी...🎞🎼🎹🎻🎺🏃‍♂️

🎇 बादमे उन्होंने छोटा भाई *आनंदजी* को साथ लेके 1961 को निर्माता निर्देशक *मनमोहन देसाई* जी की फिल्म *●छलीयाँ●* को संगीत दिया, इस फिल्म के सभी गाने हिट हुए और दर्शकों ने इस जोडी को अपने दिल मे जगह दी, 1965 की फिल्म *●हिमालय की गोंद में●* से *बॉलीवुड* में *एक से बढकर एक* गाने देकर हंगामा मचाया, कल्याणजी ने अपने जमाने के सभी *गायक - गायिकाओं* से गाने गवाके लिए, और सभी *हिरों- हिरॉईन* के लिए काम कीया था, उनका काम शायर *कम़र जलालाबादी, आनंद बक्शी, गुलशन बावरा, अनजान, वर्मा मलिक और एम जी हशमत* जीं से बहुत बेहतरीन रहा... 🎼✍️🎙🎹🎻🎞

🎇 कल्याणजी ने अपने कार्यकाल मे करीबन 250 फिल्मों को सुरीले संगीत से सजाया था, उनकी *17 फिल्मों* ने *गोल्डन ज्युबिली* और *39 फिल्मों* ने *सिल्वर ज्युबिली* की सफलता प्राप्त की थी, उनको फिल्म *●कोरा कागज●* के लिए बेस्ट संगीतकार का *फिल्म फेअर अवार्ड* मिला था और भारत सरकार की तरफ से उन्हें *पद्मभूषण पुरस्कार* से नवाजा गया था...🎼🎞🏆🏆🏆🎖🎖🎖🌹🌹🌹👏👏👏

🎇 ऐसे महान हस्ती का *देहान्त 'मुंबई' में 72 साल कीं उम्र में "24 ऑगस्ट 2000" को हुआ था, उन्हें शत शत नमन...*😪🌹👏

🎇 उनका यह बेहतरीन गाना सुनते है 1958 दिग्दर्शक *रविन्द्र दवे* जी की म्यूजिकल हिट फिल्म *●पोस्ट बॉक्स नं. 999●*...🎞🎬📽
संगीत *●कल्याणजी विरजी शहा●*...🎼🎹🎻🎺🎸🎷
शायर *पी एल संतोषी* जी...✍️✍️✍️
गायक *हेमंत कुमार-लता मंगेशकर* जी...🎙🎙🎙📢📢📢🌹 🌺🌸👏

12/06/2022

16th July 2022 @ Vishnudas Bhave Natyagruha, Vashi

23/01/2022

'खामोशी'च्या वेळेस वहिदाचं वय होतं एकतीस वर्षांचं, धरम होता चौतीसचा आणि हँडसम राजेश खन्नाचं वय सत्तावीस वर्षांचं. कथेतील ही तीनही पात्रं याच वयाची होती. चित्रीकरणादरम्यान वहिदा प्रचंड डिप्रेस्ड झाली होती. कारण गुरुदत्तला जाऊन जेमतेम चार वर्ष झाली होती. जो किस्सा तिच्यामुळे गुरुदत्तच्या आयुष्यात घडला होता तो तिला इथे विरुद्धअर्थाने निभावायचा होता. हा वहिदाच्या संपूर्ण करिअरमधला सर्वात सशक्त आणि सरस रोल ठरला. अख्खा सिनेमाभर तिचं अस्तित्व जाणवत राहतं. तिचं सावकाश चालणं, मान वेळावून बघणं, कपाळावरील महिरपीतून कानाजवळून रेंगाळणाऱ्या बटांना दुर्लक्षित उस्मरत राहणं कमालीचं भावतं. वहिदाच्या आयुष्यात जी वादळं येऊन गेली त्याची ही रिव्हर्स इमेज होती, जिला तिने समरसून न्याय दिला. हा कालखंड स्वातंत्र्योत्तर पहिल्या दोन दशकातला होता ज्यात आयडियालिझम आणि रोमँटीसिझमने पडदा व्यापला होता. त्याची छाप संवाद आणि पात्ररचनेत स्पष्ट दिसते. सामाजिक दृष्ट्या अगदी मागच्या दोनेक दशकापर्यंत आपल्याकडे 'नर्स' या घटकास समाजाने चारित्र्याच्या दृष्टीने नेहमी संशयाने पाहिले आहे. डॉक्टरांशी तिचे काहीतरी लफडे असू शकते किंवा अफेअर करणारं प्रोफेशन हाच दृष्टीकोन असायचा. त्याला टोकदार छेद देत आशुतोष मुखर्जींनी हे एक नोबल प्रोफेशन आहे हे बिंबवतानाच ती एक प्रेमसुलभ भावना असणारी विविध नात्यांनी बांधली गेलेली स्त्री आहे हा रिव्होल्यूशनरी अँगल मांडला. असे असूनही या सिनेमाला फारसा लोकाश्रय लाभला नाही. एक धक्कादायक शेवट, शोकांतिका आणि स्त्रीप्रधान कथानक अशा फारशा उठावदार बाबी नसूनही 'खामोशी'ने इतिहास घडवला.

