Maharashtra High School No.2 Katta

Maharashtra High School No.2 Katta

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra High School No.2 Katta, High School, N. M. Kale Marg, Dadar, Mumbai.

28/07/2018

नशीब आमचे टिचर नव्हते
बाई आणि गुरूजी होते..

स्वतःच्या पगारापेक्षा मुलांचे
घडणे पहात होते..

शाळेत एकटे असले तरीही
चालते बोलते विद्यापीठ होते...

पाठीवर मारताना शिवशिवणारे हात
पोटभर शाबासकी देत होते..

हुशार मुलांबरोबर ढ विद्यार्थांना
व्यवहारात निपुण करत होते..

आपल्या साडी लिपस्टिकपेक्षा
मुलांच्या स्वच्छतेकडे पहात होते..

नीटनेटक्या कव्हर्सपेक्षा
हस्ताक्षरावर भर देत होते...

शाळेतल्या मुलांच्या घरदारासकट
आर्थिक परिस्थितीला ओळखत होते..

शाळेतल्या मुलांबरोबरच
शाळेचा अभिमान बाळगत होते..

परिक्षार्थी घडवण्यापेक्षा
गुणी विद्यार्थी घडवत होते..

आणि

हा माझा विद्यार्थी म्हणून सांगताना
मनभर आनंदी होत होते...

😊😊

आणखी एक अत्यंत महत्वाचे सांगावेसे वाटते..

त्यावेळी 2/ 2 वर्ष नापास होणारे विद्यार्थीही आत्महत्या करत नव्हते...

उलट नवीन बॅचबरोबर मिसळून जात होते...

त्याचेही श्रेय त्यांचेच होते ना.. ??

27/07/2018

गुरू (तंत्र) ज्ञान

लहानपणी शाळेतील शिक्षकाचा मंत्र..
अभ्यास केलातरच पास नाही तर घरी पत्र..
कॉलेजात मिळले वेगवेगळी मित्र..
मग अंगात आला त्याच्यासोबतचा स्वांतत्र..
काही दिवसांनी मिळाला हातात एक यंत्र..
त्यासोबतच दिवस आणि रात्र...
विसरलो लहानपणीचा शिकवलेले स्त्रोत..
कारण हातातला यंत्रच आमचा जिवलग मित्र..
पण आता तर आली ऐवढे मोठे यंत्र...
पण त्यात माणूस फक्त नाम मात्र..
कारण संध्याचे गुरू हे ‘गुगल यंत्र’

25/07/2018

कोकणातल्या गावाकडची एक मजा आणी कधीच विसराक शकनव नाय अशी आठवण म्हणजे *मराठी शाळा*.आताच्या मराठी शाळेत आणि तेव्हाच्या मराठी शाळेत जमीनअस्मानाचो फरक पडलो हा. पेन्सिल ची जागा पेनान , पाटी ची जागा वहिन आणि खेळाच्या मैदानाची कुनग्याची जागा आता मोबाइलान घेतली हा. पण जी मी खाली लिहलय ती मजा जर कोनी अनुभवली असात तर त्या सारख्या स्वर्ग सुख दुसरा नाय. आणि तेव्हाची मजा आताच्या मुलांका समजाची नाय. (र्‍हस्व दिर्घ च्या चुकिबद्दल माफी असावी.)

१> खाकी चड्डी / निळो पेटिकोट , पांढरा शर्ट कापडी दप्तार घेवुन शाळेत गेलाय काय?

