03/04/2026
बुधवार, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी विद्यालयात इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे सी कोस्ट यांच्या वतीने शाळेतील मुलींसाठी “स्वतःची काळजी कशी घ्यावी” या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र उत्साहात आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्र मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी प्रमुख अतिथींचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला व गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला. यानंतर क्लबच्या अध्यक्षा श्रीमती साधना त्रिपाठी तसेच पदाधिकारी श्रीमती शैलजा नायर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थिनींना महिलांसाठी उपयुक्त वस्तूंचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने क्लबतर्फे विविध खेळांच्या साहित्याचेही वितरण करण्यात आले.
याप्रसंगी इनर व्हील क्लब बॉम्बे सी कोस्टच्या प्रमुख आदरणीय श्रीमती मंगला चंदावरकर मॅडम यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती मोहिनी वैती मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी व जागरूकता निर्माण करणारा ठरला.