'वो शाम कुछ अजीब थी' हे अवीट गोडीचं गाणं याच 'खामोशी'मधलं. पुन्हा पुन्हा पहावा आणि स्वतःशीच पडताळून घ्यावा असा सिनेमा म्हणजे 'खामोशी'. मागे एका प्रसिद्ध क्रिटीक्सने लिहिलं होतं की मरण्याआधी पुन्हा एकदा 'खामोशी' बघेन आणि मग प्राण सोडेन. इतकं काय होतं त्या सिनेमात ? आपण ज्या पुरुषावर प्रेम करतो तो दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो हे कळले की कोणतीही संवदेनशील स्त्री उन्मळून पडते. त्या दुःखातून सावरण्यासाठी तशाच एका समदुखी जीवाला अशाच वेदनेतून बाहेर पडण्यास मदत करते. तिला वाटते की तो आता आपल्यावर प्रेम करू लागलाय. प्रत्यक्षात एका मानसिक आजारातून तो बाहेर पडावा यासाठीची ती एक क्रिया असते. हे कळल्यावर तिचं भावविश्व हादरून जातं. इतरांचे प्रेमविश्व बरे करण्याच्या नादात तीच वेडी होते. अखेरीस तिने बऱ्या केलेल्या प्रेमवेडयाला ती पूर्ववत होण्याची आस लागून राहते.

'खामोशी'चे संवाद गुलजार यांनी लिहिले होते तर स्वतः असित सेननी (not the comic actor) त्याची पटकथा लिहिली होती. हेमंतकुमार यांनी संगीताची बाजू सांभाळली होती तर गीते गुलजारजींची होती. वहिदा रेहमान, राजेशखन्ना, धर्मेंद्र, नाझीर हुसेन, इफ्तिकार, ललिता पवार, देवेन वर्मा अशी मुख्य स्टारकास्ट होती. जेमतेम दहा महिन्यात याचं चित्रीकरण पुरं झालं होतं. 'खामोशी' रिलीज झाला होता २५ एप्रिल १९६९ ला. 'आया सावन झूम के' - धर्मेंद्र, 'धरती कहे पुकार के', 'जीने की राह' - जितेंद्र,'बंधन', 'आराधना','दो रास्ते'- राजेशखन्ना, 'तुमसे अच्छा कौन है' - शम्मी, 'तलाश' - राजेंद्रकुमार असे हिट नायकांचे हिट सिनेमे याचवर्षी आले होते त्यांना टक्कर देत वहिदाचा 'खामोशी' सुपरहिट झाला. हा काळ सुपरस्टार राजेशखन्नाचा सुवर्णकाळ होता. १९६९ ते १९७१ या दोन वर्षात सलग सतरा सुपरहिट सिनेमे त्याने दिलेले. त्यातले तब्बल पंधरा सिनेमे सोलो रोलचे होते ! हे सांगण्याचे कारण म्हणजे खामोशी हा नायिकाप्रधान चित्रपट होता ! काहींनी याचे श्रेय राजेशखन्नाला देण्याचा प्रयत्नही केला होता. वहिदाच्या इतकेच अन्य बिंदू जास्त महत्वाचे आहेत. असितसेन, गुलजार, हेमंतकुमार यांच्या जोडीने ते नाव होते कमल बोस यांचे !