२> शाळेत तु मसालो आण मि मिठ आणतय , एकान तोरा, एकान साखर, तेल असा ठरवन लोंचा केलाय काय ?
३> शाळेत आवळधोडे, चिचे आवळे आणुन पोरांका वाटलाय काय?
४> शाळेत असताना खिशात पैशे नसत म्हनान ४/५ काजींका गावणारा १ आयस्प्रोट खाल्लाय काय?
५> रुपयाक १०/२० गावणारे श्रिखंडाचे गोळये, पेपर मिटा खाल्लाय काय?
६> श्रावण सोमवाराक सकाळची शाळा अनुभवलाय काय?
७> शाळा सुटली काय चड्डी सुटासर घराक धावान गेलास काय?
८> वर्ग आणी खळा सारवच्या साठी शाण आणुक मित्रमैत्रिणीच्या घराकडे गेल्लाय काय?
९> शान मुलींनी सारवचा आनी पाणी मुलांनी आनुचा ह्या न सांगता काम केलास काय?
१०> पाटयेवर लिहलेलो दुसर्‍याचो अभ्यास चोरुन फुसलाय काय?
११> बाई गुरुजी वाटेत गावले काय धुम ठोकलाय काय ?
१२> नविन पुस्तका गावनत नाय म्हनान दुसर्‍याची किंवा मोठ्या भावंडाची जुनी पुस्तका वापरलाय काय?
१३> लाकडी पट्टिन बाईंचो मास्तरांचो मार खाल्लाय काय?
१४> शाळेत जाताना वाटेत मारुती ओमनी गाडी दिसली म्हनान पऴवुन नेतीत म्हनान दबादबा धावत सुटलाय काय?
१५ > पावसाळ्यात पायात घातलेल्या स्लीपरान तुमची चिखलान पाठ रंगली हा काय? आनी तेच्यासाठी घरातल्याचे शिवे खाल्लाय काय ?
१६> कमरेची पॅंट खाली येता म्हनान कमरेतल्या मुजीचो पट्टो म्हणान वापर केलाय काय?
१७> बरोबरच्याक बरा नसला काय "बाईंनु हेचा घर माझा बाजुक आसा हेका मी सोडतय घराक" असा सांगान शाऴेतसुन लवकर घराक ईलाय काय?
१८> पाउस खुप लागता, पाणी इला म्हणान शाळेत नाय जानय असा सांगल्यार बाबांनी खांद्यावर बसवुन किंवा सायकलीर बसवन शाळेत सोडल्यानी काय?
१९> बाईंनु ह्यो माझा बापाशीचा नाव घेता म्हनान बाईंका सांगान मित्राक मार घातलाय काय?
२०> सकाळीच उठान अोवळीची , सुरंगी ची फुला आनुन तेचो वळेसार करुन आनी तो माळुन शाळेत गेलाय काय?
२१> कमळाची छत्रि ख्वॉऴ घेवुन पावसात शाळेत गेलाय काय?
२२> सरस्वती पुजनाक नविन कपडयाक ( तशे जुनेच मोठ्या भावान बहिनीन वापरलेले मु्बयसुन धाडुन दिलेले) गरम तांबयान इस्त्री करुन शाळेत गेलाय काय?
२३> पेंसिल खावुन तेची चव बघलाय काय?
२४> सायकल शिकल्यार मोठेपना मारुक कैचेतसुन सायकल चालवुन शाळेत गेलाय काय?
२५> खाकी दप्तराचो बंद कपाळपट्टेक अडकवन दप्तार घेतलास काय?
२६> शाळेत जावचा नाया म्हनान आवशी बापाशीचो शिरटेचो मार खालाय काय?
२७> बाईंनी लवकर सोडु होया म्हनान पावसात मुद्दाम भिजान शाळेत गेलाय काय?
२८> शिक्षा म्हनान उठाबशे, ओनवे, वर्गाकडे पाठ भिंतीकडे तॉंड करुन उभे रवलास काय?
२९> गावाच्या, मुलामुलींच्या नावावरुन भेंडियेनी खेऴलाय काय?
३०> पुस्तका वरच्या आनी पुस्तकातल्या चित्रांका दाढी मिशी काढलाय काय?
31> आवशीन भाजुन दिलेले चिचारे, घोटये शाळेत नेवुन आपापसात वाटुन खाल्लाय काय?
बघा हेचातली किती उत्तरा बरोबर येतत ? जितके होय जास्त तितके तुम्ही परत एकदा मराठी शाळेच्या सहवासात परत जावन बसतलाय........