राधा (वहिदा) ही डॉ.कर्नल साहब (नाझीर हुसेन) यांच्या मानसोपचार रूग्णालयातील परिचारिका असते. वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या केसेस केवळ मानसिक आधाराच्या जोरावर नीट करता येतात हे डॉक्टरांना दाखवून द्यायचे असते. असाच एक तरुण अविवाहित रुग्ण देव यास त्यांनी बरं केलेलं असतं. देवच्या इलाजासाठी राधाला त्याच्या भावविश्वात गुंतून पडावं लागतं. देव बरा होतो पण राधाचं त्याच्यावर प्रेम जडतं. केवळ इलाजासाठी आलेल्या देवला राधाचं प्रेम उमगत नाही तो तिथून निघून जातो. तो बरा झाल्यावर त्याचं हरवलेलं प्रेम त्याला परत मिळतं ; त्याचं लग्न होतं. दरम्यानच्या काळात कर्नलसाहब देवसारखीच अजून केस घेतात जेणेकरून इलेक्ट्रिक शॉकशिवाय असे रुग्ण बरे होतात यावर शिक्कामोर्तब व्हावं. ही केस असते अरुणची. ज्याला सुलेखाने प्रेमात दगा दिलेला आहे. अरुणला त्याच्या आयुष्यात कोणतीच स्त्री मंजूर नसते पण सुलेखा त्याच्या मेंदूतून बाहेर पडत नसते. डॉक्टर ही केस घेण्यासाठी राधाची विनवणी करतात पण ती त्यांना नकार देते कारण देवच्या अशाच केसमध्ये तिला प्रचंड मानसिक त्रास झालेला. ती त्याला विसरूच शकली नव्हती. तिचं प्रेम होतं आणि त्याच्यासाठीचा तिचा इंतजार अजून संपलेला नव्हता. राधाऐवजी अन्य नर्सेस प्रयत्न करून पाहतात पण अरुण कुणाला बधत नाही. अपघाताने राधाला त्या केसमध्ये पडावं लागतं. पुन्हा तोच खेळ होतो. काही महिन्यात अरुण बरा होतो. त्याचं तिथून आपल्या गावी परत जाणं निश्चित होतं आणि आपण पुन्हा या खेळात हकनाक आपला जीव गुंतवून बसलो हे राधाला उमगतं. हा धक्का ती सहन करू शकत नाही. त्याच रुग्णालयात तिला रुग्ण म्हणून राहावं लागतं. देव आणि अरुण यांच्यात ती स्वत्व हरवून बसते. यातून बाहेर यायला किती वेळ लागेल हे ठाऊक नाही पण बरा झालेला अरुण क्लायमॅक्सला राधाला ज्या खोलीत बंद केलेलं असतं तिथे येऊन सांगतो की, अखेरच्या श्वासापर्यँत तो राधाची प्रतिक्षा करेन. "मैं तुम्हारा इंतजार करुंगा" हे अरुणचे वाक्य राधाच्या कानात घुमत राहतं. रूमला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी ती कोलमडून पडते. शेवटी जाळीवरून घसरत जाणारे तिचे रिते हात दिसतात आणि सिनेमा संपतो.

'खामोशी'ची अनेक वैशिष्टये आहेत. यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल इतकं कंटेंट यात आहे. 'खामोशी'त पाच गाणी होती. पाचच्या पाच सोलो गाणी होती. पाचही गाणी भिन्न गायकांनी गायली होती हे एक आगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लता मंगेशकरांच्या आवाजातले "हम ने देखी है, इन आखों की महकती खुशबू' हे अप्रतिम गाणं यातलंच. "तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है" हे हेमंतकुमारनी गायलेलं गाणं कोणता रसिक विसरेल बरे ? मन्ना डेंच्या आवाजातलं "दोस्त कहां कोई तुमसा" आणि आरती मुखर्जीच्या आवाजातलं 'आज की रात चरागों की लौ" हे अर्थपूर्ण गाणं यात होतं. पाचवं गाणं म्हणजे किशोरदांच्या आवाजातलं "वो शाम कुछ अजीब थी"... आधी सांगितल्याप्रमाणे हा सिनेमा जसा सशक्त अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाचा होता, गुलजारजींच्या तरल संवादांचा होता, तसाच तो कमल बोस यांच्या विलोभनीय छायाचित्रणाचाही होता. पडद्यावर झळकणाऱ्या लोकांचा आणि प्रकाशझोतातील लोकांचा नेहमीच उल्लेख होतो पण ज्यांचे मोलाचे योगदान असूनही अगदी नाममात्र प्रसिद्धी ज्यांच्या वाटेस येते त्यात समावेश असणाऱ्या सिनेतंत्रज्ञात सिनेमॅटोग्राफर्सचे नाव अग्रस्थानी असेल. कमल बोसनी बिमल रॉययांच्या बहुतांश चित्रपटांचे छायाचित्रण केलं होतं. 'परिणीता', 'बंदिनी', 'दो बिघा जमीन', 'देवदास', 'सुजाता' या ब्लॅक अँड व्हाईट जेम साठी ते परिचित आहेत. रुपेरी पडदा रंगीत झाल्यावर त्यांनी फिरोज खानच्या 'धर्मात्मा', 'कुर्बानी', 'दयावान', 'जाँबाज'ला चार चाँद लावले होते. त्याच कमल बोस यांच्या जादुई कॅमेऱ्याने 'खामोशी'ला बोलकं केलं आहे. मी तर जेंव्हा जेंव्हा खामोशी पाहिला आहे तेंव्हा तेंव्हा त्यातली प्रत्येक फ्रेम नव्याने रसरसल्यासारखी वाटते. छायाचित्रण हा या सिनेमाचा प्राण आहे. कमल बोसना 'खामोशी'सह 'बंदिनी', 'अनोखी रात','दस्तक' आणि धर्मात्मासाठी छायचित्रणाचं फिल्मफेअर मिळालं होतं हे उल्लेखनीय.

'खामोशी'ची सुरुवात हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरील रुमच्या सज्जात वहिदा उभी असते तिथून होते आणि अंत रूम नंबर २४ मधील दारावरील जाळीवर हात खरडणाऱ्या वहिदाने होते. याच २४ नंबरच्या खोलीत कधी काळी धर्मेंद्र, नंतर राजेशखन्ना ऍडमिट असतात. हॉस्पिटलमधील खोल्या, कॉरीडॉर, आतले सज्जे, खोल्यांना लागून असणारी बाल्कनी, दरवाजे, रिकाम्या खुर्च्या, प्रशस्त टेबले, जाळीदार दरवाजे, फुलांची चित्रे असणारी बेडशीट्स, प्रशस्त कमनीय जिने, काचेच्या तावदानांच्या खिडक्या ही सगळी या सिनेमातील पात्रे वाटू लागतात. गाण्यांचे चित्रीकरण कसे असावे याचा कुणाला अभ्यास करायचा असेल किंवा प्रकाश रचना कशी असावी, कॅमेऱ्याचा टेक ऑफ कसा असावा, अँगल ऑफ व्ह्यू कोणता ठेवावा, सिनेमॅटोग्राफीचे बेसिक्स काय असतात हे कुणाला शिकायचे असेल तर त्याने 'खामोशी'ची गाणी पहावीत. प्रत्येक गाणं स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. या पोस्टमध्ये "वो शाम कुछ अजीब थी.."हे किशोरदांचे अजरामर गाणे.