22/07/2018

*एक पिढी*
*1973/1974/1975/1976/1977/1978/1979/1980/1981/1982/1983/1984/1985/1986/1987*

ही पीढ़ी आता 35 ओलांडुन 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....

पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लेप्टोप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.

ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....

*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.

*मार्कशीट* आणि *टिव्ही*च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.

*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.

*'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि

कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.

*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.

वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी* ही पिढी.

पण गल्लीत *कुणाच्याही घरात काहीही असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.

*कपील, मोहम्मद अझरुद्दीन , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*

भाड्याने VCR आणुन ४-५ पिकचर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.

*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी.

कितीही शिकलं तरी *'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'* यावर विश्वास असणारी

*'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी.

ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी.

वर्गात कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी.
कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...
ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी

पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी,
::
दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी

लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.

पुन्हा डोळे झाकुया ?

दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ

*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच*

*उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी..??

धन्य ते जीवन जे खर आपणच जगलोय !!! 🙏🙏आपल्या सर्व मित्र मैत्रिणीन साठी....

13/10/2017
12/10/2017

अप्रूप .....

परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो ...
फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं......
वर लिहिलं होतं .. “हरवले सापडले विभाग” .....
तीच पूर्वीची जागा ..

कपाटही तेच असावं बहुधा ....
पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं ....
सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल ...
पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला ...
आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू, Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू , पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता .......
शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत .
कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात .

कदाचित घरी गेल्यावर ती वस्तू काही मिनिटात त्यांच्या हातात येऊन पडत असेल . याला कारणं अनेक असतील. उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही तर ते आपल्या मुलांना मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी, कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं .... ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही.......पण ....

पूर्वी आमचा साधा Eraser जरी शाळेत विसरला ज्याला त्या काळी आम्ही “खोड रबर “ म्हणायचो , तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात ‘याची देही याची डोळा’ बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल , मग ती वस्तू आपलीच कशी आहे , त्यावर पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड .... त्यासाठी वेळप्रसंगी मधल्या सुट्टीत वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार .... आणि शेवटी ती हरवलेली वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे समाधान ....
अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये . आम्ही एका वेळेस १-२ पेन्सिल्स घ्यायचो , आता अख्खा box घेतो ...
आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदानी वापरायचो आता वेगवेगळ्या design च्या वह्या घेतो ......
जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर म्हणून घालायचो आता Plastic Coated वगैरे वगैरे ...
एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये .
अप्रूप ...........खरंच......

सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता ......
पण या घटनेनी मला मात्र Flashback मध्ये नेलं...

खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप .....
तो रंगीत खडूंचा असेल तर जरा जास्तंच अप्रूप......
बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी आणलेला एक खडू सगळ्या वर्गाला World Cup जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप.....
धडपडल्यावर गुलाबी-लाल रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप.....
Lab मधल्या काकांना मस्का मारून Litmus Paper ढापण्याचं अप्रूप....
हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे काढण्याचं अप्रूप......
स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव ग्लुकॉन डी दिलं कि त्याचं अप्रूप....
Gathering च्या Practice साठी एकाचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप....आणि बरंच काही...

आजच्या जमान्यात “फालतू” वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप enjoy केल्या होत्या .

त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या “हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी सापडल्या” ...

तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं ... मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो ... बाहेर एक मित्र भेटला .... घाईत होता ... त्याचा मुलगा काल शाळेत colour box हरवून आला होता .. त्यामुळे नवीन घ्यायला चालला होता .....

😊😊😊

04/09/2017

टच फोनच्या जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही...

हिच गोष्ट मनाला टच करते...
🙁🙁🙁🙁

Photos 16/07/2017
12/07/2017

प्रेम + जिव्हाळा + विश्वास + आपुलकी + माया + 2-4 शिव्या = मैत्री

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


N. M. Kale Marg, Dadar
Mumbai
400028