अरुणच्या तब्येतीत बऱ्यापैकी फरक पडल्यावर त्याला हॉस्पिटलबाहेर जाण्याची अनुमती मिळते. डॉक्टरांचा हा निर्णय त्याला राधा कळवते. तोवर राधाला हेही कळलेय की आता काही दिवसांत अरुण इथे जाणार आहे. या आधी देव आपल्याला सोडून गेला होता, त्याच्या स्मरणात आपलं प्रेम राहिलं नाही आणि आता अरुणबरोबरही आपल्या मनाचे तार जुळलेत पण त्याच्या आयुष्यात आपल्याला स्थान असेल का ? मग आपण देवशी ठेवलेलं नातं कोणतं होतं ? की आपल्याला पुन्हा 'इंतजार'च करावा लागणार ? अशा अनेक प्रश्नांनी तिला ग्रासलेलं आहे. त्याचं मन रिझवण्यासाठी ती त्याला घेऊन जाते, त्याच ठिकाणी जिथे कधी काळी मन रिझले होते. या सिच्युएशनला हे गाणं आहे. संपूर्ण गाण्यात राधा आणि अरुण एका होडीत दिसतात. कोलकत्त्याच्या मस्तकाशी असलेल्या गंगेच्या विस्तीर्ण पात्रात, हावडा ब्रिजखालून पुढे जात हे युगुल आपल्या डोळ्यापुढे तरळत राहतं.

गाण्याची सुरुवात होते तेंव्हा कॅमेरा पाण्याच्या अत्यंत संथ पात्रावर फिरतो. त्यात हळूच हात घालून आपल्या हृदयातील तरंग जाणून घेणारा राधेच्या पुढ्यात ओणवा झालेला अरुण गुणगुणतो - "वो शाम कुछ अजीब थी, यह शाम भी अजीब है.. " ! बंद गळ्याचे स्वेटर घातलेला, नेटके केस विंचरलेला, फ्रेश मूडमधला क्लीन शेव्हड राजेशखन्ना कमालीचा आकर्षक वाटतो पण त्याच्या चेहऱ्यावरचे काही तरी गमावल्याचे भाव टिपलेत कमल बोसच्या कॅमेऱ्याने ! त्याच्या शेजारी बसलेली काळ्या ठिपक्यांच्या फिकट राखाडी साडीवर, पांढरया नाजूक फुलांची वेलबुट्टी वीणलेलं गर्द काळे स्वेटर परिधान केलेली, विमनस्क चेहऱ्यातली उदासवाणी राधा दिसते. या संपूर्ण चित्रपटात पांढऱ्या वेशातल्या नर्सेस आणि पांढऱ्या कोटमधील डॉक्टर्स दिसतात पण मधूनच फुलांच्या, मोठाल्या डिझाईनच्या जॉर्जेटच्या साड्या घातलेली फ्लॅशबॅकमधली वहिदा दिसली की वाऱ्याची शीतल झुळूक यावे तसे सुखद फील येतात. याही सीनमधल्या वहिदाला ही साडी, स्वेटर अत्यंत खुलून दिसतात. गाण्याचा मुखडा होईपर्यंत हेलकावे खाणारी होडी आणि त्यात दोलायमान मनस्थितीत बसलेली वहिदा डोक्यात ठाण मांडून बसतात. शिवाय ओळीही अर्थपूर्ण असल्याने त्यात गहिरी अधीरता येते. अरुण त्याच्या सुलेखासोबतच्या आठवणीबद्दल बोलतोय तर राधाचे मनही देवच्या आठवणीत व्याकुळ होते. होडी हावडा ब्रिजखालून पुढे येते हा सीन असा अप्रतिम शूट केलाय की पाहणाऱ्याला वाटावे की आपणही त्या होडीत बसलो आहोत. सॅल्यूट टू कमल बोस.

"झुकी हुई निगाहो में, कही मेरा ख़याल था दबी दबी हंसी मे इक, हसी सा गुलाल था" या ओळी गाणारा अरुण तिच्या मांडीवर डोकं ठेवून आपलं मन मोकळं करतोय तर नदीच्या पात्रातून राधाच्या तोंडावर उडणारे जलतुषार तिला देवची आठवणही करून देतात आणि भानावरही आणतात. त्याला हायसे वाटतेय की आपण तिच्या कुशीत आहोत, ती खेचल्यागत त्याच्या केसातून हळुवार बोटे फिरवते आहे पण तिचे चित्त स्थिर नाही. दोघांच्या हाताचे पंजे शेजारी शेजारीच असतात पण एकमेकात गुंतलेले नसतात. तिच्या मांडीवरून पुढे रेलून तो आता होडीच्या पृष्ठभागावर झोपलेला दिसतो. "मै सोचता था, मेरा नाम गुनगुना रही है वोह.." या पंक्तीत वरचे स्वर लागतात आणि ढोलकीचे बीटस येतात तेंव्हा पडद्यावरचे दृश्य फार विहंगम आहे. शीड फडकावत पुढे जाणारी होडी, तिच्या डेकच्या एकसमान फळयांच्या सपाट पृष्ठभागावर पाठ टेकलेला अरुण, त्याच्या शेजारची गोंधळून गेलेली राधा आणि होडीच्या बाजूने वेगाने वाहत जाणारं गंगेचं पाणी. स्वर जसे चढत जातात तसा होडीचा वेग वाढत जातो हे पाण्यावरून उमगते. पुढच्या पंक्तीत साउंडटोन खाली आल्यावर पाणी पुन्हा संथ दिसतं, हेलकावे कमी झालेले दिसतात आणि राधाच्या मिठीत असलेला पाठमोरा अरुण दिसतो. दोघांचे काळे पांढऱ्या रंगाचे स्वेटर एक होताना दिसते. "यही ख़याल है मुझे, के साथ आ रही है वो" या ओळी गाणारा अरुण होडीवर अंग टाकतो आणि राधा त्याच्यावर अलगद रेलते. या पूर्ण गाण्यात पाण्याच्या प्रवाहाचा वापर खूप सुरेख चितारला आहे. नेमक्या शब्दाला होडीच्या मागून जाणाऱ्या अजस्त्र बोटी वेगळे संदर्भ देऊन जातात. होडीचा वेग आणि कॅमेरा याचं जे संतुलन आहे त्यासाठी शब्द कमी पडावेत. पूर्ण गाण्यात आकाश निरभ्र दिसते आणि त्याची एक धूळकटलेली डल फ्रेम राधाच्या मनातील मळभ गडद करत जाते.

पूर्ण सिनेमात "तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है.." या गाण्याच्या शेवटी असलेली शीळ काळजाचे पाणीपाणी करून जाते आणि गाण्याच्या सुरुवातीचं हमिंग मनात घर करून राहतं.... या सिनेमाबद्दल आणि यातल्या गाण्याबद्दल लिहावं तितकं कमी आहे. सिनेमा हिट झाल्यावर रेडीओ सिलोनवर एका मुलाखतीत हेमंतकुमारना विचारले गेले की, "'खामोशी'चे तुम्ही निर्माते आणि संगीतकार देखील आहात मग 'वो शाम कुछ अजीब थी .. ' हे तुम्ही स्वतः न गाता किशोरदांना का दिलं ?" यावर त्यांनी दिलेलं उत्तर अद्वितीय होतं. "त्या गाण्याचा जन्मच त्याच्या आवाजासाठी झाला होता, मी फक्त पाळण्यात घातलं, लोरी तर त्यानंच(किशोरदा) गायला हवी ना ?" एक संगीतकार जो गायक आहे तो दुसऱ्या गायकाबद्दल किती आदराने आणि प्रेमाने बोलतो याचे हे विलक्षण बोलके उदाहरण आहे. अर्थात आता काळ बदलला आहे आणि त्या भावनाही लोप पावल्या आहेत..

'वो शाम कुछ अजीब थी'चे अचूक अर्थ लावायचे असतील तर 'खामोशी' बघायलाच हवा नाहीतर युट्यूबवर निदान गाणं तरी बघितलं पाहिजे. या अप्रतिम गाण्याचे आपल्या मनातले बंध अधिक दृढ व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा माझ्याशब्दाखातर याचा युट्यूबवरील व्हिडीओ पहा आणि मगच पोस्टवर कॉमेंट करा...

पुन्हा कधी तरी "तुम पुकार लो.." या स्वर्गीय गीतावर लिहीन ... आता थांबतो ...

- *समीर गायकवाड.*

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai
400076